Posts

Showing posts from September, 2026

Shravan : स्त्री आणि पुरुष एकसमान असल्याची शिकवण देणारे महादेवाचे अर्धनारीनटेश्वर रूप

Image
  आज श्रावण महिन्यातील चौथा आणि शेवटचा सोमवार आहे. श्रावण महिना म्हणजे महादेवांचा महिना. या संपूर्ण महिन्यामध्ये दररोज शिवपूजा केली जाते. पण श्रावण महिन्यातील सोमवारचे महत्व औरच आहे. आजच्या दिवशी भोलेनाथांची पूजा करून त्यांना जवस शिवामूठ म्हणून वाहिली जाते. श्रावणात अनेक ठिकाणी शिव आणि पार्वती यांची सोबत पूजा केली जाते. केवळ श्रावणच नाही तर हिंदू धर्मातील अनेक व्रतवैकल्यांमध्ये शिव आणि पार्वती यांची सोबत पूजा केली जाते. शिव आणि पार्वती हे कायम एकमेकांसोबतच आपण पाहिले आहे. पार्वती मातेने कायम वेगवेगळी रूपे घेऊन शिवांना प्राप्त केले. त्यांना कायम शिव आणि शक्ती नावाने देखील ओळखले जाते. आजवर आपण शिव शंकर यांच्या अनेक रूपांबद्दल अनेक अवतारांबद्दल ऐकले असेल, वाचले असेल, पाहिले असेल. मात्र आज श्रावणी सोमवारच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला महादेवांच्या एका अतिशय आगळ्या वेगळ्या रूपाची माहिती सांगणार आहोत. या रूपाबद्दल जवळपास सर्वांनीच ऐकले असेल, पण त्याची माहिती खूप कमी लोकांना असेल. (Shravan) भगवान शिवांनी पृथ्वीवरील मनुष्याचे रक्षण करण्यासाठी कायम अनेक रूपं घेतली. भगवंताने पृथ्वीवर स्त्री आ...