Aamir Khan : ‘सितारे जमीन पर’ सिनेमाने पहिल्या तीन दिवसातच वसूल केले सिनेमाचे अर्धे बजेट
नुकताच आमिर खानचा बहुप्रतीक्षित असा ‘सितारे जमीन पर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाबद्दल सुरुवातीपासूनच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. आमिरने देखील या सिनेमाचे भरपूर प्रमोशन केले. विविध ठिकाणी, विविध पद्धतीने त्याने या सिनेमाला प्रमोट केले. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तर सिनेमाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा कमालीच्या वाढल्या होत्या. मात्र हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला आणि सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यश मिळवले. (Aamir khan) Latest Entertainment News काही वर्षांपूर्वी आमिर खानचा सुपरहिट असा ‘तारे जमीन पर’ सिनेमा आला होता. या सिनेमाने चित्रपटसृष्टीत एक वेगळी छाप सोडली आहे. आजही या सानमचे चाहते आपल्याला पाहायला मिळतात. या सान्मातून आमिर खानने डिस्लेक्सिया आजार असलेल्या मुलांच्या भावविश्वावर भाष्य केले होते. आता प्रदर्शित झालेला ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाद्वारे आमिर खान एक पाऊल पुढे जात डाउन सिंड्रोम आणि न्यूरो डायव्हर्जन्स सारख्या गंभीर आणि महत्वाच्या विषयाला हात घातला आहे. (Marathi Latest News) Marathi News ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळ...