Posts

Showing posts with the label Todays Marathi News

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

Image
  ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील सुरूच आहे. असरानी, सतीश शाह, पंकज धीर आदी अनेक मोठ्या कलावंतांच्या निधनानंतर आता बॉलिवूडमधील अतिशय जेष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री, गायिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुलक्षणा पंडित यांचे देखील निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला सुलक्षणा यांनी केवळ आपल्या अभिनयाने आणि सौंदर्यानेच नाही तर आपल्या सुमधुर आवाजाने देखील प्रेक्षकांचे मनं जिंकले होते. बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्री आणि गायिका अशी त्यांची ओळख होती. सोशल मीडियावर कलाकारांसोबतच त्यांच्या चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Sulakshana Pandit) Latest Marathi News प्रकृती अस्वास्थामुळे सुलक्षणा यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलक्षणा पंडित या अभिनेत्री विजेता पंडित आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध, लोकप्रिय संगीतकार जोडी जतिन-ललित यांच्या बहीण होत्या. दरम्यान सुलक्षणा यांचे भाऊ असलेल्या ललित पंडित यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, ललित ...

Uttarakhand : येथे दिवाळी नंतर साजरी होते, बुधी दिवाळी !

Image
  दिवाळी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. दिव्यांच्या या सणाला प्रत्येक घरासमोर दिव्यांची रोषणाई कऱण्यात आली होती. मात्र भारतातील अशी काही गावं आहेत, जिथे दिवाळी काही दिवसांनी साजरी होते. भारतभरातील दिवाळी साजरी झाली की, आठवडा किंवा पंधरा दिवसांच्या अवकाशानं या ठिकाणी दिवाळी साजरी होते. विशेषतः उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमधील डोंगराळ भागात ही दिवाळी साजरी होते. याला बुधी दिवाळी असे म्हणतात. ही बुधी दिवाळी साजरी करण्याची परंपरा भगवान श्रीराम यांच्याशी संबंधीत आहे. यावेळी या डोंगराळ गावातील वातावरण मशालींच्या प्रकाशाने आणि लोकगीतांच्या साथीनं अधिक सुखद होऊन जातं. परंपरा, श्रद्धा आणि ग्रामीण संस्कृतीचे सामर्थ्य सांगणारा हा उत्सव यावर्षी ३१ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. (Uttarakhand) Todays Marathi news उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही वर्षापासून पर्यटनामध्ये मोठी वाढ झाली आहे. आता याच बुधा दिवाळीच्या निमित्तानंही पर्यंटकांना येथे आकर्षिक करुन घेण्यात येतं. या दोन राज्यामधील अनोखे निसर्ग सौंदर्य़ आणि त्याजोडीला असलेली ग्रामीण संस्कृती बघण्यासाठी लाखो पर्यटकही या बुधी...

Asha Bhosle : ‘मेलोडी क्वीन’ आशा

Image
  आज संगीत क्षेत्रातील अतिशय बुलंद आवाज असणाऱ्या आशा भोंसले यांचा आज ९२ वा वाढदिवस. आशा भोंसले यांच्याबद्दल काय आणि किती सांगावे असे होते. भारतीय संगीतसृष्टी या नावाशिवाय कायम अपूर्ण राहील असे महान कर्तृत्व आशा भोंसले यांनी गाजवले. आजही वयाच्या ९२ वर्षी त्यांचा उत्साह, एनर्जी, काम करण्याची इच्छा भल्याभल्याना मागे टाकताना दिसते. (Marathi News) आशा भोसले यांनी अनेक हिट चित्रपटांमधील गाणी गायली आहेत. ‘मेलोडी क्वीन’ नावाने ओळखल्या जाणारी आशा ताईंनी १००० हून अधिक चित्रपटांमध्ये २० भाषांमध्ये १२००० हून अधिक गाणी गेली आहेत. हिंदी मराठीच नाही तर बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन या भाषांमधील अनेक गाणी आशा भोसले यांनी गायली. त्यांनी विविध जॉनर्सची हजारो गाणी गायली आहेत. आज आशाताईंच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टींबद्दल जाणून घेऊयात… (Asha Bhosle Birthday) आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली येथे झाला. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी त्यांचे पहिले गाणे गायले. या पहिल्या गाण्याचा देखील एक किस्सा होता. हा किस्सा आशा ताईंनी...

Ashtavinayak : अष्टविनायकांमधील तिसरा गणपती- सिद्धटेकचा सिद्धिविनायक

Image
  गणेशोत्सव सुरु होऊन दोन दिवस झाले आणि आज तिसरा दिवस आहे. आता गणेशोत्सव म्हटला की, सर्वच लोकं विविध ऐतिहासिक, प्रसिद्ध आणि जागृत गणेश मंदिरांमध्ये अवश्य जातो आणि बाप्पाचे दर्शन घेतो. अष्टविनायक गणपती मंदिरं ही अशीच प्रसिद्ध आणि अतिशय जुनी मंदिरं आहेत. सध्या गणेशाचा सर्वत्र जयघोष सुरु आहे. गणेश उत्सवाच्या काळात तर अष्टविनायकाच्या गणेश मंदिरांना यात्रेचे स्वरूप आलेले असते. या काळात ही मंदिरं भाविकांनी तुडुंब भरलेली असतात. या अष्टविनायकांमधील सर्वच मंदिरांचा इतिहास हा खूपच खास आहे. यातलाच तिसरा गणपती म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक. आज आपण याच गणपतीबद्दल माहिती पाहूया. (Ganesh Chaturthi) Todays Marathi news सिद्धटेक अर्थात सिद्धिविनायक हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सिद्धटेक गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा असा हा सिद्धिविनायक गणपती उजव्या सोंडेचा अष्टविनायकांपैकी एकमेव गणपती आहे. गणपतीची मुद्रा अतिशय शांत आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूला जय-विजय यांच्या पितळेच्या मुर्त्या स्थित आहेत. अष...

Ganesh Chaturthi : दीड दिवसांच्या गणपती विसर्जनामागील शास्त्र

Image
  काल सर्वच ठिकाणी बाप्पाचे जल्लोषात आगमन झाले. विघ्नहर्ता बाप्पाची आपण वर्षभर वाट बघत असतो. निरोपाच्यावेळी वचन दिल्याप्रमाणे तो दरवर्षी आनंदाने आपल्या घरी येतो आणि आपल्याला भरपूर आशीर्वाद आणि आनंद देऊन जातो. तसे पाहिले तर गणपती बाप्पांचा सण हा दहा दिवसांचा असतो. मात्र सगळ्यांच्याच घरी दहा दिवस बाप्पा असतात असे नाही. अनेकांकडे बाप्पा केवळ दीड दिवसासाठीच येतात. गणेश चतुर्थी झाली की लगेच दुसऱ्या दिवशी बाप्पांचे विसर्जन केले जाते. काहींच्या घरी गौरींसोबत बाप्पांचे विसर्जन होते तर काहींकडे पाच, सात अशा दिवसांसाठी बाप्पांचे आगमन होत असते. (Ganesh Chaturthi) दीड दिवसाचा गणपती हा गणेश चतुर्थी उत्सवातील एक पारंपरिक रीत आहे. ज्यात गणपती बाप्पाची मूर्ती भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीला घरात स्थापित केली जाते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचमीला (सुमारे दीड दिवसानंतर) विसर्जन केले जाते. हे मुख्यतः महाराष्ट्रात, विशेषतः कोकण आणि मुंबईसारख्या भागात लोकप्रिय आहे. ज्यांच्याकडे दीड दिवसाचा बाप्पा आहे त्यांचे तर समाधान देखील होत नाही, तोवर बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आलेली असते. मग अनेकदा डोक्यात विचार...

Health Care : पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनसाठी सोपे उपाय

Image
  पावसाळा हा सगळ्यांना किती प्रिय ऋतू असला तरी या पावसाळ्यासोबत येणारे आजार आणि विविध त्रास नकोसे वाटतात. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण इतर ऋतूंच्या तुलनेत जास्तच असते. त्यामुळे हा ऋतू अगदी नकोस देखील वाटतो. याच पावसाळ्यात होणार अजून एक आजार म्हणजे फंगल इंफेक्शन. पावसाळ्यात अनेकांना फंगल इंफेक्शनचा त्रास होतो. हा आजार जरी सामान्य असला तरी त्रासदायक देखील असतो. पावसाळ्यात दमट आणि ओल्या वातावरणामुळे बुरशीजन्य संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो .(Marathi News) Top Marathi Headlines पावसाच्या घाणेरड्या पाण्यामुळे फंगल इंफेक्शनची समस्या उद्भवते. यामध्ये त्वचेवर खाज येणे, त्वचा लाल होणे, लहान पुरळ येणे, हाता – पायांवर चट्टे उठणे अशा अनेक प्रकारे फंगल इंफेक्शन होऊ शकते. फंगल इंफेक्शन तेव्हाच होते जेव्हा बाहेरील बुरशी आपल्या शरीरातील काही खास भागांवर येऊन वाढते. जर आपली रोगप्रतिकार शक्ती कमी असेल, तर आपले शरीर या फंगसला प्रतिकार करू शकत नाही आणि हा त्रास वाढत जातो. म्हणूनच अशा फंगल इंफेक्शनवर तातडीने उपचार करणे गरजेचे असते. फंगल इंफेक्शन दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय आपण जाणून ...

Health : पावसाळ्यात सततचा सर्दी खोकला त्रास देतोय? मग करा ‘हे’ सोपे उपाय

Image
  पावसाळा सुरु झाला की, सगळ्यानांच आनंद होती. मनुष्यापासून निसर्गापर्यंत सर्वच पावसाची आतुरतेने वाट बघत असतात. असा हा सगळ्यांचा आवडता पाऊस येताना सोबत भरपूर आनंद घेऊन येत असला तरी अनेक आजार देखील घेऊन येतो. पावसाळ्यात वातावरण थंड आणि दमट असते. शिवाय सूर्य देवाचे दर्शन देखील दुर्लभ असते त्यामुळे सगळीकडे केवळ मळभ असते. यामुळे अनेक आजार डोके वर काढतात. पावसाळ्याची नुसती चाहूल लागली तरी डॉक्टरांचे दवाखाने आपल्याला भरलेले दिसायला लागतात. त्यामुळेच पावसाळ्यात आपल्या आरोग्याची नीट काळजी घेणे अत्यावश्यक असते. यासाठी योग्य खानपान गरजेचे असते. (Health) या ऋतूमध्ये होणारा अतिशय सामान्य आजार म्हणजे सर्दी आणि खोकला. वातावरणात थोडा जरी बदल झाला तरी अनेकांना लगेच सर्दी खोकला होतो. काहींना तरी पावसाळ्यात अनेकदा हा त्रास होताना दिसतो. प्रत्येक वेळेस या केवळ सर्दी खोकल्यासाठी कुठे डॉक्टरकडे जावे असे अनेकांचे मत असते. त्यामुळे काही जणं तर घरगुती उपाय शोधतात आणि बरे होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तुमच्या सर्दी, खोकला आणि घसा खवखव यावर घरगुती अतिशय सोपे आणि साधे उपाय सांगणार आहोत. ( Marathi News ) ह...