Posts

Showing posts with the label Top stories

NATO Dating : नाटो डेटिंग म्हणजे काय आणि त्याचे संकेत कसे ओळखावे?

Image
  NATO Dating : आजच्या डिजिटल युगात डेटिंगचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. ऑनलाइन डेटिंग अॅप्स, सोशल मीडियावर वाढलेली मैत्री आणि आभासी जगातील संवाद या सर्वांमुळे लोक एकमेकांना पटकन भेटतात, बोलतात आणि नातं जोडतात. पण या सगळ्यात एक संकल्पना वाढत चालली आहे नाटो डेटिंग (NATO Dating) NATO म्हणजे No Action, Talk Only म्हणजेच फक्त बोलणे, पण कोणतीही कृती नाही. साध्या भाषेत सांगायचे तर, नातं फक्त संवादापुरतंच मर्यादित असतं; प्रत्यक्ष भेट, बांधिलकी किंवा पुढचं पाऊल कधीच घेतलं जात नाही.(NATO Dating ) Top stories नाटो डेटिंग म्हणजे अशा प्रकारचं नातं जिथे एखादी व्यक्ती सतत संवाद ठेवते, मेसेज करते, काळजी घेत असल्यासारखं दाखवते, पण जेव्हा भेटण्याची, पुढे जाण्याची किंवा नातं दृढ करण्याची वेळ येते, तेव्हा मागे सरकते. अशी नाती सुरुवातीला खूप उत्साहवर्धक वाटतात  कारण समोरची व्यक्ती सतत संपर्कात असते, वेळ देत असते, कौतुक करत असते. पण हळूहळू लक्षात येतं की ते नातं फक्त बोलण्यापुरतंच आहे. अशी स्थिती अनेकदा भावनिक थकवा आणि गोंधळ निर्माण करते अति बोलणे पण कृती नाही  समोरची व्यक्ती सतत आपण भेटू, आपल...

Skin Care : मेकअप केल्यानंतर चेहरा काळा दिसण्यामागे असू शकतात ही कारणे

Image
  Skin Care : आजच्या काळात मेकअप हा फक्त सौंदर्य वाढवण्यासाठीचा नाही तर आत्मविश्वास वाढवण्यासाठीचा एक भाग बनला आहे. पण अनेक महिलांना असं वाटतं की मेकअप केल्यानंतर काही वेळाने किंवा दिवसेंदिवस चेहरा काळसर दिसू लागतो. हे नक्की का होतं, याची कारणं समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक कारणामागे विशिष्ट सवयी, स्किन टाइप आणि उत्पादनांचा चुकीचा वापर लपलेला असतो. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे चुकीच्या किंवा स्किन टोनला न झेपणाऱ्या प्रॉडक्ट्सचा वापर. अनेक वेळा बाजारात उपलब्ध असलेले फाउंडेशन, क्रीम्स, पावडर यांचा रंग आपल्याला आकर्षक वाटतो आणि आपण ते खरेदी करतो. पण जर तो प्रॉडक्ट आपल्या त्वचेच्या रंगाशी जुळत नसेल, तर कालांतराने त्याचा परिणाम उलट होतो. विशेषतः ऑक्सिडायझेशन मुळे, म्हणजे हवेच्या संपर्कात आल्यावर काही मेकअप प्रॉडक्ट्स आपला रंग बदलतात आणि त्यामुळे चेहरा काळसर किंवा राखाडी दिसतो. Marathi News Skin Care दुसरं कारण म्हणजे त्वचेची योग्य काळजी न घेणं. मेकअप करण्याआधी चेहरा स्वच्छ न धुणं, स्किन प्रीप न करणं (जसं की मॉइश्चरायझर लावणं, प्रायमर वापरणं), हे सवयी त्वचेला हानीकारक ठरतात....

Health : पावसाळ्यात सततचा सर्दी खोकला त्रास देतोय? मग करा ‘हे’ सोपे उपाय

Image
  पावसाळा सुरु झाला की, सगळ्यानांच आनंद होती. मनुष्यापासून निसर्गापर्यंत सर्वच पावसाची आतुरतेने वाट बघत असतात. असा हा सगळ्यांचा आवडता पाऊस येताना सोबत भरपूर आनंद घेऊन येत असला तरी अनेक आजार देखील घेऊन येतो. पावसाळ्यात वातावरण थंड आणि दमट असते. शिवाय सूर्य देवाचे दर्शन देखील दुर्लभ असते त्यामुळे सगळीकडे केवळ मळभ असते. यामुळे अनेक आजार डोके वर काढतात. पावसाळ्याची नुसती चाहूल लागली तरी डॉक्टरांचे दवाखाने आपल्याला भरलेले दिसायला लागतात. त्यामुळेच पावसाळ्यात आपल्या आरोग्याची नीट काळजी घेणे अत्यावश्यक असते. यासाठी योग्य खानपान गरजेचे असते. (Health) या ऋतूमध्ये होणारा अतिशय सामान्य आजार म्हणजे सर्दी आणि खोकला. वातावरणात थोडा जरी बदल झाला तरी अनेकांना लगेच सर्दी खोकला होतो. काहींना तरी पावसाळ्यात अनेकदा हा त्रास होताना दिसतो. प्रत्येक वेळेस या केवळ सर्दी खोकल्यासाठी कुठे डॉक्टरकडे जावे असे अनेकांचे मत असते. त्यामुळे काही जणं तर घरगुती उपाय शोधतात आणि बरे होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तुमच्या सर्दी, खोकला आणि घसा खवखव यावर घरगुती अतिशय सोपे आणि साधे उपाय सांगणार आहोत. ( Marathi News ) ह...