Posts

Showing posts from November, 2026

‘हॅट्स ऑफ टू इंदिरा गांधी ‘

Image
  एखाद्या माणसाचे नाव कानफाट्या असे पडले की नंतर तो कितीही चांगला वागला अथवा त्याने चांगले काम केले असले तरी त्याची ओळख बदलत नाही आणि त्याच नावाने तो अमर होतो. सार्वजनिक जीवनात अशी ओळख फार महागात पडते. भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान कै. Indira Gandhi यांची पण काहीशी तशीच अवस्था झाली आहे. आणीबाणीच्या काळ्या डागामुळे त्यांचे व्यक्तिमत्व / प्रसिद्धी फार झाकोळून गेली आहे. आणीबाणी त्यांना Fevicol सारखी चिकटून बसली आहे त्यामुळे त्यांनी घेतलेल्या काही कठीण निर्णयांची फारशी चर्चा होताना दिसत नाही.( Indira Gandhi ) ३१ ऑक्टोबर हा त्यांचा स्मृतिदिन. यानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांनी घेतलेल्या काही कठोर निर्णयांची आठवण करून देणे औचित्यपूर्ण ठरेल. Indira Gandhi यांनी बांगलादेशची निर्मिती करण्याचा राजकीय निर्णय घेतला त्याबद्दल भारतीय जनता त्यांची प्रशंसा करते. पण याच युद्धाच्या अनुषंगाने त्यांनी घेतलेल्या एका कावेबाज निर्णयाची फारशी चर्चा होत नाही. बांगला मुक्तीसंग्राम चालू असताना पाकिस्तानची विमाने भारताच्या हवाई हद्दीतून त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानातील आपल्या सैन्याला रसद पुरवत असत...