Posts

Showing posts with the label top marathi news

Sweating : जास्त घाम येण्यामुळे चिडचिड होते मग करा ‘हे’ सोपे उपाय

Image
  उन्हाळा म्हटले की, आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावू लागतात. अति ऊन आपल्या शरीरासाठी अजिबातच चांगले नाही. आपणही जर कडक उन्हात गेलो तर आपल्याला अनेक त्रास होण्याची शक्यता असते. उन्हाळ्यातील त्रास विविध उपाय करून आपल्याला कमी करता येतात. मात्र याच उन्हाळ्यात सगळ्यांना सर्वात जास्त भेडसावणारी आणि डोकेदुखी ठरणारी समस्या म्हणजे ‘घाम’.(Sweating) Marathi News उन्हाळ्यात घाम येणे खूपच सामान्य बाब आहे. सगळ्यांनाच कमी जास्त प्रमाणात घाम येत असतो. मात्र हा घाम खूप त्रासदायक देखील असतो. अति घाम येण्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते, लवकर थकवा जाणवतो, चिडचिड होते. घाम न येण्यासाठी आपण २४ तास एसीमध्ये नाही बसू शकत. मग घाम कमी यावा किंवा येऊच नये यासाठी काही उपाय असतात का? जरी घाम आला तरी त्याचा आपल्याला त्रास होता कामा नये. त्याआधी जाणून घेऊया घाम का येतो? आणि घाम येण्याची कारणं. (Summer News) घाम का येतो? आपल्या त्वचेवर असणाऱ्या घामाच्या ग्रंथी घाम तयार करतात. घामाच्या ग्रंथी ह्या संपूर्ण शरीरावर असतात. मात्र त्यातही प्रामुख्याने त्या कपाळावर, काखेत, हातापायांचे तळव्यांवर जास्त असतात....

Dr. Ambedkar : भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

Image
  आज सर्वत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी इंदोरमध्ये झाला. या दिवसाला भीम जयंती असेही म्हणतात. ‘भारतीय संविधानाचे जनक’ डॉ. भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार नव्हे तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री देखील होते. डॉक्टर आंबेडकर हे अतिशय हुशार व्यक्तिमत्व होते. ते एक कायदेपंडित, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक देखील होते. (Dr. Ambedkar) Todays Marathi News डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांविरुद्धचा भेदभाव दूर करण्यासाठी आणि महिला व कामगारांच्या हक्कांच्या लढण्यासाठी आपले जीवन समर्पित केले, म्हणूनच त्यांच्या जयंतीला ‘समानता दिन’ म्हणूनही ओळखले जाते. आंबेडकरांनी ‘शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा.’ हा महत्वाचा संदेश लोकांना दिला ज्यामुळे आजही अनेकांना प्रेरणा देखील मिळते. (Dr. Ambedkar Jayanti) आंबेडकरांनी जात, वंश, धर्म आणि संस्कृतीचा विचार न करता लोकांना समान अधिकार दिले. त्यांनी दलितांच्या शिक्षण आणि मूलभूत कल्याणासाठीही काम केले. पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक उपलब्ध...

Railway : भारतातील ‘या’ रेल्वे स्टेशवरुन प्रवास करताना लागतो पासपोर्ट

Image
  भारताबाहेर प्रवास आपण विमानानेच करत असतो. आपल्याला जर भारताबाहेर प्रवास करायचा असेल तर सर्वात आधी लागतो तो पासपोर्ट. पासपोर्टशिवाय आपल्याला परदेशात जाता येत नाही. मात्र जर आम्ही तुम्हाला सांगितले की, भारतात असे काही रेल्वे स्टेशन आहेत जिथून प्रवास करण्यासाठी तुमच्याकडे पासपोर्ट असणे आवश्यक आहे…तर? तुम्ही म्हणाल काहीही काय रेल्वेने प्रवास करताना कुठे पासपोर्ट लागतो. आम्हाला वेड्यात काढता का राव? मात्र हे खरे आहे, जेव्हा तुम्ही काही विशिष्ट रेल्वे स्टेशनवरून प्रवास करता तेव्हा तुम्हाला पासपोर्टची गरज पडते. (Railway) अनेक लोकं त्यांना गरज नसते म्हणून पासपोर्ट काढत नाही. कारण त्यांना माहिती ते परदेशात प्रवास करणार नाही. मात्र देशांतर्गत काही ठिकाणी रेल्वेने प्रवास करताना देखील पासपोर्ट लागतो. हे ऐकल्यावर आता अनेकांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी सुद्धा पासपोर्ट काढावा लागेल. जर तुम्हाला देशातील काही विशिष्ट स्टेशनवरून प्रवास करायचा असेल तर आधी पासपोर्ट काढावा लागेल आणि मगच त्या स्टेशनवरून तुम्ही प्रवास करू शकता. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते स्टेशन आहेत. (Indian Railway) पेट्रापोल ...

Passport : नवीन पासपोर्ट काढायचा…? मग ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे

Image
  एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी सर्वात जास्त आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे पासपोर्ट. याच पासपोर्टच्या जोरावर आपल्याला दुसऱ्या देशात प्रवेश मिळतो.  प्रत्येक देश आपल्या देशातील नागरिकांसाठी प्रवास करण्याच्या दृष्टीने एक अधिकृत प्रवास दस्तऐवज, तयार करतो याला पासपोर्ट असे म्हटला. परराष्ट्र मंत्रालयामार्फत परदेश प्रवासासाठी पासपोर्ट जारी केला जात असतो. पासपोर्ट हा ओळखपत्रासह तुमची नागरिकत्व सिद्ध करणारे महत्वाचा पुरावा आहे. पासपोर्ट हा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी त्या नागरिकाची ओळख आणि नागरिकत्व सिद्ध करतो.   (Passport) प्रत्येक देशात पासपोर्ट काढण्यासाठी काही विशिष्ट नियम केलेले असतात. भारतात देखील पासपोर्ट काढण्यासाठी अनेक नियम केले आहेत.  आपल्या देशात पासपोर्ट काढणे बंधनकारक नाहीये. मात्र जेव्हा आपण पासपोर्ट काढतो तेव्हा तो सरकारचे नियम आणि अटी पूर्ण केल्यानंतरच मिळतो. पासपोर्ट काढण्यासाठी मोठी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यानंतर तो मिळतो. (Indian Passport) =============== हे देखील वाचा : Kolhapuri Chappal : सेनापती कापशी चप्पलेचा नेमका इतिहास काय ? ===============...

Bhogi Bhaji भोगीच्या भाजीची पद्धत आणि महत्व

Image
  आज सर्वत्र भोगीचा सण साजरा केला जात आहे. संक्रांतीच्या आधीच एक दिवस हा भोगी (Bhogi) म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवशी प्रत्येक घरामध्ये भोगीची खास पद्धतीचे जेवण बनते. यात सर्वात जास्त आकर्षणाचा पदार्थ असतो तो, भोगीची भाजी. भोगीच्या दिवशी तीळ लावलेल्या भाकऱ्या, भोगीची भाजी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी यांसारखे पौष्टीक पदार्थ तयार तयार केले जातात. (Bhogi Bhaji) या दिवशी भोगीची भाजी केली जाते. भोगी हा सण हिवाळ्यात येतो म्हणून या काळात मिळणाऱ्या अनेक भाज्या एकत्र करून त्यात तीळ टाकून ही भोगीची चविष्ट भाजी बनवली जाते. अनेक भाज्या एकत्र केल्यामुळे ही भाजी अतिशय पौष्टिक आणि सकस बनते. थंडीच्या दिवसात प्रत्येक जणं ही भाजी खातोच. भोगीच्या दिवशी देवाची आणि सूर्याची पूजा करुन भोगीची भाजी, भाकरी आणि खिचडीचा नैवेद्य दाखवून सवाष्णसह सर्वजण एकत्र जेवायला बसतात. जेवणानंतर सवाष्णीला दान- दक्षिणा देण्याचीही पध्दत आहे.  (Makar Sankrant 2025) थंडीच्या दिवसात किंवा हिवाळ्यात भोगीची भाजी खाण्याचे अनेक फायदे शरीराला होतात. मुळातच थंड वातावरण असल्याने आपल्याला थंडीचा आणि याकाळात होणाऱ्य...

लहान-लहान गोष्टीवरुन मुलं रडतात? पालकांनी करा हे काम

Image
  तुमचे मुलं लहान-लहान गोष्टीवरुन रडत असल्यास त्याला भावनात्मक रुपात मजबूत बनवण्यासाठी पालाकांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर... Parenting Tips  : मुलांचे पालनपोषण करणे सोपे नसते. मुलांना प्रत्येक प्रकारे मजबूत बनवणे फार गरजेचे असते. केवळ शारिरीकच नव्हे तर मानसिक दृष्ट्याही मुलं मजबूत असावीत. पण काही मुलांना सतत रडण्याची समस्या असते. यामुळे मुलं काही गोष्टी करण्यासाठीही घाबरात. अशातच मुलांना मजबूत बनवण्यासाठी पालकांनी काय करावे याबद्दल जाणून घेऊया सविस्तर… प्रत्येक काम व्यवस्थितीत होत नसल्यास ज्यावेळी तुमचे मुलं एखाद्या गोष्टीवर रडत असल्यास समजून जा प्रत्येक गोष्ट त्याच्या मनानुसार होत नाहीये. स्थितीसोबत मॅनेज करणे गरजेचे आहे. मुलांना असे शिकवा की, प्रत्येक स्थितीत मजबूत कसे राहायचे. याशिवाय समस्येच्या काळात कसे रिअॅक्ट करावे. मुलाला बोलण्याची संधी द्या काही पालक मुलांना अधिक बोलू देत नाहीत. यामुळेच मुलं त्यांच्या भावना कधीच मोकळेपणाने सांगू शकत नाहीत. अशातच मुलं भावनात्मक मजबूत होत नाहीत. यामुळे मुलांना बोलण्याची संधी द्या. आत्मविश्वास वाढव...

राष्ट्रध्यक्षांच्या निधनानंतर इराणमध्ये आनंदोत्सव का झाला ?

Image
  इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री प्रवास करीत असलेल्या हेलिकॉप्टरला अपघात झाला असून या अपघातात राष्ट्राध्यक्ष रायसी आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांचा मृत्यू झाला.  ही बातमी आली आणि जगभर हळहळ व्यक्त करण्यात आली.  मात्र ज्या इराणचे राष्ट्राध्यक्ष विमान अपघातात गेले, त्या इराणमध्ये काय परिस्थिती होती, हे जाणून घ्याल तर आश्चर्यचकीत व्हाल.  कारण इराणच्या काही भागात राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या मृत्यू झाल्याची बातमी आली आणि आनंदोत्सव साजरा करण्यात आला.  इराणमध्ये अनेक ठिकाणी लोक उत्सव साजरा करतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत.  राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू झाल्यानं या नागरिकांनी आनंद व्यक्त करीत फटाकेही फोडले आहेत. (Iran)   इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांचे निकटवर्तीय असलेले इब्राहिम रायसी यांच्या अपघाती मृत्युने अनेकांना धक्का बसला आहे.  हा अपघात की घातपात अशी शंकाही व्यक्त केली जाऊ लागली आहे.  यातील पहिली शंका इस्त्रायलवर घेण्यात आली.  मात्र इब्राहिम रायसी यांना त्यांच्याच देशातूनही टोक...