Posts

Showing posts with the label top marathi headlines

Tulshi Care : डेरेदार तुळशीसाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Image
  भारतात प्रत्येकाच्याच घराबाहेर आपल्याला तुळशी दिसतेच. घरात प्रवेश करण्यापूर्वी तुळशीचे दर्शन घेतले जाते. तुळशी ही हिंदू धर्मीय लोकांच्या एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे. तुळशीला जेवढे धार्मिक महत्त्व आहे, तेवढेच वैद्यकीय महत्त्व देखील आहे. घरासमोर तुळशी लावणे पवित्र समजले जाते. त्यामुळे सगळेच लोकं आपल्या घरात तुळशी लावतात. जुन्या ग्रंथांमधील माहितीनुसार या तुळशीचा साधारण तीन हजार वर्षांहून अधिक समृद्ध इतिहास आहे. तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचाही वास असतो. (Tulshi Care) Latest Marathi News तुळशीचे रोप घरात लावल्याने वातावरण शुद्ध होते, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्यामुळे अनेक आरोग्य फायदे देखील मिळतात. मात्र अनेक घरांमध्ये तुळशी कितीही वेळा लावली तरी ती जास्त काळ जगत नाही. लावल्यानंतर काही दिवसातच ती कोरडी पडते, तिला कीड लागते किंवा जळून जाते. अनेक उपाय करून खत टाकून देखील तुळशी अपेक्षेप्रमाणे जगत नाही. आता अनेक घरांमध्ये तुळशीच्या लग्नाच्या दृष्टीने तुळशी लावली जाईल तेव्हा तिची निगा कशी राखावी? काय टिप्स फॉलो कराव्या जेणेकरून तुळशी खराब होणार नाही आणि चांगली बहरेल? चला जाणून घेऊया. (Marath...

Shiv Mandir : ‘या’ मंदिराच्या दगडांमधून येतो रहस्यमयी डमरूचा आवाज

Image
  मंदिरांचा देश अशी ओळख असलेल्या भारतामध्ये नानाविध प्रकारचे असंख्य मंदिरं आहेत. मुख्य म्हणजे भारतातील सर्वच मंदिरांची जगामध्ये भरपूर चर्चा होताना दिसते. आपल्याकडील प्रत्येक मंदिर हे खूपच खास आणि वैशिट्यपूर्ण आहे. प्रत्येक पुरातन मंदिराला एक खास पौराणिक इतिहास देखील आहे. याचमुळे या मंदिरांचे महत्त्व अधिकच वाढते. अनेक मंदिरं तर त्यांच्या रहस्यमयी गोष्टींसाठी चर्चेत येत असतात. जुन्या मंदिरांबद्दल बोलायचे झाले तर या मंदिरांचे बांधकाम आणि अचंभित करणाऱ्या गोष्टी कायम सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. यातलेच एक प्रसिद्ध आणि आकर्षक मंदिर म्हणजे, जाटोली शिव मंदिर. (Lord shiva) Top Marathi Headlines भारताच्या सर्वात उंच टोकावर अर्थात हिमाचल प्रदेश राज्यात हे जाटोली शिव मंदिर स्थित आहे. भगवान शंकराला समर्पित असलेले हे मंदिर रहस्यमयी मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. या मंदिरांमध्ये असे काही रहस्य आहे ज्यामुळे ते जगभर प्रसिद्ध आहे. जटोली शिव मंदिर, जे आशियातील सर्वात उंच शिव मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात आहे. या मंदिराच्या दगडांवर आघात केल्यास डमरूसारखा आवाज ये...

Hindu Festival : हिंदू सणांवेळी मास-मीटची दुकाने बंद करायचा हा मुघल बादशाह

Image
  Hindu Festival :  मुघल साम्राज्य हे भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या विविधतेने समृद्ध राज्य होते. या काळात मुस्लिम सम्राट असले तरी त्यांनी हिंदू लोकांच्या धार्मिक भावना आणि सणांचे महत्त्व जाणून त्यांचा आदर केला. त्यातीलच एक उल्लेखनीय निर्णय म्हणजे, हिंदू सणांच्या दिवशी मास-मांस विक्री करणाऱ्या दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देणे. या निर्णयामुळे हिंदू लोकांना सणाच्या काळात उपास्याची आणि धार्मिक कृतीची सोय झाली. Top stories इतिहासकारांच्या नोंदींनुसार, अकबर हा मुघल सम्राट आपल्या राज्यातील सर्व धर्मांप्रती संवेदनशील होता. त्याने विविध धर्मातील लोकांशी संवाद साधला आणि त्यांची परंपरा जाणून घेतली. हिंदू सण, जसे की दिवाळी, होळी, नवरात्री, आदि या काळात लोक उपास करीत किंवा विशेष धार्मिक विधी करीत असत. त्या काळात मास-मांस विकणे किंवा त्याचा वापर करणे अनेक धार्मिक विश्वासांनुसार वर्ज्य मानले जात असे. अकबराने या धार्मिक भावना जपून सणांच्या काळात मास-मांस विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिले. हा निर्णय केवळ धार्मिक भावना जपण्यासाठी नव्हे, तर सामाजिक शांतता राखण्यासाठीही महत्त्वाचा होता...

Uttarakhand : हरिद्वार अर्धकुंभमेळ्याचा खर्च उत्तराखंडमधील आपत्तीग्रस्तांना !

Image
  हिंदू धर्मात कुंभमेळ्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. अर्धकुंभ, पूर्ण कुंभ आणि महाकुंभ असे होणारे हे कुंभमेळे ज्योतिषशास्त्रीय गणनेवर आधारित असतात. पवित्र नद्यांच्या संगमस्थानावर त्यांचे आयोजन केले जाते. उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभमेळ्यामध्ये तर जागतिक स्वरुपाचे विक्रम झाले. संपूर्ण जगभरातून भाविक या महाकुंभसाठी प्रयागराजमध्ये आले होते. आता 2027 मध्ये उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये अर्धकुंभमेळा होणार आहे. (Uttarakhand) Latest Marathi News या अर्धकुंभ मेळ्याची तारीख नुकतीच साधुसंत आणि आख्याड्यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. 6 मार्च 2027 रोजी महाशिवरात्री उत्सवाच्या पवित्र दिवशी या अर्धकुंभ मेळ्याचा प्रारंभ हरिद्वारमध्ये होणार आहे. उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद वर्धन यांनी हरिद्वारच्या प्रमुख देवता मायापूर, देवी मायादेवी मंदिर आणि भैरव मंदिरात पूजा करुन या अर्धकुंभ मेळा आणि लवकरच सुरू होणाऱ्या छडी यात्रेची तारीख जाहीर केली. यासोबत हरिद्वारमध्ये होणाऱ्या या मेळ्यामध्ये महत्त्वाच्या दोन घोषणा करण्यात आल्या, त्यामुळे सर्वत्र अर्धकुंभ मेळा आयोजनात महत्त्वाची भूमिका पार...

Radha : राधा अष्टमीचे व्रत म्हणजे काय? कधी केले जाते हे व्रत?

Image
  श्रीकृष्ण आणि राधा यांचे नाते संपूर्ण जगाला माहित आहे. राधाशिवाय श्रीकृष्ण अपूर्ण तर श्रीकृष्णाशिवाय राधा अपूर्ण आहे. श्रीकृष्णाची बायको जरी रुक्मिणी असली तरी श्रीकृष्णासोबत मंदिरात स्थान मात्र राधाला आहे. प्रेम, आदर, विश्वास, त्याग असे अशा सर्वच भावनांवर आधारित या दोघांचे अनोखे नाते आपल्याला पाहायला मिळते. नुकताच आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आपण सर्वानी मोठ्या जल्लोषात आणि आनंदात साजरा केला. श्रीकृष्ण जन्माष्टमी झाल्यानंतर पंधरा दिवसांनी अर्थात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या आठव्या तिथीला राधाअष्टमी साजरी केली जाते. (Marathi) राधाअष्टमीच्या दिवशी राधा राणीची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. राधाअष्टमी म्हणजे राधाचा जन्मदिन. श्रीकृष्णांच्या जन्मानंतर पंधरा दिवसांनी राधारांनीच जन्म झाला आहे. राधाअष्टमीचा खास दिवस संपूर्ण देशात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. खासकरून राधा राणीचे जन्मस्थान असलेल्या बरसाना येथे तर या दिवशी उत्सवाचे वातावरण असते. राधाअष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी यांची पूजा केली जाते. मान्यता आहे की, राधा राणीची पूजा केल्याने दीर्घायुष...

Stray Dogs : दिल्ली सरकारला सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांबाबत दिला मोठा आदेश

Image
  सध्या देशातील दोन महानगरांमधील कबुतरं आणि कुत्रे हे दोन मुद्दे देशभर कमालीचे गाजत आहे. मुंबईच्या दादरमधील कबुतरखान्यावरील बंदी उठवण्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोकावे लागले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर ही बंदी उठवण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. दिवसाचा ठराविक वेळ कबुतरांना खाद्य देण्याची परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली होती. याच मागणीसंदर्भात न्यायालयाने निर्णय देताना आपला याआधीचा निर्णय कायम ठेवला असून तुर्तास तरी कबुतरखान्यांवरील बंदी कायम राहणार आहे. (Marathi) तर आता दुसरीकडे दिल्लीमधील भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आहे. सुप्रीम कोर्टाने दिल्ली-एनसीआर भागातील भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहेत. येत्या ८ आठवड्यात या सर्व भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवावे आणि या कारवाईमध्ये कोणी अडथळा आणल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे देखील सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. ( Marathi News ) दिल्लीत भटके कुत्रे चावल्याने अनेक नागरिकांना रेबीज झाल्याचे प्रकरण समोर आले होते....

MV Derbyshire : ते जहाज समुद्रात गायब झालं आणि २० वर्षानंतर…

Image
  1980 जपान जवळचं साउथ चायना सी, रात्रीच्या अंधारात या समुद्रात भयंकर वादळ आलं आहे. लाटा इतक्या उंच उसळतायत की त्या काही मजली इमारती एवढ्या आहेत. पण या लाटांमध्ये सुद्धा एक जहाज जपानच्या दिशेने पुढे सरकतंय त्याचं नाव आहे एमव्ही डर्बीशायर . 1000 फूट लांबीचं हे जहाज टायटॅनिकपेक्षाही मोठं आहे. जपानच्या दिशेने निघालेलं हे कार्गो जहाज, ज्यामध्ये कॅप्टन जोफ्री अंडरहिल यांच्यासह 44 जण आहेत. जहाज वादळात मोठमोठ्या लाटांवर आदळतंय, पण त्याला अशा परिस्थितीसाठीच डिझाइन केलं होतं. त्यामुळे कुणालाही काळजी वाटत नव्हती. पण अचानक काहीतरी विचित्र घडतं. Latest Marathi News असं काही, ज्यावर क्रू मेंबर्सपासून ते जगातल्या कोणत्याही माणसाला विश्वास ठेवणं अशक्य होतं. वादळाच्या मध्येच एक प्रचंड मोठी लाट तयार होते. जहाज त्या लाटेवर आदळताच, सगळं काही शांत होतं. कारण हे जहाज, त्यातल्या 44 जणांसह, रहस्यमय रीतीने कुठेतरी गायब होतं. ना कोणता SOS सिग्नल, ना कोणताही पुरावा. ब्रिटिश नेव्ही, जपानी कोस्ट गार्ड आणि अमेरिकन मिलिट्री मिळून कित्येक महिने या जहाजाचा शोध घेतात, पण काहीच सापडत नाही. पण सुमारे 20 वर्षांनंतर,...