Tulshi Care : डेरेदार तुळशीसाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

 

भारतात प्रत्येकाच्याच घराबाहेर आपल्याला तुळशी दिसतेच. घरात प्रवेश करण्यापूर्वी तुळशीचे दर्शन घेतले जाते. तुळशी ही हिंदू धर्मीय लोकांच्या एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे. तुळशीला जेवढे धार्मिक महत्त्व आहे, तेवढेच वैद्यकीय महत्त्व देखील आहे. घरासमोर तुळशी लावणे पवित्र समजले जाते. त्यामुळे सगळेच लोकं आपल्या घरात तुळशी लावतात. जुन्या ग्रंथांमधील माहितीनुसार या तुळशीचा साधारण तीन हजार वर्षांहून अधिक समृद्ध इतिहास आहे. तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचाही वास असतो. (Tulshi Care) Latest Marathi News

तुळशीचे रोप घरात लावल्याने वातावरण शुद्ध होते, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्यामुळे अनेक आरोग्य फायदे देखील मिळतात. मात्र अनेक घरांमध्ये तुळशी कितीही वेळा लावली तरी ती जास्त काळ जगत नाही. लावल्यानंतर काही दिवसातच ती कोरडी पडते, तिला कीड लागते किंवा जळून जाते. अनेक उपाय करून खत टाकून देखील तुळशी अपेक्षेप्रमाणे जगत नाही. आता अनेक घरांमध्ये तुळशीच्या लग्नाच्या दृष्टीने तुळशी लावली जाईल तेव्हा तिची निगा कशी राखावी? काय टिप्स फॉलो कराव्या जेणेकरून तुळशी खराब होणार नाही आणि चांगली बहरेल? चला जाणून घेऊया. (Marathi)

तुळस का होते याची माहिती आधी जाणून घेऊया. तुळशी खराब होण्याची काही प्रमुख कारणं आहेत. ज्यात तुळशीच्या झाडाला कीड लागणे अथवा या रोपावर किटकांचा अटॅक होणे, तुळशीला अधिक पाणी दिल्याने तुळशीचे मूळ खराब होणे, तुळशीला पोषक माती मिळाली नसल्यास किंवा तुळशीच्या पानाला अधिक मंजिरी आल्यास, पानांची वाढ होत नाही. शिवाय तुळशीचे रोपटे ज्या कुंडीत लावले आहे ते लहान असल्यास देखील तुळशी नीट वाढत नाही. (Marathi News)

– तुळशीच्या रोपाला योग्य सूर्यप्रकाश देणे आवश्यक असले तरी उन्हाळ्यात जास्त सूर्यप्रकाश तुळशीच्या रोपाला नुकसान पोहोचवू शकतो. अशा परिस्थितीत तुळशीचे रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे सकाळचा सौम्य सूर्यप्रकाश मिळेल आणि दुपारच्या तीव्र सूर्यप्रकाशापासून रोपाचे संरक्षण होईल. तसेच तुमच्या घराच्या अंगणात तुळशीचे रोप उघड्यावर ठेवले असेल तर सावलीसाठी हिरव्या जाळ्याचा वापर करा. अशाने तुळशीच्या रोपाला तीव्र सुर्यप्रकाशापासुन सरंक्षण होईल. (Top Marathi Headline)
– तुळशीच्या रोपांना पाण्याची गरज जास्त असते. परंतु जास्त पाणी दिल्यास तुळशीची मुळे कुजू शकतात. त्यामुळे या झाडाला दिवसातून दोनदा सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्यावे. याशिवाय, कुंडीतील माती तपासा. माती कोरडी वाटली तरच पाणी घाला. तुळशीच्या पानांवर हलके पाण्याची फवारणी करा, यामुळे पाने हिरवी आणि ताजी राहतील. (Todays Marathi Headline)

Tulshi Care
– सर्व सुकलेली किंवा खराब झालेल्या पाने आणि फांद्या कापून टाका. असं केल्यानं झाडाची ऊर्जा नवीन पाने तयार करण्यासाठी वापरण्यास मदत होईल. तसंच यामुळे हवेचे अभिसरण सुधारण्यास देखील मदत होईल. (Top Marathi Headline)
– तुळशी ही एक औषधी वनस्पती आहे जी खताशिवाय चांगली वाढते. म्हणून, उन्हाळ्यात खत न देणे चांगले. जास्त उष्णता रोपाला ताण देऊ शकते. यावेळी खत दिल्यास पानांचे नुकसान होऊ शकते आणि झाडांची वाढ खुंटू शकते.
– हिवाळ्याच्या दिवसांमध्ये संध्याकाळी तापमान कमी व्हायला सुरू होते. यादरम्यान दव देखील पडते. दवापासून वाचवण्यासाठी तुळशीला सूती कापड्याने कव्हर करा. कपड्याचे शेड देखील तुळशीच्या रोपट्यावर लावू शकता. एवढेच नव्हे तर ज्या कुंडीत रोपटं लावले आहे त्या कुंडीच्या मातीला कोरडे गवत किंवा पेंढ्याने झाकून द्यावं, या मुळे रोपट्याला उब मिळेल. (Latest Marathi Headline)
– गायीचे शेणखत, कंपोस्ट किंवा घरगुती ओल्या कचऱ्यापासून तयार केलेले खत तुळशीसाठी सर्वोत्तम मानले जाते. पण शहरी ठिकाणी या गोष्टी सहसा मिळणं कठीण आहे त्यामुळे बाजारातील खताचा वापर करा.
– तुळशीच्या रोपाला चांगल्या वाढीसाठी सुपीक आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी माती आवश्यक असते. अशा परिस्थितीत, शेणखत, सेंद्रिय खत आणि वाळू मिसळून माती हलकी आणि सुपीक बनवा. तुळशीच्या कुंडीत दर १५ दिवसांनी खत घाला, जेणेकरून झाडाला आवश्यक पोषण मिळत राहील. जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पानांचा थर किंवा वाळलेल्या गवताने जमिन झाकून ठेवा. (Top Marathi News)
– पाण्यात हळद मिसळून त्याचे स्प्रे तयार करा आणि दर २ दिवसातून तुळशीच्या पानावर या मिश्रणाची फवारणी करा. असं केल्याने रोपट्याला लागलेले कीटक मरतात.
– पाण्यात गोमूत्र घालून देखील या मिश्रणाची फवारणी करू शकता गोमूत्रामध्ये अँटीऑक्सीडेन्ट असतात जे तुळशीच्या रोपट्याचा पेशींना बळकट करतात, ज्यामुळे रोपटं हिरवेगार राहतो.
– रोपट्यातून मंजरी निघतांनाच त्यांना काढून टाकावे. मंजरी ही रोपट्याची वाढ खुंटवते. तज्ज्ञांनी सांगितलेल्या या टिप्स वापरून बघा आणि तुळशीच्या रोपट्याला हिवाळ्यात खराब होण्यापासून टाळा. (Top Trending Headline)
– तुळशीपासून कीटकांना दूर ठेवण्यासाठी, महिन्यातून एक किंवा दोनदा कडुलिंबाची पाने आणि पाण्याचे मिश्रण तयार करून झाडावर फवारणी करा. हे झाडावरील कीटकांना दूर करण्यास मदत करतात. तसंच हे मिश्रण कीटक आणि माश्यांमुळे पानांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी देखील फायदेशीर आहे.

=========

Tulshi Vivah : यंदा तुळशी विवाह कधी आहे? जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त

Tulshi Vivah : जाणून घ्या तुळशी विवाहाचे महत्त्व आणि कथा

=========
– तुळस जेव्हा तुम्ही लावणार असाल तेव्हा तुळशीसाठी नेहमी खोलगट कुंडीचा वापर करावा. १२ इंचाची झाडाची कुंडी तुळशीसाठी योग्य ठरते. तुळस उगविण्यासाठी यामध्ये अधिक जागा मिळते आणि हवाही मिळते. जर कुंडी लहान असेल तर तुळस व्यवस्थित उगवू शकत नाही. (Top Stories)
– जेव्हा तुळशीचे झाड घनदाट वाढत नाही तेव्हा त्याचे प्रूनिंग अथवा कटिंग करावे लागते. तुम्ही तुळशीच्या फांद्या थोड्या थोड्या कापाव्यात. फांद्या प्रूनिंग केल्यामुळे झाड अधिक घनदाट होते. हे न केल्यास, झाड उंच वाढेल मात्र त्याला घनदाटता मिळणार नाही हे लक्षात घ्या.
– उन्हाळ्यात तुळशीच्या रोपाला साधारणपणे ४ ते ५ तास सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. जर ते या मर्यादेपेक्षा जास्त झालं तर तुळशीचं रोप जळू शकतं. तुळशीचं रोप अशा ठिकाणी ठेवलं असेल, जिथे दिवसभर सूर्यप्रकाश पडतो तर तुळशीच्या भांड्याचं स्थान बदला. असे केल्यानं रोप चांगलं वाढेल आणि कोरडं होण्यापासून वाचेल.
– हिवाळ्यात तुळशीला कोरडे पडण्यापासून वाचवण्यासाठी अगरबत्ती किंवा त्याच्याजवळील दिवा लावणे देखील फायदेशीर ठरते. ते झाडाला उबदारपणा देते, जेणेकरून ते लवकर कोमजत नाही. (Social News) Top Marathi Headlines

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Original content is posted on https://gajawaja.in/how-to-take-care-of-basil-aka-tulshi/






Comments

Popular posts from this blog

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Holi : जाणून घ्या होळीमध्ये नारळ का अर्पण करण्यामागचे कारण

Vasant Panchami देवी सरस्वतीचा जन्मदिन – वसंतपंचमी