Marathi : प्रसिद्ध अभिनेत्रीचे मराठी इंडस्ट्रीमधल्या ग्रुपिझमवर थेट भाष्य
मनोरंजनविश्वाबद्दल कायमच सामान्य लोकांना अप्रूप असते. या इंडस्ट्रीमध्ये कलाकरांना मिळणारे फेम, पैसा, ग्लॅमर आदी अनेक गोष्टी लोकांना आकर्षित करतात. कलाकारांबद्दल देखील लोकांना कायमच हेवा वाटत असतो. त्यांचे ग्लॅमरस जीवन आणि मजा पाहून आपणही याच क्षेत्रात करियर करावे असा अनेकांचा मानस असतो. मात्र बाहेर हे जग कितीही आकर्षक आणि सुंदर दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र या क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांनाच यात असणाऱ्या समस्या, आव्हानं माहित असतात. अनेकदा काही कलाकार या क्षेत्राची दुसरी बाजू मांडताना दिसतात. जशा एका नाण्याला दोन बाजू असतात तशाचा दोन बाजू या क्षेत्राला देखील आहेत. (Marathi News) Latest Marathi Headlines नुकतेच मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भार्गवी चिरमुलेने एका मुलाखतीमध्ये ग्रुपिझमबद्दल भाष्य केले आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ग्रुपिझम अनेकदा समोर आला आहे. अनेक बॉलिवूड कलाकार बिधास्त यावर भाष्य करत इंडस्ट्रीमधील ग्रुपिझम किती चुकीचा, वाईट आणि इतर कलाकारांसाठी घटक आहे याबद्दल सांगतात. मात्र आता हेच ग्रुपिझम मराठी मनोरंजन सृष्टीमध...