Posts

Showing posts with the label Entertainment

Shravan : सूर्यदेवाच्या रथाला असलेल्या 7 घोड्यांचे रहस्य

Image
आज श्रावणातील रविवार. तसे पाहिले तर आपल्या सर्व सामान्य लोकांसाठी रविवार हा आरामासाठी राखीव असतो. या दिवशी शाळा, ऑफिसेसला सुट्टी असल्याने हा दिवस अतिशय संथ असतो. पण हा दिवस धार्मिक दृष्ट्या खूपच महत्त्वाचा मानला जातो. याचे कारण म्हणजे यादिवशी सूर्य उपासनेला मोठे महत्त्व देण्यात आले आहे. हिंदू धर्मात सूर्यदेवांना प्रत्यक्ष दिसणारे देव मानले जाते, जे आरोग्य, तेज आणि सकारात्मक ऊर्जा देतात. त्यांची पूजा केल्याने आरोग्य लाभतो, असे मानले जाते, आणि सूर्यप्रकाशाशिवाय पृथ्वीवर जीवन शक्य नाही. धार्मिक मान्यतेनुसार आणि पौराणिक कथांनुसार सूर्यदेव कायम त्यांच्या रथावर स्वार होऊन प्रवास करत असतात. सूर्य देवांचा रथ हा घोड्यांचा असून त्यांच्या रथाला सात घोड्यांची साथ असते. मात्र आपण कधी याचा विचार केला आहे का की सूर्यदेवाच्या रथाला ७ घोडेच का असतात? (lord Surya) पुराणांमधील माहितीनुसार सूर्यदेवाच्या रथाला जोडलेले सात घोडे आठवड्याच्या सात दिवसांचे प्रतीक आहेत. याचा अर्थ असा की सूर्यदेव सतत गतीमध्ये राहून काळाचे चक्र नियंत्रित करतो. सात घोड्यांच्या रंगात सूक्ष्म फरक आहे,अरुण देव त्यांचा लगाम सांभाळतात. ...