Posts

Showing posts from July, 2026

Maharshi Vyas : पांडव आणि कौरव यांच्याशी जवळचा संबंध असलेल्या महर्षी व्यासांची जन्मकथा

आज गुरुपौर्णिमा. आपल्या आयुष्याला योग्य दिशा दाखवणाऱ्या, अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या आध्यात्मिक आणि प्रापंचिक गुरूंचे पूजन केले जाते. आई-वडिलांना मुलांचे पहिले गुरु मानले जाते, त्यामुळे या दिवशी आई-वडिलांचा व मोठ्यांचा आशीर्वाद घेतला जातो. गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आषाढ महिन्यातील पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा म्हटले जाते. याच दिवशी द्वापर युगात याच तिथीला महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला असे मानले जाते. त्यामुळेच गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हटले जाते. महाभारताचे लेखन केलेले महर्षी व्यास म्हणजे ज्ञानाचा सागर. व्यास ऋषींना भगवान विष्णूचा अवतार देखील मानले जाते. याच महर्षी व्यास यांच्या जन्माची कथा देखील खूपच रंजक आहे. कौरव आणि पांडवांच्या जन्मांच्या अगोदर पासून महाभारतात त्यांचे अस्तित्व आहे. व्यास हे कौरव आणि पांडवांचे आजोबा तर पांडू आणि धृतराष्ट्राचा वडील आहेत.  पितामह भीष्म हे आठ शापित वसुंपैकी एक होते. राजा शंतनू आणि गंगा यांना पुत्रप्राप्तीमध्ये भीष्म झाले होते. पुत्रप्राप्ती होताच गंगा त्यांना मारून टाकायची पण शेवटचा वसू उरला...

Health : शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे जवस; फायदे वाचून तुम्ही देखील व्हाल चकित

सध्याच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य उत्तम राखण्याचे अतिशय महत्त्वाचे आणि कठीण काम आपल्याला पूर्ण करणे गरजेचे झाले आहे. अनेकांच्या मते उत्तम आरोग्य तेव्हाच राखले जाते जेव्हा तुम्ही नियमित योग्य व्यायाम करतात. पण निरोगी आरोग्यासाठी जेवढा व्यायाम गरजेचा आहे, त्याहून थोडा जास्त गरजेचा योग्य आणि सकस आहार आहे. जर तुम्ही पौष्टिक आणि सकस आहार घेतला तर नक्कीच तुम्ही निरोगी राहण्याच्या दिशेने वाटचाल करू शकता. आपला भारतीय आहार बऱ्याच लोकांना जड आणि अस्वास्थ्यकर, हानिकारक वाटतो. मात्र हे चुकीचे आहे. कारण भारतासारखा शरीराला आवश्यक असलेल्या सर्व सकस गोष्टींनी समृद्ध आणि परिपूर्ण आहार दुसऱ्या कोणत्याच देशात मिळणार नाही. भारतीयांच्या जेवणाच्या ताटातील तशी बऱ्यापैकी दुर्लक्षित गोष्ट म्हणजे, जवस. तरुण पिढी आणि आजची जेनझी पिढी तर जवस पाहूनच नाक मुरडते. अनेकांना जवस म्हणजे काय? हे देखील माहिती नसेल. आज आपण याच जवस खाण्याचे शरीराला होणारे विविध लाभ कोणते हेच जाणून घेणार आहोत. जवसाला सुपरफूड मानले जाते. त्याच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. जवस अतिशय उष्ण असतात, त्यामुळे खाताना त्याचं प्रमाण नेहमी लक...

Jagannath Puri : जग्गनाथ मंदिरात अविवाहित जोडप्यांना का आहे प्रवेश निषिद्ध?

  काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध अशा जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात झाली आहे. चारधामपैकी एक महत्त्वाचे धाम असलेल्या पुरी येथील जगन्नाथ मंदिरात दरवर्षी महाप्रभु जगन्नाथ त्यांचे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांना रथामध्ये बसून शहराची सफर घडवली जाते. हा रथोत्सवाचा सोहळा बघणे नशिबाचाच एक भाग समजला जातो. संपूर्ण वर्षभर भाविक या रथयात्रेची वाट बघत असतात. रथयात्रेच्या अनेक दिवस आधीच या भव्य यात्रेची तयारी सुरु होती. दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवसापासून ही रथयात्रा आयोजित केली जाते. या काळात भगवान जगन्नाथ त्यांचे मोठे भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत रथावर विराजमान असतात. भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातूनआणि परदेशातूनही भाविक येतात. मान्यता आहे की, या जगन्नाथ रथयात्रेत भाग घेतल्याने १०० यज्ञ केल्यासारखे फळ मिळते. मात्र या जग्गनाथ मंदिराबाबत अनेक मान्यता आणि रीती प्रचलित आहेत. या मंदिरातील अनेक जुन्या परंपरा आजही तेवढ्याच नेटाने पाळल्या जातात. यातलीच एक प्रथा म्हणजे भगवान जग्गनाथ यांच्या मंदिरामध्ये अविवाहित जोडप्यांना जाण्यात बंदी आ...

Ashadhi Ekadshi : ‘या’ चविष्ट रेसिपी करून यंदाची आषाढी एकादशी करा अधिकच खास

दोनच दिवसांवर आषाढी एकादशी आली आहे. महत्वाची एकादशी असल्याने या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक घरी उपवास केला जातो. एकादशीचा उपवास असल्याने दोन्ही वेळेस फराळाचेच खाल्ले जाते. आता उपवास म्हटल्यावर साबुदाणा, भगर हेच सर्वात आधी डोळ्यासमोर येते. मात्र आता उपवासाच्या पदार्थांमध्ये देखील खूपच व्हरायटी आलेली दिसते. उपवासाच्या गोष्टींचा वापर करून विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ केले जातात. उपवासाच्या दिवशी दोन्ही वेळेला तेचतेच खाऊन कंटाळा येत असले तर यंदाच्या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही नक्कीच खाली दिलेल्या नवीन उपवासाच्या रेसिपी ट्राय करू शकता.  उपवासाची बटाटा भाजी साहित्य : 1 चमचा तूप/ तेल, 1/2 चमचा जिरे, 2 चमचे हिरवी मिरची-आले पेस्ट, उकडून सोलून चिरून घेतलेले बटाटे, भाजलेले शेंगदाण्याचे कुट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर कृती : कढईत तूप किंवा तेल गरम करा आणि त्यात जिरे घाला. जिरे तडतडायला लागले की त्यात हिरवी मिरची-आले पेस्ट घालून एक मिनिट परतून घ्या. बटाटे, भाजलेल्या शेंगदाण्याचे कुट पूड, मीठ घाला आणि सुमारे 4-5 मिनिटे परतून घ्या कोथिंबीर घाला आणि उपवासाची बटाटा भाजी तयार आहे....

Lord Vitthal : भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात अवतरले तरी कसे?

वर्षभरातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची एकादशी म्हणजे, आषाढी एकादशी. आषाढ महिन्यात येणारी ही एकादशी म्हणजे, पंढरपूरची वारी. आषाढी एकादशी आणि पंढरपूरची वारी हे समीकरण मागील अनेक दशकांपासून चालत आले आहे. वारीला हजारो वर्षांची परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील पंढरपूर येथे वास्तव करणारा पांडुरंग हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. पांडुरंग म्हणजे खुद्द भगवान कृष्ण. दर आषाढी एकादशीला येथे वैष्णवांचा मेळा भरतो आणि आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोकं पंढरपूरमध्ये जमतात. हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करून हे सर्व वारकरी एकादशीला आपल्या देवाचे दर्शन घेतात. मात्र पंढरपूरमध्ये विठ्ठल आले कसे याबद्दल एक कथा सांगितली जाते. आई-वडिलांच्या निस्सीम सेवेमुळे पुंडलिकाच्या भेटीसाठी खुद्द भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात चंद्रभागेच्या तीरावर असलेल्या पंढरपुरात आले. मात्र आई वडिलांच्या सेवेमध्ये व्यस्त असलेल्या पुंडलिकाने देवाला मी आईवडिलांची सेवा करून झाली की येतो असे सांगून त्यांना उभे राहण्यासाठी एक विट दिली. याच विटेवर देव अजूनही उभा आहे.   याची कथा म्हणजे, सहाव्या शतकामध्ये महाराष्ट्रातील पं...

Rathyatra : भगवान जग्गनाथांच्या मोठ्या डोळ्यामागे आहे एक खास कारण

  सध्या जग्गनाथ पुरीमध्ये महाप्रभु जग्गनाथांचा रथोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात सुरु आहे. पुरी मंदिरापासून गुंडीच्या मंदिरापर्यंत जाते. हे मंदिर भगवान जग्गनाथच्या मावशीचे मंदिर असल्याचे सांगितले जाते. या मंदिरात प्रभू काही दिवस थांबतात आणि नंतर थोड्या दिवसांनी पुन्हा आपल्या घरी परतात. या उत्सवात भगवान जगन्नाथ (श्रीकृष्ण), त्यांचे बंधू बलभद्र (बलराम) आणि बहीण सुभद्रा हे तीन स्वतंत्र रथांमध्ये विराजमान होऊन गुंडिचा मंदिरात जातात. हिंदू मान्यतेनुसार, तिन्ही रथांपैकी कोणत्याही एका रथाची दोरी हाताने ओढल्यास सर्व पापांचे निवारण होते आणि अश्वमेध यज्ञासारखे पुण्य प्राप्त होते. आपण जर पुरीच्या जग्गनाथ मंदिरातील महाप्रभूंची मूर्ती पाहिली तर आपल्याला ही मूर्ती जरा अपूर्ण वाटते आणि मूर्तीचे डोळे देखील मोठे आहेत. या दोन्ही गोष्टींमागे एक खास शास्त्र सांगितले जाते ते काय पाहूया.   भगवान जगन्नाथांचे मोठे डोळे त्यांच्या सर्वज्ञता, ज्ञान, करुणा आणि दया यांचे प्रतीक मानले जातात. यातून भगवान सर्वकाही पाहतात. या मोठ्या डोळ्यांनी, जगन्नाथजी त्यांच्या भक्तांना आणि त्यांच्या भावनांना मनापासून पाहू शकतात...

Gary Sobers : गॅरी सोबर्स -एका अख्यायिकेचा अंत

काही दिवसापूर्वी ABP Majha Sanman Puraskar चा सोहळा दूरदर्शनवर पाहिला. या सोहळ्यात Sunil Gavaskar यांना इतर अनेक मान्यवरांबरोबर गौरवण्यात आले. आपल्या भाषणात गावसकरांनी Sir Gary Sobers यांचे मुद्दाम आभार मानले. गावसकर म्हणाले की १९७१ मध्ये Port of Spain ( Trinidad ) येथे ते आपल्या कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना खेळत असताना १२ धावांवर त्यांचा अतिशय सोपा झेल सोबर्स यांनी सोडला. हे जीवदान West Indies ला फारच महागात पडले कारण त्यानंतर सुनील गावसकर नावाच्या ताऱ्याचा क्रिकेट आसमंतात उदय झाला आणि भविष्यात या ताऱ्याच्या दिव्य तेजाने सगळ्यात जास्त होरपळून निघाला तो वेस्ट इंडiesचा संघ. त्यानंतरच्या कसोटीत गावसकर ४ रन्सवर खेळत असताना सोबर्सने पुन्हा एकदा त्यांचा झेल सोडला आणि गावसकरांनी आपले पहिले कसोटी शतक झळकावले. या दोन जीवदानांमुळे गावसकरांच्या क्रिकेट कारकिर्दीला कलाटणी मिळाली. निराळ्या भाषेत सांगायचे तर Sunil Gavaskar ही Garfield Sobers यानी अंतरराष्ट्रीय क्रिकेटला दिलेली देणगी असे म्हटले तर अप्रस्तुत होणार नाही. भारतीय क्रिकेट रसिक म्हणूनच सोबर्स यांचे कायम ऋणी राहतील. एक प्रकार...