Gary Sobers : गॅरी सोबर्स -एका अख्यायिकेचा अंत
काही दिवसापूर्वी ABP Majha Sanman Puraskarचा सोहळा दूरदर्शनवर पाहिला. या सोहळ्यात Sunil Gavaskar यांना इतर अनेक मान्यवरांबरोबर गौरवण्यात आले. आपल्या भाषणात गावसकरांनी Sir Gary Sobers यांचे मुद्दाम आभार मानले. गावसकर म्हणाले की १९७१ मध्ये Port of Spain (Trinidad) येथे ते आपल्या कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना खेळत असताना १२ धावांवर त्यांचा अतिशय सोपा झेल सोबर्स यांनी सोडला. हे जीवदान West Indiesला फारच महागात पडले कारण त्यानंतर सुनील गावसकर नावाच्या ताऱ्याचा क्रिकेट आसमंतात उदय झाला आणि भविष्यात या ताऱ्याच्या दिव्य तेजाने सगळ्यात जास्त होरपळून निघाला तो वेस्ट इंडiesचा संघ. त्यानंतरच्या कसोटीत गावसकर ४ रन्सवर खेळत असताना सोबर्सने पुन्हा एकदा त्यांचा झेल सोडला आणि गावसकरांनी आपले पहिले कसोटी शतक झळकावले. या दोन जीवदानांमुळे गावसकरांच्या क्रिकेट कारकिर्दीला कलाटणी मिळाली. निराळ्या भाषेत सांगायचे तर Sunil Gavaskar ही Garfield Sobers यानी अंतरराष्ट्रीय क्रिकेटला दिलेली देणगी असे म्हटले तर अप्रस्तुत होणार नाही. भारतीय क्रिकेट रसिक म्हणूनच सोबर्स यांचे कायम ऋणी राहतील. एक प्रकारे भारतावर उपकार करणाऱ्या सोबर्स यांचे १७ जुलै २०२६ या दिवशी निधन झाल्याची बातमी ऐकून भारतातील क्रिकेट रसिक निश्चितच हळहळले असतील.
Gary Sobers हे क्रिकेट इतिहासातील एक आश्चर्य होते. ते उत्कृष्ट डावखुरे फलंदाज तर होतेच शिवाय ते उत्तम गोलंदाजही होते. ते दृतगती तसेच फिरकी गोलंदाजीही करत असत. खेळपट्टीचा नूर पाहून ते दोन्ही प्रकारची गोलंदाजी तेवढ्याच प्रभावीपणे करायचे. ते अव्वल दर्जाचे क्षेत्ररक्षकही होते. त्यांनी भले गावसकरांचे झेल सोडले असतील पण १९७१मध्ये पहिल्या कसोटीत त्यांनी भारताचे सलामीचे फलंदाज Jayantilal यांचा एक अत्यंत अवघड झेल स्लिपमध्ये डावीकडे हवेत सूर मारून घेतला होता. या झेलाचा फोटो Maharashtra Timesमध्ये आला होता. सोबर्स यांच्या या एका झेलामुळे जयंतीलाल यांची कसोटी कारकीर्द केवळ एका सामन्यात संपुष्टात आली. ते पुन्हा कधीही कसोटी सामना खेळले नाहीत.
Sobers यांनी ९३ कसोटीत ५७च्या सरासरीने ८०३२ धावा कुटल्या. ज्या काळात सर्वसाधारणपणे चांगल्या फलंदाजांची सरासरी ३० ते ४० च्या आसपास असायची त्या काळात सोबर्स यांची सरासरी ५७ च्या घरात होती यावरून त्यांचे फलंदाजीतील सातत्य अधोरेखित होते. या दरम्यान त्यांनी २६ शतके ठोकली. Bradman यांनी २९ कसोटी शतके झळकावली होती. बरीच वर्षें सोबर्स सर्वाधिक शतके नोंदवण्यात ब्रॅडमन यांच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर होते. सोबर्स यांनी १९५७-५८ च्या Pakistanविरुद्धच्या मालिकेत एका डावात नाबाद ३६५ धावा काढल्या होत्या. हा विक्रम त्यानंतर जवळपास ४० वर्षें अबाधित राहिला होता. Brian Lara या दुसऱ्या West Indian खेळाडूने सोबर्स यांचा हा विक्रम मोडला. १९६० च्या जगप्रसिद्ध Brisbane Testमध्ये पहिल्या डावात १३२ रन्स काढल्या होत्या. ही कसोटी तोपर्यंतच्या क्रिकेट इतिहासातील पहिली Tie Test होती.
Sobers हे १९६६-६७ मध्ये भारतात आलेल्या West Indies संघांचे कर्णधार होते. त्या मालिकेतील मुंबईच्या कसोटीत वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या धावा त्यांनी कमीत कमी वेळात केल्या कारण त्यांना मुंबईच्या Racecourseवरील घोड्यांच्या शर्यतीसाठी वेळेवर हजर राहायचे होते. १९६६-६७ मध्ये Ajit Wadekar यांनी मुंबईत वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्याच्या पूर्वी सराव संपवून परत येताना मैदानात वाडेकरांची सोबर्सशी गाठ पडली. सोबर्सनी वाडेकरांना शुभेच्छा दिल्या. त्या वेळी त्यांच्या लक्षात आले की वाडेकरांचा एक बूट फाटला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपली मैत्रीण Anju Mahendru हिला घेऊन सोबर्स नवीन बुटांचा जोड घेऊन थेट वाडेकरांच्या घरी पोहोचले. त्यावेळी वाडेकर घरी नव्हते म्हणून सोबर्स यांनी ते बूट वाडेकरांच्या आईजवळ सुपूर्त केले आणि निरोप दिला की वाडेकरांना हे बूट घालून खेळायला सांगा. त्या बुटांवर सोबर्स यांनी स्वतःची सही केली होती.
Wadekar ते बूट घालून फलंदाजीसाठी मैदानात उतरले, पण ते ०वर बाद झाले. तंबूत परत जाताना Sobersनी टोमणा मारला की बूट नवा असो की जुना तुझा स्कोरच राहणार. सोबर्स तसे खिलाडू वृत्तीचे होते. १९६६-६७ च्या मालिकेतच त्यांनी भारताच्या Budhi Kunderan यांचा झेल घेतला असे वाटून पंचांनी बुधीना बाद दिले. पण सोबर्स यांनी पंचांना सांगितले की त्यांनी तो झेल टप्पा पडून घेतला होता. त्यांनी कुंदरन यांना परत बोलावले आणि कुंदरन यांनी तडाखेबंद अर्धशतक झळकावले. त्याच मालिकेतील अजून एक किस्सा Sobers सांगत असत. West Indian फलंदाजाना Chandrasekhar यांची Googly समजत नव्हती. त्यांचे इतर सर्व बिनीचे फलंदाज चंद्रशेखर यांची शिकार बनले होते. शेवटी वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज Wes Hall फलंदाजीला आला. त्यालाही चंद्राच्या गुगलीचा पत्ता लागत नव्हता. त्याने सोबर्सला विनंती केली की चंद्रा जेव्हा गुगली टाकणार असेल त्यावेळी Non-Striker Endला असलेल्या सोबर्स यांनी हातातील बॅट जरा लांब करावी. सोबर्स यांनी तसे करणे चालू केल्यावर हॉल चंद्राचे गुगली चेंडू झोडपून काढायला लागला. त्याने सोबर्स बरोबर मोठी भागीदारी केली. चंद्राही बुचकळ्यात पडला होता की हॉल आपले गुगली चेंडू कसे काय ओळखत आहे. चहापानाच्या वेळी वेस्ट इंडिजचा फलंदाज Seymour Nurse याने हॉलला याविषयी विचारणा केली तेव्हा हॉलने फुशारकी मारली की त्याला चंद्राचे गुगली ओळखता येऊ लागले होते. सोबर्स यांनी हे ऐकले. चहापानानंतर सोबर्सने ठरलेली खूण केली नाही आणि चंद्राच्या गुगलीवर हॉल त्रिफळाबाद झाला. त्याने चिडून सोबर्सला विचारले की त्याने ठरलेली खूण का केली नाही. सोबर्सने त्याला सांगितले की तूच तर Dressing Roomमध्ये मिजास मारत होतास की तुला चंद्राचे गुगली ओळखता येतात.
१९७१च्या ऐतिहासिक दौऱ्यावर भारतीय संघ जेव्हा West Indiesमध्ये पोहोचला तेव्हा भारतीय संघांचे स्वागत करण्यासाठी Sobers स्वतः विमानतळावार हजर होते. त्यांनी भारताचे कर्णधार Wadekar यांना डिवचले की अजून एका मालिकेत पराभव स्वीकारण्यासाठी तुम्ही संघ घेऊन आला आहात का. त्यावेळी वाडेकरांनी उत्तर दिले की आम्ही मालिका जिंकण्यासाठी आलो आहोत. Sabina Parkच्या पहिल्या कसोटीत एक दिवस पावसाने वाया गेला होता. भारताने पहिल्या डावात वेस्ट इंडिजवर १७० धावांची आघाडी घेतली होती. वाडेकरांनी वेस्ट इंडिजला Follow-On दिला तेव्हा सोबर्स आश्चर्यचकित झाले. त्यांना हे माहित नव्हते की जर कसोटी ४ दिवसांची झाली असेल तर फॉलो ऑन देण्यासाठी २०० ऐवजी १५० धावांचा लीड पुरेसा असतो.
१९७१च्या मालिकेत पहिल्या ३ कसोटी सामन्यात Sobers फलंदाजीत अपयशी ठरला होता. एकदा त्यांनी सामन्यादरम्यान भारताच्या Dressing Room मध्ये जाऊन Sunil Gavaskarांशी Shake Hand केला. त्या कसोटीत सोबर्सने शतक केले. पुढच्याही कसोटीत सोबर्सने गावसकरांशी असाच शेक हॅन्ड केला आणि त्यांचे शतक झाले. Ajit Wadekarांच्या हे लक्षात आले. शेवटच्या कसोटीत सुद्धा जेव्हा सोबर्स गावसकरांना भेटायला आले तेव्हा वाडेकरांनी गावसकरांना Toiletमध्ये बंद केले त्यामुळे सोबर्स काही सुनिलशी शेक हॅन्ड करू शकले नाहीत. त्या डावात सोबर्स शून्यावर बाद झाले. Eknath Solkar व Sobers यांची मैदानावरील शाब्दिक चकमकही अशीच गाजली होती. सोबर्स यांचे चेंडू सोलकरांना खेळता येत नव्हते. ते खेळायचा प्रयत्न करायचे पण बॅटचा चेंडूला स्पर्श होत नव्हता. त्यावेळी सोबर्सने सोलकरना हिणवले की बॅटचा उपयोग चेंडू मारण्यासाठी करायचा असतो. त्यावेळी सोलकरनी आपल्या मोडक्या तोडक्या इंग्लिशमध्ये सुनावले की तू तुझा खेळ कर, मी माझा खेळ करीन. सोबर्स खिलाडू वृत्तीचे होते. त्यांनी वरील प्रसंग मनात ठेवला नाही. काही वर्षानंतर ते जेव्हा भारतात आले होते तेव्हा सोलकरची भेट झाल्यावर त्यांनी सोलकरना लगेच ओळखले व म्हणाले की ओह, यु आर Ekki ऑफ १९७१.
Sobers हे षटकातील सहाही चेंडूवर षटकार मारणारे जगातील पहिले फलंदाज होते. Nash या गोलंदाजाच्या चेंडूवर त्यांनी हा विक्रम केला होता English County स्पर्धेत. त्याविषयी बोलताना सोबर्स म्हणायचे की त्यांनी ते शॉट ठरवून मारले नव्हते. १९७१ मध्ये Sobers Rest of the World XI संघांचे कॅप्टन होते Australiaविरुद्ध. त्या मालिकेत त्यांनी एका कसोटीत २५४ धावा तडकावल्या. ती खेळी बघून Bradman प्रभावित झाले आणि त्यांनी त्या डावाचे वर्णन त्यांनी पाहिलेली सर्वोत्कृष्ट खेळी असे केले होते. सोबर्स हे चांगले रत्नपारखी होते. कॅनडात १९९७ मध्ये भारत पाकिस्तान यांच्यात एक दिवसीय सामन्यांची मालिका झाली होती. त्यातील एका सामन्यात Rahul Dravidच्या ९० धावांच्या खेळीने सोबर्स खूप प्रभावित झाले होते. त्यांनी द्रविड हा भविष्यात महान खेळाडू होईल असे भाकित केले होते.
Sobers यांनी कसोटी क्रिकेटमध्ये २३५ विकेट्स काढल्या व १०९ झेल टिपले. त्यांच्या या सर्वांगीण गुणवत्तेमुळे त्यांना सर्वकालीन महान अष्टपैलू खेळाडू मानले जाते. त्यांच्यानंतर त्यांच्या तोडीचा एकही खेळाडू झाला नाही. आधुनिक क्रिकेटमध्ये आफ्रिकेचा Jacques Kallis व नुकताच रिटायर झालेला इंग्लंडचा कर्णधार Ben Stokes हे फार तर सोबर्स यांच्या जवळपास पोहोचले होते.
Sobers हे जरी आपल्यात आता राहिले नसले तरी ते स्वतः एक अख्यायिका बनले आहेत. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या म्हणीप्रमाणे त्यांच्या महानतेचे पोवाडे वर्षानुवर्षे गायले जातील हे नक्की.
सोबर्स यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
this blog was originally published on https://gajawaja.in/garry-sobers-the-end-of-a-legend/
Comments
Post a Comment