Posts

Showing posts from June, 2026

The Last Battle : छत्रपती शिवाजी महाराजांचं अखेरचं युद्ध !

Chatrapati Shivaji Maharaj एका योद्ध्याच्या वेशात कसे दिसत असतील ? कधी विचार तरी केलाय का ? म्हणजे आपण त्यांना पांढरे शुभ्र, स्वच्छ वस्त्र, डोक्यावर मंदिल असे अनेक फोटो, चित्र पाहिलेच असतील. पण मस्तकावर शिरस्त्राण घातलेले युद्धसज्ज वेशात रौद्ररूपी शिवराय पांढऱ्याशुभ्र घोड्यावर बसून या युद्धाचं नेतृत्व करत आहेत, म्हणजे असं अंगावर काटा आणणाराच हा प्रसंग असेल. शिवरायांनी आपल्या ५० वर्षांच्या आयुष्यात जवळपास ३० युद्धांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला होता, असं काही इतिहास अभ्यासकांचं मत आहे. कदाचित हा आकडा जास्तही असू शकतो. पण तुम्हाला माहितीये की, शिवरायांनी आपली अखेरची लढाई कधी लढली होती. आज याच युद्धाची माहिती आपण जाणून घेणार आहोत.  हा काळ १६७९ दरम्यानचा… दक्षिण दिग्विजयानंतर शिवरायांच्या एका पूर्वनियोजित योजनेनुसार शंभूराजे दिलेर खानाला जाऊन मिळाले होते. दक्षिण दिग्विजय झाल्यानंतर शंभू राजे खानाच्या फौजेतून माघार घेऊन विजापूरला आले. यावेळी शिवरायांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना सांगितलं की तुम्ही शंभू राजेंना सुखरूप पन्हाळगडावर घेऊन या. याचवेळी शिवराय जालन्यामध्ये मुघलांवर चाल कर...