Asha Bhosle : ‘मेलोडी क्वीन’ आशा
आज संगीत क्षेत्रातील अतिशय बुलंद आवाज असणाऱ्या आशा भोंसले यांचा आज ९२ वा वाढदिवस. आशा भोंसले यांच्याबद्दल काय आणि किती सांगावे असे होते. भारतीय संगीतसृष्टी या नावाशिवाय कायम अपूर्ण राहील असे महान कर्तृत्व आशा भोंसले यांनी गाजवले. आजही वयाच्या ९२ वर्षी त्यांचा उत्साह, एनर्जी, काम करण्याची इच्छा भल्याभल्याना मागे टाकताना दिसते. (Marathi News) आशा भोसले यांनी अनेक हिट चित्रपटांमधील गाणी गायली आहेत. ‘मेलोडी क्वीन’ नावाने ओळखल्या जाणारी आशा ताईंनी १००० हून अधिक चित्रपटांमध्ये २० भाषांमध्ये १२००० हून अधिक गाणी गेली आहेत. हिंदी मराठीच नाही तर बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन या भाषांमधील अनेक गाणी आशा भोसले यांनी गायली. त्यांनी विविध जॉनर्सची हजारो गाणी गायली आहेत. आज आशाताईंच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टींबद्दल जाणून घेऊयात… (Asha Bhosle Birthday) आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली येथे झाला. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी त्यांचे पहिले गाणे गायले. या पहिल्या गाण्याचा देखील एक किस्सा होता. हा किस्सा आशा ताईंनी...