Aamir Khan : ‘सितारे जमीन पर’ सिनेमाने पहिल्या तीन दिवसातच वसूल केले सिनेमाचे अर्धे बजेट

 

नुकताच आमिर खानचा बहुप्रतीक्षित असा ‘सितारे जमीन पर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाबद्दल सुरुवातीपासूनच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. आमिरने देखील या सिनेमाचे भरपूर प्रमोशन केले. विविध ठिकाणी, विविध पद्धतीने त्याने या सिनेमाला प्रमोट केले. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तर सिनेमाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा कमालीच्या वाढल्या होत्या. मात्र हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला आणि सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यश मिळवले. (Aamir khan) Latest Entertainment News

काही वर्षांपूर्वी आमिर खानचा सुपरहिट असा ‘तारे जमीन पर’ सिनेमा आला होता. या सिनेमाने चित्रपटसृष्टीत एक वेगळी छाप सोडली आहे. आजही या सानमचे चाहते आपल्याला पाहायला मिळतात. या सान्मातून आमिर खानने डिस्लेक्सिया आजार असलेल्या मुलांच्या भावविश्वावर भाष्य केले होते. आता प्रदर्शित झालेला ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाद्वारे आमिर खान एक पाऊल पुढे जात डाउन सिंड्रोम आणि न्यूरो डायव्हर्जन्स सारख्या गंभीर आणि महत्वाच्या विषयाला हात घातला आहे. (Marathi Latest News) Marathi News

‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने या ‘सितारे जमीन पर’च्या माध्यमातून काही काळानंतर दमदार कमबॅक केले आहे. त्याच्या या कमबॅकची प्रेक्षकांना फार उत्सुकता होती. अतिशय वेगळा आणि तसा गुंतागुंतीचा विषय असलेल्या डिस्लेक्सिया आजारवर आमिर सिनेमातून सोप्या पद्धतीने भाष्य करण्यात आले आहे. २० जून रोजी आमिर खान आणि जेनेलिया डिसूझा यांची मुख्य भूमिका असलेला ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसापासूनच धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाची सुरुवात कमाल झाली असली तरी पहिल्या आठवड्याच्या शेवटी सिनेमाने तिकीट खिडकीवर भरपूर कमाई केली आहे. सोशल मीडियावरील चर्चेमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली आहे. (Todays Marathi HEadline)

Aamir Khan

‘सितारे जमिन पर’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ११ कोटी ७० लाखांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी २१ कोटी ५० लाखांची कमाई केलेली आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचा आकडा सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने शेअर केलेला आहे. चित्रपटाने दोन दिवसांत ३२ कोटी २० लाखांची कमाई केलेली आहे. हा चित्रपट येत्या आगामी काळात भरपूर कमाई करणार, विविध रेकॉर्ड तयार करणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. सॅक्निल्कच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘सितारे जमीन पर’ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी २९ कोटींची कमाई केली आहे. ‘सितारे जमीन पर’ सिनेमाने तीन दिवसांत ५९.९० कोटींची कमाई केली आहे. (Celebrity News)

आमिरच्या ‘सितारे जमीन पर’ने सुरुवातीच्या केवळ तीनच दिवसांत त्याच्या बजेटच्या निम्म्याहून अधिक रक्कम वसूल देखील केली आहे. फिल्मी बीटनुसार, आमिरच्या ‘सितारे जमीन पर’चे बजेट जवळपास ९० कोटी रुपये असल्याचे सांगितले आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या तीनच दिवसांत ५९ कोटींची कमाई करून निम्म्याहून अधिक खर्च वसूल केला आहे. आमिर खानच्या सितारे जमीन पर या सिनेमाची कथा ही ऑटिझम, डाऊन्स सिंड्रेम, फ्रँजाइल एक्स सिंड्रोम अशा समस्या असलेल्या अनेक व्यक्ती, त्यांच्या आयुष्याची गोष्ट मांडणारा आणि एक सामाजिक संदेश देणारा कॉमेडीने भरपूर असलेला हा सिनेमा आहे. (Bollywood News)

==========

हे देखील वाचा :  Salman Khan : सलमान खान अनेक वर्षांपासून करतोय ‘या’ गंभीर आजाराचा सामना, स्वतःच केला खुलासा

==========

या चित्रपटात आमिर खानसोबत अभिनेत्री जेनेलिया देशमुख प्रमुख भूमिकेत दिसून येत आहे. विशेष म्हणजे, अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषि शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर या १० नवीन कलाकारांनी चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा आमिर खानने रुपेरी पडद्यावर दमदार कमबॅक केले आहे. २००७ साली रिलीज झालेल्या ‘तारे जमीन पर’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. (Social News) Bollywood Life

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Original content is posted on https://gajawaja.in/aamir-khan-and-genelia-deshmukhs-sitaare-zameen-par-movie-box-office-collection/

Comments

Popular posts from this blog

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Holi : जाणून घ्या होळीमध्ये नारळ का अर्पण करण्यामागचे कारण

Vasant Panchami देवी सरस्वतीचा जन्मदिन – वसंतपंचमी