Posts

Showing posts with the label marathi news

Chandragrahan : चंद्रग्रहणाचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व

Image
  आज २०२५ वर्षातले दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आहे. मुख्य म्हणजे हे पूर्ण चंद्रग्रहण असून, या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ​​२८ मिनिटे २ सेकंद आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी धृति योग तयार होईल. आजचे चंद्रग्रहण रात्री ९:५८ वाजता सुरू होईल. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण आहे. या स्थितीमध्ये चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीखाली आला तर त्या स्थितीला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. म्हणजेच इंग्रजीत total lunar eclipse. खग्रास स्थितीतही काही प्रमाणात सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतोच. (Marathi) त्यामुळे या ग्रहणात चंद्राचा हा भाग थोडा गडद लालसर दिसू लागतो. याला ब्लड मून असे म्हटले जाते. पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे ते ग्रहणापेक्षा मोठा भाग व्यापते. पूर्ण ग्रहण रात्री ११ वाजता सुरू होईल. कमाल ग्रहण रात्री ११:४२ वाजता असेल. हे चंद्रग्रहण फक्त भारतच नाही तर पूर्व आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, चीन, जपान या देशांमध्येही दिसणार आहे. चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक खगोलीय घटना असून, यामागे वैज्ञानिक कारणे आहेत. चंद्रग्रहणाबद्दलची काही खास माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

ChandraGrahan : २०२५ सालातले शेवटचे चंद्रग्रहण कधी आहे?

Image
  यावर्षीचा सप्टेंबर महिना खूपच खास ठरणार आहे. एकत्र सप्टेंबरचा पहिला संपूर्ण आठवडा गणपती बाप्पा आपल्यासोबत असणार आहे. तर दुसऱ्या आठवड्याची आणि सोबतच पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणापासून होणार आहे. हो, यंदा २०२५ सालातले शेवटचे चंद्रग्रहण येत्या ७ सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातही दिसणार आहे. याला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. ज्योतीषशास्रानुसार ग्रहणाचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो. सप्टेंबर 2025 मध्ये दोन ग्रहण लागणार आहे.ज्यात एक सुर्यग्रहण आणि एक चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहण म्हणजे ही खगोलीय घटना असून ती अतिशय मोजक्या वेळेसच घडते. म्हणूनच वैज्ञानिकांमध्ये ग्रहणांना विशेष महत्व असते. ( Marathi News ) चंद्रग्रहण म्हणजे काय? जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. या परिस्थितीमुळे पृथ्वीची सावली चंद्राच्या संपूर्ण प्रकाशाला व्यापते. जेव्हा चंद्र हळूहळू पृथ्वीच्या मागे येतो तेव्हा त्याचा रंग गडद होतो. या रंगामुळे त्याला रेड ब्लड मूनही म्हणतात. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या विपरीत दिशेला असतो. चंद्रग्रहणाच्या स्थितीत पृ...

Health : कॅन्सर होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी

Image
null   आज अभिनेत्री प्रिया मराठेचे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारामुळे निधन झाले. प्रिया मागील अनेक महिन्यांपासून कॅन्सरशी लढत होती. मात्र तिची झुंज अपयशी ठरली आणि आज ३१ ऑगस्ट रोजी तिची प्राणज्योत मालवली. तिच्या निधनाच्या बातमीमुळे इंडस्ट्रीतील कलाकारांसोबतच प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसला. वयाच्या केवळ ३८ व्या वर्षी प्रियाच्या या अकाली एक्सिटमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रियाने मराठीसोबतच हिंदी मालिकाविश्वात देखील आपला ठसा उमटवला होता. तिने मराठी, हिंदीमधील गाजलेल्या मालिकांमध्ये दमदार आणि संस्मरणीय भूमिका साकारल्या. मात्र आजची प्रिया मराठेंच्या निधनाची बातमी चटका लावून जाणारी आहे. ( Marathi News ) मात्र आज प्रियाच्या निधनानंतर एक प्रश्न आ विसरून उभा आहे, तो म्हणजे अजूनही महिला आपल्या आरोग्याची काळजी नीट का घेत नाही. आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना विशेषकरून ३० शी ओलांडलेल्या महिलांनी आपल्या तब्येतीची काळजी घेणे आवश्यक झाले आहे. वेळोवेळी आरोग्य तपासणी करत दररोज आपल्या शरीराचे त्यात होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर, कोलन कॅन्...

Andhra Pradesh : श्री यागंती उमा महेश्वर मंदिरातील नंदीचे रहस्य !

Image
  भारतातील अनेक मंदिरांचा उल्लेख पौराणिक ग्रंथांमध्ये आहे. या मंदिरांमधील गुढ आजही उलगडण्यात यश आलेले नाही. अशा काही निवडक मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे, श्री यागंती उमा महेश्वर स्वामी मंदिर. भगवान शंकराला समर्पित असलेले हे मंदिर आंध्रप्रदेशमधील नंदयाल जिल्ह्यात आहे. रहस्यांनी भरलेल्या या मंदिरातील नंदी महाराजांची मूर्ती ही सतत वाढत आहे. काही वर्षापूर्वी या नंदी महाराजांना भगवान शंकराचे भाविक प्रदक्षिणा मारायचे. मात्र आता ही मूर्ती वाढल्यामुळे हा प्रदक्षिणा मार्गही बंद झाला आहे. याशिवाय या मंदिराभोवती अनेक गुहा आहेत. यातील काही गुहांमध्ये प्रशस्त कक्ष असून याची निर्मिती कोणी, कशासाठी आणि कधी केली, हे कोणालाही माहित नाही. या मंदिरासमोर एक तलाव असून याभोवती अनेक देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. (Andhra Pradesh) Marathi news याशिवाय या तलावाच्या भोवती अश्वधारी कल्कींचीही मूर्ती कोरण्यात आली आहे. त्यामुळे श्री यागंती उमा महेश्वर मंदिराचे आणि कल्की अवताराचे रहस्य असल्याचे सांगण्यात येते. भारतात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकी काही मंदिरांमधील घटना पाहून भाविक नतमस्तक होतात. या चमत्...

Radha : राधा अष्टमीचे व्रत म्हणजे काय? कधी केले जाते हे व्रत?

Image
  श्रीकृष्ण आणि राधा यांचे नाते संपूर्ण जगाला माहित आहे. राधाशिवाय श्रीकृष्ण अपूर्ण तर श्रीकृष्णाशिवाय राधा अपूर्ण आहे. श्रीकृष्णाची बायको जरी रुक्मिणी असली तरी श्रीकृष्णासोबत मंदिरात स्थान मात्र राधाला आहे. प्रेम, आदर, विश्वास, त्याग असे अशा सर्वच भावनांवर आधारित या दोघांचे अनोखे नाते आपल्याला पाहायला मिळते. नुकताच आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आपण सर्वानी मोठ्या जल्लोषात आणि आनंदात साजरा केला. श्रीकृष्ण जन्माष्टमी झाल्यानंतर पंधरा दिवसांनी अर्थात भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या आठव्या तिथीला राधाअष्टमी साजरी केली जाते. (Marathi) राधाअष्टमीच्या दिवशी राधा राणीची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. राधाअष्टमी म्हणजे राधाचा जन्मदिन. श्रीकृष्णांच्या जन्मानंतर पंधरा दिवसांनी राधारांनीच जन्म झाला आहे. राधाअष्टमीचा खास दिवस संपूर्ण देशात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. खासकरून राधा राणीचे जन्मस्थान असलेल्या बरसाना येथे तर या दिवशी उत्सवाचे वातावरण असते. राधाअष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी यांची पूजा केली जाते. मान्यता आहे की, राधा राणीची पूजा केल्याने दीर्घायुष...

Stray Dogs : दिल्ली सरकारला सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांबाबत दिला मोठा आदेश

Image
  सध्या देशातील दोन महानगरांमधील कबुतरं आणि कुत्रे हे दोन मुद्दे देशभर कमालीचे गाजत आहे. मुंबईच्या दादरमधील कबुतरखान्यावरील बंदी उठवण्यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोकावे लागले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्यानंतर ही बंदी उठवण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. दिवसाचा ठराविक वेळ कबुतरांना खाद्य देण्याची परवानगी द्यावी, अशीही मागणी करण्यात आली होती. याच मागणीसंदर्भात न्यायालयाने निर्णय देताना आपला याआधीचा निर्णय कायम ठेवला असून तुर्तास तरी कबुतरखान्यांवरील बंदी कायम राहणार आहे. (Marathi) तर आता दुसरीकडे दिल्लीमधील भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आहे. सुप्रीम कोर्टाने दिल्ली-एनसीआर भागातील भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहेत. येत्या ८ आठवड्यात या सर्व भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवावे आणि या कारवाईमध्ये कोणी अडथळा आणल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे देखील सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. ( Marathi News ) दिल्लीत भटके कुत्रे चावल्याने अनेक नागरिकांना रेबीज झाल्याचे प्रकरण समोर आले होते....

Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनावेळी राखी बांधताना दोरीला तीन गाठच का मारतात?

Image
  Raksha Bandhan 2025 :  भारतीय सणांमध्ये रक्षाबंधन हा एक भावनिक आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या रक्षणासाठी प्रार्थना करते, आणि भाऊ तिला आजन्म संरक्षण देण्याचे वचन देतो. या राखी बांधताना एक विशिष्ट परंपरा पाळली जाते . ती म्हणजे राखीच्या दोरीला तीन गाठी मारणे. हा केवळ रीतसर भाग नाही, तर यामागे एक आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक अर्थ दडलेला असतो. येत्या ९ ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. जाणून घेऊया राखी बांधनाता केवळ तीन गाठच का मारल्या जातात.  Marathi News तीन गाठींचा धार्मिक आणि प्रतीकात्मक अर्थ: राखीला तीन गाठ मारण्यामागे धर्मशास्त्रीय दृष्टिकोन देखील आहे. संस्कृत शास्त्रांमध्ये सांगितले आहे की कोणतीही शुभ वस्तू किंवा रक्षा-सूत्र “त्रिविध बंधनाने” बळकट केली जाते. पहिली गाठ – धर्मासाठी असते. ती आपल्या नात्याच्या शुद्धतेचे आणि निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक असते. दुसरी गाठ – सत्यासाठी असते. हे नाते कोणत्याही परिस्थितीत सत्यावर टिकून राहावे यासाठी ही गाठ मारली जाते. तिसरी गाठ – कर्तव्या...