Chandragrahan : चंद्रग्रहणाचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व
आज २०२५ वर्षातले दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आहे. मुख्य म्हणजे हे पूर्ण चंद्रग्रहण असून, या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास २८ मिनिटे २ सेकंद आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी धृति योग तयार होईल. आजचे चंद्रग्रहण रात्री ९:५८ वाजता सुरू होईल. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण आहे. या स्थितीमध्ये चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीखाली आला तर त्या स्थितीला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात. म्हणजेच इंग्रजीत total lunar eclipse. खग्रास स्थितीतही काही प्रमाणात सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतोच. (Marathi) त्यामुळे या ग्रहणात चंद्राचा हा भाग थोडा गडद लालसर दिसू लागतो. याला ब्लड मून असे म्हटले जाते. पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे ते ग्रहणापेक्षा मोठा भाग व्यापते. पूर्ण ग्रहण रात्री ११ वाजता सुरू होईल. कमाल ग्रहण रात्री ११:४२ वाजता असेल. हे चंद्रग्रहण फक्त भारतच नाही तर पूर्व आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, चीन, जपान या देशांमध्येही दिसणार आहे. चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक खगोलीय घटना असून, यामागे वैज्ञानिक कारणे आहेत. चंद्रग्रहणाबद्दलची काही खास माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...