Ashtavinayak : अष्टविनायकांमधील तिसरा गणपती- सिद्धटेकचा सिद्धिविनायक

 

गणेशोत्सव सुरु होऊन दोन दिवस झाले आणि आज तिसरा दिवस आहे. आता गणेशोत्सव म्हटला की, सर्वच लोकं विविध ऐतिहासिक, प्रसिद्ध आणि जागृत गणेश मंदिरांमध्ये अवश्य जातो आणि बाप्पाचे दर्शन घेतो. अष्टविनायक गणपती मंदिरं ही अशीच प्रसिद्ध आणि अतिशय जुनी मंदिरं आहेत. सध्या गणेशाचा सर्वत्र जयघोष सुरु आहे. गणेश उत्सवाच्या काळात तर अष्टविनायकाच्या गणेश मंदिरांना यात्रेचे स्वरूप आलेले असते. या काळात ही मंदिरं भाविकांनी तुडुंब भरलेली असतात. या अष्टविनायकांमधील सर्वच मंदिरांचा इतिहास हा खूपच खास आहे. यातलाच तिसरा गणपती म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायक. आज आपण याच गणपतीबद्दल माहिती पाहूया. (Ganesh Chaturthi) Todays Marathi news

सिद्धटेक अर्थात सिद्धिविनायक हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सिद्धटेक गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा असा हा सिद्धिविनायक गणपती उजव्या सोंडेचा अष्टविनायकांपैकी एकमेव गणपती आहे. गणपतीची मुद्रा अतिशय शांत आहे. गणपतीच्या दोन्ही बाजूला जय-विजय यांच्या पितळेच्या मुर्त्या स्थित आहेत. अष्टविनायकांमधील हा तिसरा गणपती म्हणून सिद्धिविनायक गणपती ओळखला जातो. या सिद्धिविनायकाच्या मंदिरातील बाप्पाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच आणि अडीच फूट रुंद आहे. (Todays Marathi Headline)

मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. या गणपतीची सोंड उजवीकडे असल्याने याचे सोवळे कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर रिद्धि-सिद्धी बसलेल्या पाहायला मिळतात. या मंदिरात पितळी मखर असून चंद्र, सूर्य, गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या मंदिराला एक प्रदक्षिणा घालायची असल्यास १ किलोमीटर चालावे लागते. भीमा नदीच्या काठावर वसलेले सिद्धटेकचा ‘श्री सिद्धिविनायक’ पाषाणाच्या सिंहासनावर सिद्धिविनायक विराजमान झालेली स्वयंभू मूर्ती आहे. (Latest Marathi Headline)

असे मानले जाते की मूळ मंदिर हे भगवान विष्णूने बांधले होते, कालांतराने ते नष्ट झाले. नंतर, एका गुराख्याला प्राचीन मंदिराचे दर्शन झाले आणि त्याला सिद्धी-विनायकाचे प्रतीक सापडले. गुराख्याने देवतेची पूजा केली आणि लवकरच इतरांना मंदिराची माहिती मिळाली. सध्याचे मंदिर १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले होते, ज्यांनी अनेक हिंदू मंदिरे बांधली आणि मंदिरांचे नूतनीकरण केले. (Top Marathi News)

उजव्या सोंडेचा गणपती हा सिद्धी देणारा आणि कार्य पूर्ण करणारा मानला जातो. मान्यता आहे की, जर २१ दिवस सलग २१ प्रदक्षिणा घातल्यास जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात. या मंदिरात गणेश चतुर्थी, गणेश जयंती, सोमवती अमावास्या आणि विजयादशमीला विशेष उत्सव साजरे होतात. गणेश चतुर्थी आणि जयंतीला या मंदिरात तीन दिवस पालखी मिरवणूक निघते. (Marathi Trending News)

सिद्धटेक मंदिराची आख्यायिका
मुद्गल पुराणात असे वर्णन केलेले आहे की सृष्टीच्या सुरुवातीस, जेव्हा विष्णू त्यांच्या योगनिद्रेत होते त्यावेळी विष्णूच्या नाभीतून एक कमळ उगवले. सृष्टीचा निर्माता-देव ब्रह्मा याच कमळातून उदयास आले. ब्रह्माने विश्वाची निर्मिती सुरू केली असतानाच, मधु आणि कैटभ हे दोन राक्षस विष्णूच्या कानातील घाणीतून उद्भवले. या राक्षसांनी ब्रह्माच्या सृष्टिनिर्मितीच्या प्रक्रियेस अडथळा आणण्यास सुरुवात केली ज्यामुळे साक्षात विष्णूला जागृत करण्यास भाग पाडले .समोरील विनाशकारी दानवांसोबत विष्णू नारायण लढाई लढले खरे पण त्या दानवांचा पराभव करू शकले नाहीत. मग त्यांनी यामागील कारण शिवाला विचारले. (Top Stories)

========

Gauri Puja : गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त आणि या सणाचे महत्व

Ganesh Chaturthi : दीड दिवसांच्या गणपती विसर्जनामागील शास्त्र

========

शिवाने विष्णूला सांगितले की ते लढाई आधी, शुभ कार्याचा आरंभ असलेल्या आणि कामातील अडथळा, विघ्ने दूर करणाऱ्या देवतेला गणेशाला वंदन करायला विसरले होते आणि त्याचमुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. अखेरीस, विष्णूनी सिद्धटेक येथे तपश्चर्या केली आणि गणरायाला मंत्रमुग्ध केले – “ओम श्री गणेशाय नमः”. प्रसन्न झाल्याने,श्री गणरायांनी विष्णूला आशीर्वाद आणि विविध सिद्धी प्राप्त करून दिली. ती मिळवून विष्णू आपल्या लढाईकडे परत आले आणि दोन्ही राक्षसांना ठार मारले. विष्णूने ज्या ठिकाणी सिद्धि घेतली ती जागा सिद्धटेक म्हणून ओळखली जाते. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Original content is posted on https://gajawaja.in/ganesh-chaturthi-2025-story-of-the-third-ganpati-siddhivinayak-from-siddhatek/





Comments

Popular posts from this blog

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Holi : जाणून घ्या होळीमध्ये नारळ का अर्पण करण्यामागचे कारण

Prayagraj : महाकुंभमध्ये काय बघाल !