Navratra : नवरात्रीत होम हवन करणे असते लाभदायक; जाणून घ्या हवनाची अधिक माहिती
हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला अत्यंत महत्त्व आहे. देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा नवरात्रीत केली जाते. शेवटच्या दोन दिवसात म्हणजेच अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन करण्याची पद्धत असते. यावेळी कन्या देवीच्या रूपात आपल्या घरी येतात त्यामुळे त्यांचे पाय धुवून त्यांना साजशृंगार देऊन जेवू घालावे अशी मान्यता आहे. तसेच नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला देवीसमोर हवन करण्याची परंपरा आहे. अष्टमी किंवा महानवमीच्या दिवशी देवीसमोर हवन करणे खूप शुभ मानले जाते. विशेषतः अष्टमी आणि नवमीच्या दिवशी योग्य पद्धतीने हवन केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते. यामुळे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आयुष्यातील अडीअडचणी आणि नकारात्मकता हवनात स्वाहा होते असे मानतात. धार्मिक मान्यतेनुसार, विधीपूर्वक होमहवन केल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सुख, शांती व समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे. (Navratra) महानवमीच्या दिवशी हवन करून नऊ दिवसांचा उपवास सोडला जातो. यंदा नवमी तिथी 20 तारखेला दुपारी 12 वाजून 50 मिनिटांपर्यंत राहील. अशा परिस्थितीत नवव्या दिवशी कन्या पूजन करणाऱ्यांनी 20 तारखेला दुपारी 12.50 च्या आधी कन्...