Health : शरीरासाठी अतिशय पौष्टिक आहे जवस; फायदे वाचून तुम्ही देखील व्हाल चकित

सध्याच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य उत्तम राखण्याचे अतिशय महत्त्वाचे आणि कठीण काम आपल्याला पूर्ण करणे गरजेचे झाले आहे. अनेकांच्या मते उत्तम आरोग्य तेव्हाच राखले जाते जेव्हा तुम्ही नियमित योग्य व्यायाम करतात. पण निरोगी आरोग्यासाठी जेवढा व्यायाम गरजेचा आहे, त्याहून थोडा जास्त गरजेचा योग्य आणि सकस आहार आहे. जर तुम्ही पौष्टिक आणि सकस आहार घेतला तर नक्कीच तुम्ही निरोगी राहण्याच्या दिशेने वाटचाल करू शकता. आपला भारतीय आहार बऱ्याच लोकांना जड आणि अस्वास्थ्यकर, हानिकारक वाटतो. मात्र हे चुकीचे आहे. कारण भारतासारखा शरीराला आवश्यक असलेल्या सर्व सकस गोष्टींनी समृद्ध आणि परिपूर्ण आहार दुसऱ्या कोणत्याच देशात मिळणार नाही. भारतीयांच्या जेवणाच्या ताटातील तशी बऱ्यापैकी दुर्लक्षित गोष्ट म्हणजे, जवस. तरुण पिढी आणि आजची जेनझी पिढी तर जवस पाहूनच नाक मुरडते. अनेकांना जवस म्हणजे काय? हे देखील माहिती नसेल. आज आपण याच जवस खाण्याचे शरीराला होणारे विविध लाभ कोणते हेच जाणून घेणार आहोत.

जवसाला सुपरफूड मानले जाते. त्याच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. जवस अतिशय उष्ण असतात, त्यामुळे खाताना त्याचं प्रमाण नेहमी लक्षात ठेवा. जवस खासकरून हिवाळ्यात किंवा थंड वातावरण झाल्यास खाल्ले जातात. यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन बी 1 म्हणजे थायमिन, बी 6 म्हणजे पायरीडॉक्सिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस देखील चांगल्या प्रमाणात असतात. त्यांच्यामध्ये एक विशेष घटक आढळतो, लिग्नॅन्स, जो एक अतिशय प्रभावी अँटी-ऑक्सिडंट आहे. कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी जवस खूप फायदेशीर आहे. फायबर भरपूर प्रमाणात असल्यानं जवस पचनसंस्थेला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात. 

जवसाला सुपरफूड म्हटले जाते. सलग पंधरा दिवस कोमट पाण्यासोबत भाजलेले जवस खाल्ले तर तुमच्या शरीरात अनेक बदल दिसून येतील. जवसाच्या बियांमधे ओमेगा-३ फॅटी एसिड, फायबर, प्रथिनं आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, यामुळे शरीराचं आतून पोषण होतं. भाजलेल्या जवसामुळे, फायबर पचन सुधारण्यास मदत होते. दररोज जवस खाल्ल्यानं बद्धकोष्ठता दूर होते, पोट स्वच्छ राहतं आणि अपचन आणि गॅस कमी होतो. यासाठी, एक चमचा भाजलेले जवस चावून घ्या आणि नंतर कोमट पाणी प्या. दहा-पंधरा दिवस नियमितपणे जवसाचं बी खाल्ल्यानं चयापचय सुधारतं. यामुळे आतड्यांमधे चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीला मदत होते आणि आतड्यांचं आरोग्य मजबूत केल्यानं उर्जेची पातळी सुधारते.

अळशीच्या बियांमधील म्हणजेच जवसामधील लिग्नान्स हार्मोन्स संतुलनात भूमिका बजावतात. नियमित खाल्ल्यानं अनियमित मासिक पाळी सुधारण्यास मदत होऊ शकते. यामुळे रजोनिवृत्तीच्या मूड स्विंग, हॉट फ्लॅश या लक्षणांपासून देखील आराम मिळू शकतो. हा परिणाम हळूहळू होतो, म्हणून नियमित वापर आवश्यक आहे. अळशीच्या बियांमधे भरपूर फायबर असतं, यामुळे जास्त काळ पोट भरलेलं ठेवण्यास मदत होते. यामुळे जास्त अन्न खाल्लं जात नाही. ज्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत देखील मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यापूर्वी जवस खाणं अधिक फायदेशीर आहे. जवसाच्या बिया हलक्या भाजून घ्या आणि हवाबंद डब्यात साठवा. दररोज एक ते दोन चमचे घ्या. जास्त प्रमाणात जवस खाऊ नका, कारण यामुळे पोट फुगू शकतं किंवा उष्णता किंवा उष्णता वाढू शकते. 

जवसातील अँटिऑक्सिडंट्स आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स त्वचेला आतून आर्द्रता देतात. यामुळे डाग आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते, तसेच त्वचेला नैसर्गिक चमक येते. याशिवाय, ते केसांची मुळे मजबूत करते आणि केस गळणे थांबवते. शिवाय जवसमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. ते वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यात मदत करते. सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन केल्याने धमन्यांमधील अडथळ्यांचा धोका कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रित राहतो, ज्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते. 

this blog was originally published on https://gajawaja.in/benefits-of-eating-flax-seeds/




Comments

Popular posts from this blog

Health : कॅन्सर होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?

North Korea : नो आईस्क्रीम…नो हॅम्बर्गर !