मेघा धाडे जान्हवीवर संतापली

 BB Megha Dhade Post


मराठी बिग बॉस सुरु होऊन आता २ आठवडे पूर्ण होतील. अशातच रोज बिग बॉस विविध कारणांमुळे लाइमलाईट्मधे येत आहे. घरातील भांडणं, टास्क यांसोबतच सदस्यांमधील जवळीक देखील चर्चेचा विषय ठरत आहे. शोच्या पहिल्याच दोन दिवसात घरात निक्की विरुद्ध वर्षा उसगांवकर असे दोन वेगळे गट पडले. पहिला गट निक्की, जान्हवी किल्लेकर, अरबाज, वैभव, घनश्याम दरवडे यांचा तर वर्षा उसगांवकर, आर्या, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत यांचा दुसरा गट पाहायला मिळाला. तर पॅडी, इरीना आणि सूरज यांनी दोन्ही गटातील सदस्यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. Latest Marathi News.

आताच टेलिकास्ट झालेल्या एका भागामध्ये वर्षा उसगांवकर आणि जान्हवी किल्लेकर यांच्यात जोरदार भांडण पाहायला मिळाले. या भांडणादरम्यान जान्हवी वर्षा उसगांवकरांना बरेच अपशब्द बोलली आणि त्यांचा अपमान देखील केला. हा भाग पाहिल्यानंतर तर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी जान्हवीला ट्रोल करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी तर तिला घरातून बाहेर काढण्याची मागणी देखील केली.

झाले असे की, जान्हवी वर्षा उसगांवकरांबरोबर भांडण करताना त्यांच्या पुरस्कारांबाबत बोलली ती म्हणाली, “ही फालतूची ओव्हरअ‍ॅक्टिंग नका करू… त्यांना आता पश्चाताप होत असेल यांना आपण पुरस्कार का दिले? कारण, बाहेर अनेक चांगले-चांगले अभिनेते आहेत. त्यांना पुरस्कार मिळाले नाहीत…पण, तुम्हाला दिलाय.” ती पुढे म्हणाली, “ताई मी सुरुवातीपासून तुमचा आदर केलेला आहे. पण माझ्या नादी लागू नका. पोरं बसतात तिथे तुम्ही केस उडवत येता. तुमची घाणेरडी ऍक्टिंग तुमच्याकडेच ठेवा”.

BB Megha Dhade Post

जान्हवीने केलेल्या या सर्व वक्तव्यांवरून तिला आता मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तिला ट्रोल करणाऱ्यांमध्ये नेटकरी तर आहेतच सोबतच अनेक कलाकार देखील आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत बऱ्याच कलाकारांनी तिला खडेबोल सुनावले. यातच बिग बॉसची माजी स्पर्धक असलेल्या मेघा धाडेचा देखील समावेश आहे. तिने तिच्या अकाऊंटवरून खरमरीत पोस्ट करत जान्हवीला घरातून बाहेर काढण्याची निर्मात्यांना आणि रितेश देशमुखला विनंती केली आहे.

मेघा धाडेने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “माझ्या लाडक्या ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेक्षकांनो ही आगाऊ कार्टी जान्हवी नॉमिनेशनला आलीच तर तिला सोडू नका… तिला बाहेरचा रस्ता नक्की दाखवा. ही माझी कळकळीची विनंती आहे. ‘बिग बॉस मराठी’ची सर्वांत वाईट स्पर्धक…जान्हवी किल्लेकर”

======

हे देखील वाचा : जान्हवीने केला वर्षा उसगांवकरांचा अपमान
======

पुढे मेघा लिहिते, “मला अजूनही आठवतंय की, हिंदी ‘बिग बॉस’मध्ये सलमान खान सरांनी प्रियांका जग्गा आणि स्वामी ओम यांना ‘बिग बॉस’च्या घरातून त्यांनी केलेल्या चुकीच्या वागणुकीबद्दल बाहेर काढलं होतं. आता आम्हाला रितेश देशमुख सरांकडून सुद्धा हीच अपेक्षा आहे. तुम्ही याबद्दल नक्की काहीतरी बोला.. काही स्पर्धकांप्रती जान्हवी किल्लेकरचं असं वागणं अत्यंत चुकीचं आहे. रितेश सर, प्लीज तिला बाहेर हाकलून द्या… आम्हाला असे लोक घरात नको आहेत. ही माझी कळकळीची विनंती आहे.”

दरम्यान सोशल मीडियावर ट्रोल होणाऱ्या जान्हवीला विकेंडचा वारमध्ये ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुख काय बोलतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे. Top Stories
 Original content is posted on: https://gajawaja.in/bigg-boss-marathi-5-megha-dhade-wrote-angry-post-on-janhavi-killekar-behaviour-marathi-info/

Comments

Popular posts from this blog

Himalayan gold hit by climate.

Putin warned 'Bachke rehna re baba..'

Planning to tour through a travel package? Read this first