America : 12 ऑगस्टला अमेरिकेत काय होणार ?
अमेरिकेच्या सोशल मिडियामध्ये सध्या दोनच गोष्टी चर्चेत आहेत, त्यापैकी एक म्हणजे, 12 ऑगस्ट रोजी काय होणार, आणि दुसरी गोष्ट म्हणजे, अॅनिमेटेड शो द सिम्पसन्स. याच द सिम्पसन्स शो च्या एका भागात काही वर्षापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूची भविष्यवाणी केली आहे. द सिम्पसंस एक अमेरिकी एनिमेटेड सिटकॉम आहे. अमेरिकी जीवनाचे एक व्यंगात्मक चित्रण यात केले आहे. सिम्पसन कुटुंबातील होमर , मार्ज , बार्ट , लिसा आणि मॅगी या अनेक पात्रांनी कायम अमेरिकेतील समाजजीवनाला जगासमोर आणले आहे. याच द सिम्पसंस शो च्या एका भागात डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील अशी भविष्यवाणीही करण्यात आली होती. तर आता या शो च्या एका भागात डोनाल्ड ट्रम्प यंचा मृत्यू झाल्याचा व्हिडिओ दाखवण्यात आला. (America) International News हा व्हिडिओ खूप आधीचा असून या शोतून आता हा भाग काठून टाकण्यात आला आहे. मात्र जेव्हा हा भाग दाखवण्यात आला होता तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मिळतेजुळते पात्र व्हाईट हाऊसमध्ये चक्कर येऊन पडतांना दाखवले होते. ही तारीख 12 ऑगस्ट 2025 दाखवण्यात आली असून व्हिडिओमध्ये ट्र...