Donald Trump : ट्रम्प लवकरच बराक ओबामांना अटक करणार?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मिडियावर केलेल्या एका पोस्टमुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना अटक केल्याचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. अर्थात हा व्हिडिओ एआय तंत्रज्ञानाच्या मदतीनं तयार झाला असला तरी ट्रम्प खरोखरच ओबामा यांना अटक करण्याची तयारी करत असल्याचे अमेरिकेतील राजकीय तज्ञांचे मत आहे. कारण या व्हिडिओमध्ये ट्रम्प हे ओबामांना अटक करताना हसताना दाखवण्यात आले आहेत, शिवाय कोणीही कायद्यापेक्षा मोठे नाही, असा मेसेजही या पोस्टवर ट्रम्प यांनी लिहिला असल्यामुळे ट्रम्प लवकरच बराक ओबामांना अटक करणार अशी चर्चा सुरु झाली आहे. (Donald Trump) International News
ट्रम्प आणि ओबामा यांच्या या दुष्मनीमागे असलेले खरे कारणही चर्चेत आले आहे. या सर्वामागे ट्रम्प यांचा मागचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाल आहे. अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या प्रमुख आणि ट्रम्प प्रशासनात सामील झालेल्या माजी काँग्रेस सदस्य तुलसी गॅबार्ड यांनी 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीत ओबामा प्रशासनावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. ओबामा यांनी रशियाला ट्रम्प यांच्या संदर्भातील गुप्त माहिती देत, ट्रम्प आणि पर्यायानं अमेरिकेची फसवणूक केल्याचा हा आरोप आहे. यात फक्त ओबामाच नाहीच, तर अमेरिकेतील सहा प्रतिष्ठितांचाही समावेश असल्याचा बॉम्बस्फोट तुलसी गॅबार्ड यांनी केला आहे. तुलसी यांनी हा खुलासा केल्याबरोबर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बराक ओबामा यांच्या अटकेचा एआय व्हिडिओ प्रसिद्ध करून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. या घटनेमुळे अमेरिका आणि जगभरात खळबळ उडाली आहे. शिवाय ओबामा यांच्यासह अन्य सहा जणं कोण होते, याचीही चौकशी सुरु झाली आहे. (International News)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना अटक करण्याच्या तयारीत असल्याची कुजबूज अमेरिकेत सुरु आहे. ट्रम्प यांनी ओबामा तुरुंगात असल्याचे दाखवणारा एक फोटो आणि त्यांना अटक होत असतांनाचा व्हिडिओही शेअर केला आहे. या एआय व्हिडिओमध्ये एफबीआय ओबामा यांना अटक करत आहे, तेव्हा त्यांच्या शेजारी असलेले ट्रम्प हसत आहेत. या व्हिडिओमध्ये ओबामांच्या हातकड्याही दिसत आहेत. यानंतर, ओबामा नारंगी रंगाचा जंपसूट घालून तुरुंगात प्रवेश करताना दिसतात. या व्हिडिओनंतर खळबळ उडाली असतानाच ट्रम्प यांनी ओबामा यांचा अटकेत असलेला फोटोही शेअर केला आहे. शिवाय कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, अशी कॅप्शन या फोटोला दिल्यामुळे ओबामा खरोखरच तुरुंगात जाणार असल्याची अटकळ अमेरिकेतील तज्ञ व्यक्त करीत आहेत. यासर्वामागे अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुख तुलसी गॅबार्ड यांनी ओबामांविरुद्ध जमा केलेले पुरावे आहेत. (Donald Trump)
ट्रम्प यांनी पहिल्यांदा अमेरिकेची राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकल्यानंतर ओबामा यांनी रशियाशी संगनमत केल्याचे तुलसी गॅबार्ड यांनी पुरावे सादर केले आहेत. ट्रम्प यांना राष्ट्रपदीपदापासून दूर कऱण्यासाठी ओबामा प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी रशियाची मदत घेतली. या घटनेचा पुरावा देणारी कागदपत्रे तुलसी यांच्या ताब्यात आहेत. आता ही कागदपत्रे पुढील कारवाईसाठी एफबीआयकडे देण्यात येणार आहेत. त्यामुळेच ट्रम्प यांनी व्हिडिओमध्ये ओबामांना एफबीआय अटक करण्याचे दाखवले आहे. तुलसी गॅबार्ड यांनी दिलेल्या अहवालात असा दावा केला की, ओबामा प्रशासनाने माध्यमांमध्ये खोट्या बातम्या पसरवण्यासाठी जाणूनबुजून गोपनीय माहिती लीक केली. त्यातून अमेरिकेतील प्रमुख माध्यम संस्थांनी सायबर हल्ला करून ट्रम्पच्या विजयात रशियाने हस्तक्षेप केल्याच्या बातम्या पसरवल्या. (International News)
================
हे देखील वाचा : Kim Jong Un : किमच्या औषधाची उत्तर कोरियाच्या नागरिकांना भीती !
================
याबाबत 6 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध झालेला गुप्तचर अहवाल देखील एका बनावट कागदपत्रावर आधारित असल्याचेही तुलसी यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. ओबामा व्यतिरिक्त, या कटामध्ये राष्ट्रीय गुप्तचर संचालक जेम्स क्लॅपर, माजी सीआयए संचालक जॉन ब्रेनन, तत्कालीन परराष्ट्र मंत्री जॉन केरी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसान राइस आणि एफबीआयचे उपसंचालक अँड्र्यू मॅककेब यांचाही समावेश असल्याचा उल्लेख या अहवालात आहे. याशिवाय अमेरिकेतील प्रतिष्ठित प्रसिद्धी माध्यमांच्या प्रमुखांचाही यात समावेश आहे. यासंदर्भातले सर्व पुरावे तुलसी यांनी पुढील कारवाईसाठी एफबीआयकडे सुपूर्द केले आहेत. या अहवालाचे नाव रशिया होक्स, असे आहे. या सर्व प्रकरणावर बराक ओबामा यांनी अद्याप कुठलेही वक्तव्य केलेले नाही. ओबामा याबाबत कायदेशीर सल्ला घेत असल्याची माहिती आहे. (Donald Trump) Latest International News
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
Original content is posted on https://gajawaja.in/will-trump-arrest-barack-obama-soon/
Comments
Post a Comment