Ekadshi : भाद्रपदामध्ये येणाऱ्या परिवर्तिनी एकादशीचे महात्म्य
श्रावणानंतर येणार भाद्रपद महिना देखील हिंदूंसाठी अतिशय महत्वाचा असतो. याच महिन्यात गणेशोत्सव, राधाराणी अष्टमी, पितृपक्ष येतात. याच भाद्रपद महिन्यात येणाऱ्या एकादशीला देखील अनन्यसाधारण महत्व आहे. भाद्रपदामध्ये शुक्ल पक्षातील एकादशीला परिवर्तिनी किंवा जलझुलणी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. तसे पाहिले तर वर्षभरामध्ये २४ एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचे वेगळे महत्व असते. असेच महत्व परिवर्तिनी एकादशीचे देखील आहे. जाणून घेऊया याच एकादशीबद्दल. (Bhadrapad) Top stories पंचांगानुसार, परिवर्तिनी एकादशी तिथीची सुरुवात बुधवार, ३ सप्टेंबर रोजी पहाटे ३.५३ वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी पहाटे ४.२१ वाजता होईल. उद्यतिथीनुसार परिवर्तिनी एकादशीचे व्रत बुधवार, ३ सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णूंच्या वामन अवताराची पूजा केली जाते, यामुळे भक्तांची पाप नष्ट होतात आणि जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते. परिवर्तिनी एकादशीला पद्मा एकादशी, पार्श्व एकादशी किंवा जयंती एकादशी असेही संबोधले जाते. पुराणानुसार, भगवान विष्णू...