Ekadshi : भाद्रपदामध्ये येणाऱ्या परिवर्तिनी एकादशीचे महात्म्य

 

श्रावणानंतर येणार भाद्रपद महिना देखील हिंदूंसाठी अतिशय महत्वाचा असतो. याच महिन्यात गणेशोत्सव, राधाराणी अष्टमी, पितृपक्ष येतात. याच भाद्रपद महिन्यात येणाऱ्या एकादशीला देखील अनन्यसाधारण महत्व आहे. भाद्रपदामध्ये शुक्ल पक्षातील एकादशीला परिवर्तिनी किंवा जलझुलणी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. तसे पाहिले तर वर्षभरामध्ये २४ एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचे वेगळे महत्व असते. असेच महत्व परिवर्तिनी एकादशीचे देखील आहे. जाणून घेऊया याच एकादशीबद्दल. (Bhadrapad) Top stories

पंचांगानुसार, परिवर्तिनी एकादशी तिथीची सुरुवात बुधवार, ३ सप्टेंबर रोजी पहाटे ३.५३ वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी पहाटे ४.२१ वाजता होईल. उद्यतिथीनुसार परिवर्तिनी एकादशीचे व्रत बुधवार, ३ सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णूंच्या वामन अवताराची पूजा केली जाते, यामुळे भक्तांची पाप नष्ट होतात आणि जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते. परिवर्तिनी एकादशीला पद्मा एकादशी, पार्श्व एकादशी किंवा जयंती एकादशी असेही संबोधले जाते. पुराणानुसार, भगवान विष्णू या दिवशी योगनिद्रेत असताना कूस बदलतात घेतात, म्हणूनच या एकादशीला ‘परिवर्तिनी’ असे नाव पडले आहे. (Parivartini Ekadshi)

या दिवशी आयुष्मान, सौभाग्य आणि श्रीवत्स असे तीन शुभ योग निर्माण होत आहेत. त्यामुळे या एकादशीचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व आणखी वाढले आहे. या व्रतामुळे भक्तांना आयुष्यवृद्धी, सौभाग्य आणि विष्णुकृपा लाभते, असे मानले जाते. या दिवशी विधीपूर्वक उपवास केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते. सर्व दुःखांपासून मुक्ती देणारी परिवर्तनी एकादशी मानली जाते.  या दिवशी उपवास आणि व्रत केल्याने वाजपेय यज्ञाचे फळ मिळते. (Marathi News)

या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बाल रूपाची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान विष्णूने वामनाच्या रूपात राजा बलीला सर्व काही दान करण्यास सांगितले होते. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूने त्याची मूर्ती सुपूर्द केली. या कारणास्तव याला वामन ग्यारस असेही म्हणतात. या व्रताच्या दिवशी व्यक्तीने उपवास केल्यास जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे केलेले सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष मिळतो. जे लोकं हे व्रत भक्ती आणि श्रद्धेने पाळतात, त्यांना हजार अश्वमेध यज्ञांसारखेच पुण्यपूर्ण फळ मिळते. (Todays Marathi Headline)

Ekadshi

परिवर्तिनी एकादशी कथा
परिवर्तिनी एकादशीला जयंती एकादशी असे म्हणतात. त्याचा यज्ञ केल्याने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते. तसेच पापांचा नाश होतो. या एकादशीला जो मनुष्य वामन स्वरुपाची पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्ती होते. (Marathi Top Headline)

महाभारतील युगात भगवान श्रीकृष्णाने पांडूचा मुलगा अर्जुनाच्या विनंतीवरुन परिवर्तिनी एकादशीचे महत्त्व विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आहे. त्रेतायुगात बळी नावाच्या राक्षस होता, तो अत्यंत दानशूर, सत्यवादी आणि ब्राह्मणांचा भक्त होता. त्याच्या भक्तीच्या प्रभावाने तो स्वर्गलोकात इंद्र देवाच्या ठिकाणी राज्य करत होता. त्याने इंद्र देवाचा पराभव करुन तो देवाचा राजा बनला. त्यामुळे देवराज इंद्र आणि इतर देव घाबरून भगवान विष्णूकडे गेले. (Top Marathi News)

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, वामनाचे रूप घेऊन मी राजा बळीला विनवणी केली, हे राजा! तू मला तीन पावले जमीन दान कर, याने तुला तिन्ही लोकांच्या दानाचे फळ मिळेल. राजा बळीने माझी प्रार्थना स्वीकारली आणि जमीन दान करण्यास तयार केले. दानाचा संकल्प करताच मी दैत्याचे रूप धारण केले आणि एका पायापासून पृथ्वी, दुसऱ्या पायाच्या टाचेने स्वर्ग आणि नखांनी ब्रह्मलोक मोजले. (Top Trending News)

राजा बळीकडे तिसर्‍या पायी काहीच उरले नव्हते. म्हणून त्याने आपले डोके पुढे केले आणि भगवान बामनांनी तिसरा पाय त्याच्या डोक्यावर ठेवला. राजा बळीच्या वचनबद्धतेने प्रसन्न होऊन भगवान बामनने त्याला अधोलोकाचा स्वामी बनवले. मी राजा बळीला सांगितले की मी सदैव तुझ्यासोबत असेन. परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी माझी एक मूर्ती राजा बळीसोबत राहून शेषनागावर क्षीरसागरात झोपते. या एकादशीला भगवान विष्णू झोपताना आपली बाजू बदलतात. (Latest Marathi Headlines)

=========

Ashtavinayak : अष्टविनायकातील सहावा गणपती – लेण्याद्रीचा गिरिजात्मक

=========

परिवर्तिनी एकादशी पूजा पद्धत
परिवर्तिनी एकदशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे लवकर उठावे नित्यकर्म आटोपल्यानंतर शुचिर्भूत होऊन, परिवर्तिनी एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. श्रीविष्णूंच्या प्रतिमेची किंवा मूर्तीची चौरंगावर स्थापना करावी. यानंतर विष्णूला पंचामृत अभिषेक करावा. त्याच पंचामृताचा नंतर नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. (Top Stories)

धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे. ॐ नमो भगवते वासुदेवाय जप करणे खूप शुभ मानले जाते. पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा वापर करावा, कारण तुळस भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. मात्र, एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये किंवा तिची पाने तोडू नयेत. (social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Original content is posted on https://gajawaja.in/parivartini-ekadashi-2025-when-is-parivartini-ekadashi-shubh-muhurt-and-significance/

Comments

Popular posts from this blog

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Holi : जाणून घ्या होळीमध्ये नारळ का अर्पण करण्यामागचे कारण

Prayagraj : महाकुंभमध्ये काय बघाल !