Posts

Showing posts with the label latest marathi news

New Year : ‘या’ आहे जगातील काही देशाच्या नवीन वर्ष साजरे करण्याच्या युनिक पद्धती

Image
  २०२६ या नवीन वर्षाची अतिशय दणक्यात आणि जल्लोषात सुरुवात झाली. प्रत्येकाने पार्टी करत, फटाक्यांची आतिषबाजी करत २०२५ ला निरोप दिला आणि २०२६ चे स्वागत केले. २०२६ या इंग्रजी नवीन वर्षाचे स्वागत काही मोजके देश वगळता जगातील सर्वच देशांमध्ये २०२६ या नवीन वर्षाचा जल्लोष पाहायला मिळाला. प्रत्येक देशातील लोकांनी आपापल्या प्रथेप्रमाणे नवीन वर्षाचे स्वागत केले. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जगामध्ये नवीन वर्ष साजरे करण्याच्या अतिशय अनोख्या पद्धती आहेत. आज आम्ही तुम्हाला जगातील काही देश आणि न्यू इयर साजऱ्या करण्याच्या हटके पद्धतींबद्दल सांगणार आहोत. (New Year Celebration) Marathi news डेन्मार्क : प्लेट्स फोडून साजरा डेन्मार्कमध्ये नवीन वर्ष अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरे केले जाते. येथील लोकं नवीन वर्षाच्या दिवशी त्यांच्या मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या दरवाज्याच्या बाहेर काचेच्या प्लेट्स फोडतात. ऐकायला विचित्र वाटेल मात्र हे खरे आहे. ज्याच्या घराबाहेर जितक्या जास्त प्लेट्स तुटतील तितके त्या घरातील लोकं नशीबवान असल्याचे समजले जाते. डेन्मार्कमधील ही परंपरा लोकांमधील मैत्री, प्रेम आणि चांगल्या...

Horoscope : मेष ते मीन कोणत्या राशीसाठी आहे आजचा दिवस खास…?

Image
  २०२६ साल सुरु झाले असून, आज नवीन वर्षातील दुसरा दिवस आहे. आज ०२-०१-२०२६ शुक्रवारचा दिवस. आजची तिथी शुक्ल​ चतुर्दशी असून आजचे नक्षत्र मृगशीर्ष आहे. आजच्या दिवसातील अमृतकाळ सकाळी ०८:३२ ते ०९:५५ इतका असेल तर राहूकाळ ११:१७ ते १२:४० पर्यंत असेल. आज सुर्योदय ०६:४५:०० सकाळी झाला असून, सुर्यास्त संध्याकाळी ०५:०६ मिनिटांनी होईल. आज दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल चला जाणून घेऊया. Latest marathi news मेष आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. आज तुमच्यातील आत्मविश्वास चांगल्या कामासाठी वापरा. आज तुम्हाला आर्थिक क्षेत्रातील सकारात्मक प्रयत्नांचे अनुकूल परिणाम मिळतील. या वर्षी, तुम्ही वाहन किंवा घर खरेदी करू शकाल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. तसेच, आजच्या दिवसात तुमच्या हातून शुभकार्य घडण्याची शक्यता आहे. वृषभ आजचा दिवस हा सकारात्मक दृष्टिकोनाने काम करण्याचा हा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी इतरांच्या गरजांना जास्त महत्त्व देऊ नका. तुमच्या ध्येयांना प्राधान्य द्या. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून कामाच्या ठिकाणी सन्मानित केले जाऊ शकते. मिथुन आजच्या दिवसाची सुरुवात ...

Hindu Village : मुस्लिम राष्ट्रात असूनही ‘हे’ आहे जगातील सर्वात स्वच्छ हिंदू गाव

Image
  भारताचे जगभरात नाव खूपच आदराने घेतले जाते. जगभरात लोकं भारताबद्दल प्रेम व्यक्त करत भरभरून बोलतात. हिंदू राष्ट्र म्हणून कायमच भारताचे नाव अग्रणी आहे. असे असले तरी जशा नाण्याला दोन बाजू असतात, तसेच जसे भारताचे कौतुक होते तसेच भारताला अनेक गोष्टींसाठी नावं देखील ठेवले जातात. यातलेच एक बाब म्हणजे, भारतातील अस्वच्छता. या एका गोष्टीसाठी भारत जगभरात कुप्रसिद्ध आहे. अनेकदा माहेरच्या देशातील पर्यटक देखील भारतातील अस्वच्छतेचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. यासाठी कायमच भारतीयांची मान कायम खाली जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका हिंदू गावाबद्दल सांगणार आहोत जे जगातील सर्वात स्वच्छ हिंदू गाव म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. आणि मुख्य बाब म्हणजे ते गाव भारतातील नाहीये. (Marathi News) Latest Marathi News गाव भारतातील नाही म्हटल्यावर अनेकांना आश्चर्य वाटले असेल. कारण हिंदू गाव असून देखील भारतात नाही हे जरा ऐकायला विचित्र वाटते. मात्र हे खरे आहे. भारताच्या जवळ असलेल्या एका मुस्लिम राष्ट्रांमध्ये हे स्वच्छ असणारे हिंदू गाव आहे. या गावाचे नाव आहे, ‘पेंगलीपुरण’. जगातील सर्वात स्वच्छ असणा...

Sulakshana Pandit : अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे निधन, ‘या’ अभिनेत्यासाठी राहिल्या आजन्म अविवाहित

Image
  ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपला निरोप घेतला. हा सिलसिला नोव्हेंबरमध्ये देखील सुरूच आहे. असरानी, सतीश शाह, पंकज धीर आदी अनेक मोठ्या कलावंतांच्या निधनानंतर आता बॉलिवूडमधील अतिशय जेष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री, गायिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुलक्षणा पंडित यांचे देखील निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला सुलक्षणा यांनी केवळ आपल्या अभिनयाने आणि सौंदर्यानेच नाही तर आपल्या सुमधुर आवाजाने देखील प्रेक्षकांचे मनं जिंकले होते. बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्री आणि गायिका अशी त्यांची ओळख होती. सोशल मीडियावर कलाकारांसोबतच त्यांच्या चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Sulakshana Pandit) Latest Marathi News प्रकृती अस्वास्थामुळे सुलक्षणा यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलक्षणा पंडित या अभिनेत्री विजेता पंडित आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध, लोकप्रिय संगीतकार जोडी जतिन-ललित यांच्या बहीण होत्या. दरम्यान सुलक्षणा यांचे भाऊ असलेल्या ललित पंडित यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, ललित ...

Health : नियमित पेरू खाल्ल्याने होतील अनेक आश्चर्यकारक फायदे

Image
  फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर डॉक्टर एक दोनदा जेवणापेक्षा एक वेळेस बहुतकरून रात्री केवळ फळं खाल्ली तरी चालतील असा सल्ला देखील देतात. फळं आपल्या आरोग्याला नीट ठेवण्यामध्ये मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे कायमच फळांचे सेवन मनुष्यासाठी लाभदायक मानले गेले आहे. सुदैवाने भारत हा विविध उत्कृष्ट फाळणी समृद्ध असा देश आहे. भारतात बाराही महिने विविध प्रकारची उत्तम फळं मिळतात. याच फळांचे महत्त्व सगळ्यांनाच माहित असल्याने भारतातील लोकांच्या घरात भरपूर फळं पाहायला मिळतात. याच फळांपैकी एक महत्त्वाचे फळ म्हणजे पेरू. (Health) Marathi news बहुतकरून हिवाळ्यामध्ये पेरू बाजारात जास्त दिसायला लागतात. बाहेरून पिवळसर हिरवा आणि आतून पांढरा, गुलाबी रंगाचा गोड रसाळ पेरू सगळ्यांच्याच आवडीचे फळ आहे. विशेष म्हणजे पेरूचे झाड उष्ण भागात वाढते आणि त्याची फळे पावसाळ्यात आणि थंडीच्या काळात येतात. पेरू हे खूप कमी कॅलरी आणि उच्च पौष्टिक घनता असलेले फळ आहे. त्यात फॅट फारच कमी असते. यामध्ये प्रामुख्याने कार्ब आणि फायबर असतात. पेरूची खास गोष्ट म्हणजे चवीला गोड असूनही त्यात ...

Tulshi Care : डेरेदार तुळशीसाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

Image
  भारतात प्रत्येकाच्याच घराबाहेर आपल्याला तुळशी दिसतेच. घरात प्रवेश करण्यापूर्वी तुळशीचे दर्शन घेतले जाते. तुळशी ही हिंदू धर्मीय लोकांच्या एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे. तुळशीला जेवढे धार्मिक महत्त्व आहे, तेवढेच वैद्यकीय महत्त्व देखील आहे. घरासमोर तुळशी लावणे पवित्र समजले जाते. त्यामुळे सगळेच लोकं आपल्या घरात तुळशी लावतात. जुन्या ग्रंथांमधील माहितीनुसार या तुळशीचा साधारण तीन हजार वर्षांहून अधिक समृद्ध इतिहास आहे. तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचाही वास असतो. (Tulshi Care) Latest Marathi News तुळशीचे रोप घरात लावल्याने वातावरण शुद्ध होते, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्यामुळे अनेक आरोग्य फायदे देखील मिळतात. मात्र अनेक घरांमध्ये तुळशी कितीही वेळा लावली तरी ती जास्त काळ जगत नाही. लावल्यानंतर काही दिवसातच ती कोरडी पडते, तिला कीड लागते किंवा जळून जाते. अनेक उपाय करून खत टाकून देखील तुळशी अपेक्षेप्रमाणे जगत नाही. आता अनेक घरांमध्ये तुळशीच्या लग्नाच्या दृष्टीने तुळशी लावली जाईल तेव्हा तिची निगा कशी राखावी? काय टिप्स फॉलो कराव्या जेणेकरून तुळशी खराब होणार नाही आणि चांगली बहरेल? चला जाणून घेऊया. (Marath...