New Year : ‘या’ आहे जगातील काही देशाच्या नवीन वर्ष साजरे करण्याच्या युनिक पद्धती
२०२६ या नवीन वर्षाची अतिशय दणक्यात आणि जल्लोषात सुरुवात झाली. प्रत्येकाने पार्टी करत, फटाक्यांची आतिषबाजी करत २०२५ ला निरोप दिला आणि २०२६ चे स्वागत केले. २०२६ या इंग्रजी नवीन वर्षाचे स्वागत काही मोजके देश वगळता जगातील सर्वच देशांमध्ये २०२६ या नवीन वर्षाचा जल्लोष पाहायला मिळाला. प्रत्येक देशातील लोकांनी आपापल्या प्रथेप्रमाणे नवीन वर्षाचे स्वागत केले. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जगामध्ये नवीन वर्ष साजरे करण्याच्या अतिशय अनोख्या पद्धती आहेत. आज आम्ही तुम्हाला जगातील काही देश आणि न्यू इयर साजऱ्या करण्याच्या हटके पद्धतींबद्दल सांगणार आहोत. (New Year Celebration) Marathi news
डेन्मार्क : प्लेट्स फोडून साजरा
डेन्मार्कमध्ये नवीन वर्ष अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरे केले जाते. येथील लोकं नवीन वर्षाच्या दिवशी त्यांच्या मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या दरवाज्याच्या बाहेर काचेच्या प्लेट्स फोडतात. ऐकायला विचित्र वाटेल मात्र हे खरे आहे. ज्याच्या घराबाहेर जितक्या जास्त प्लेट्स तुटतील तितके त्या घरातील लोकं नशीबवान असल्याचे समजले जाते. डेन्मार्कमधील ही परंपरा लोकांमधील मैत्री, प्रेम आणि चांगल्या नातेसंबंधांचे प्रतीक असल्याचे समजले जाते. नवीन वर्षाची सुरुवात करताना या देशात मध्यरात्री १२ वाजेनंतर खुर्चीवरून उडी मारणे देखील शुभ मानले जाते. (Marathi News)
स्कॉटलंड : फर्स्ट फूटिंग
स्कॉटलंडमध्ये नवीन वर्ष हे “होगमने” नावाने प्रसिद्ध आहे. या देशात नवीन वर्षाच्या दिवशी “फर्स्ट फूटिंग” ठेवण्याची परंपरा खूपच लोकप्रिय आहे. म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या घरात प्रवेश करणारी पहिली व्यक्ती त्या घराचे, घरातील लोकांचे नशीब आणते असे मानले जाते. होगमने या दिवशी उंच आणि काळ्या केसांच्या व्यक्तींना शुभ मानले जाते. ज्यांच्या घरात अशा व्यक्ती पहिल्या येतात ते खूपच लकी असतात. (Todays Marathi Headline)
स्पेन : १२ द्राक्ष खाण्याची परंपरा
स्पेनमध्ये देखील नवीन वर्षाचे सेलिब्रेशन खूप जोरदार केले जाते. मध्यरात्री १२ वाजता इथे १२ वेळा घंटेचा नाद केला जातो, त्या प्रत्येक घंटासोबत एक द्राक्ष खाण्याची परंपरा या देशात आहे. प्रत्येक घंटासोबत बारा द्राक्षे खाल्ली जातात, जी वर्षातील १२ महिन्यांचे प्रतीक समजले जाते. मागचे कारण म्हणजे, जो कोणी योग्य वेळी सर्व द्राक्षे खातो त्याचे वर्ष आनंदी जाते आणि त्याच्यासाठी नवीन वर्ष भाग्यशाली असते. (Top Marathi News)
आणखी शोधा
आरोग्य आणि कल्याण उत्पादने
राशीभविष्य सदस्यता
ताज्या मराठी बातम्या
आध्यात्मिक मार्गदर्शन
स्थानिक पर्यटन पॅकेजेस
आरोग्य पूरक उत्पादने
आरोग्य माहिती
मनोरंजन बातम्या
गणपती अथर्वशीर्ष
जीवनशैली टिप्स
अमेरिका : टाइम्स स्क्वेअरमध्ये बॉल ड्रॉप
न्यू यॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर हा परिसर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. अमेरिकेतील याच सर्वात प्रसिद्ध असलेल्या न्यू यॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये नवीन वर्षाचा मोठा जल्लोष पाहायला मिळतो. दरवर्षी रात्री बरोबर १२ वाजता आकाशातून एक चमकदार बॉल खाली पडतो किंबहुना बॉल खाली पडला जातो. हा चमकदार बॉल पाहण्यासाठी लाखो लोक जमतात. चेंडू जमिनीवर पडताच नवीन वर्ष सुरू होते आणि संपूर्ण परिसर फटाक्यांच्या आणि टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून जातो. (Latest Marathi HEadline)
आणखी शोधा
बैल पोळा
सामाजिक बातम्या
माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम
आध्यात्मिक मार्गदर्शन
व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण
राशीभविष्य सदस्यता
आरोग्य पूरक उत्पादने
गाजावाजा स्पेशल
मराठी चित्रपट तिकीट
लाईफस्टाईल उत्पादने
इटली : जुन्या गोष्टींना देतात निरोप
इटलीमध्ये लोकं नवीन वर्षाच्या दिवशी जुन्या वस्तू बाहेर काढून टाकण्याची परंपरा पाळतात. विशेषतः जुनी भांडी, फर्निचर किंवा न वापरलेल्या वस्तू खिडकीबाहेर फेकल्या जातात. याचा अर्थ जुन्या वर्षाची नकारात्मकता मागे सोडून नवीन वर्षाचे खुल्या मनाने स्वागत करणे. इटली मध्ये नव वर्षाचे स्वागत करताना लाल कपडे घालणे देखील शुभ मानले जाते. (Top Trending News)
आणखी शोधा
क्रीडा बातम्या
मराठी कला आणि हस्तकला
साहित्य माहिती
सामाजिक बातम्या
चांदीचे कड
टॉप स्टोरीज
ज्योतिषशास्त्र सल्ला सेवा
व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण
गुरुचरित्र पारायण
सामाजिक समस्यांवर कार्यशाळा
=======
New Year : जाणून घ्या २०२६ या नवीन वर्षातील सण-उत्सवांची संपूर्ण यादी
आणखी शोधा
संजु राठोड
मराठी साहित्य पुस्तके
गणपती अथर्वशीर्ष
लाईफस्टाईल उत्पादने
टॉप स्टोरीज
सामाजिक बातम्या
राशीभविष्य सदस्यता
आरोग्य माहिती
दीप अमावस्या
राशी भविष्य
=======
जपान : १०८ घंटांचा आवाज
जपानमध्ये नवीन वर्षाचे स्वागत अत्यंत शांततापूर्ण आणि आध्यात्मिक पद्धतीने केले जाते. इथे विनाकारण धिंगाणा या दिवशी पाहायला मिळत नाही. ३१ डिसेंबरच्या रात्री, बौद्ध मंदिरांमध्ये “जोया नो केन” नावाची परंपरा पाळली जाते. यामध्ये मंदिरात १०८ वेळा घंटा वाजवली जाते. १०८ वेळा घंटा वाजवण्याचे कारण म्हणजे, असे मानले जाते की एखाद्या व्यक्तीमध्ये १०८ प्रकारच्या वाईट इच्छा असतात आणि प्रत्येक घंटाचे आवाज माणसाच्या आतील वाईट इच्छांना दूर करते. जेव्हा १०८ घंटा वाजून पूर्ण होतात तेव्हा लोक शुद्ध अंतःकरणाने नवीन वर्षाचे स्वागत करतात. (Social News) Latest Marathi News
आणखी शोधा
मराठी चित्रपट तिकीट
मराठी साहित्य पुस्तके
सामाजिक समस्यांवर कार्यशाळा
शिवाजी महाराज
गुरुचरित्र पारायण
आध्यात्मिक मार्गदर्शन
माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रम
सांस्कृतिक कार्यक्रम तिकीट
राजकीय विश्लेषण अहवाल
टॉप स्टोरीज
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
Original content is posted on https://gajawaja.in/these-countries-around-the-world-celebrate-the-new-year-in-their-own-unique-way/
Comments
Post a Comment