Holi : जाणून घ्या होळीमध्ये नारळ का अर्पण करण्यामागचे कारण

 



आज फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी. वाईटाचा चांगल्यावर विजय साजरा करण्याचा आजचा दिवस. हिरण्यकश्यपूची बहीण असलेल्या दृष्ट होलिकाचा नाश आणि भक्ती, नम्रता, दयाळू वृत्तीच्या प्रल्हादाचा विजय. होळी म्हटले की, अनेकांना फक्त रंग, गुलाल, पाणी एवढेच आठवते. मात्र होळी यापलीकडे जाऊन देखील मोठा सण आहे. होळी साजरी करण्यामागे अनेक धार्मिक, वैज्ञानिक कारणं आहेत. यासोबतच होळी कशी साजरी करायची? त्यात काय काय वाहायचे?, कोणत्या वस्तू असाव्या? आदी अनेक गोष्टींबद्दल देखील काही नियम आहेत.(Holi) Top Stories.

अनेकांसाठी तर होलिका दहन म्हणजे होळीमध्ये टाकलेले नारळ काढून खाण्याची चंगळच जणू. कारण हे भाजलेले नारळ खायला खूपच स्वादिष्ट आणि अधिकच गोड लागते. मात्र होळीमध्ये फक्त नारळच टाकतात असे नाही ना. होळी तयार करताना त्यात गोवऱ्या, एरंडेलच्या झाडाची फांदी, तूप, साखरेची माळ, फुलांची माळ आदी अनेक गोष्टी ठेवल्या जातात.(Holi Festival Information)

Holi

मात्र यासोबतच नारळ देखील होळी पूजेचा मोठा आणि महत्वाचा भाग आहे. आता काही जणं नारळ हा होळी पेटवायचा आधीच ठेवतात. तर काही होळी पेटवल्यानंतर त्यात नारळ टाकतात. तर काही ठिकाणी आधी पण ठेवला जातो आणि होळी पेटल्यानंतर देखील नारळ त्यात वाहतात. मग नारळाला होळीमध्ये एवढे महत्व का असते? का होळीमध्ये नारळ अर्पण केला जातो? चला जाणून घेऊया याबद्दल.(Coconut Connection in Holi)

======

हे देखील वाचा : Holi : होळी सणाचे महत्व आणि माहिती

======

आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळ अर्थात श्रीफळ हे शुभ कार्यासाठी आणि प्रत्येक पूजेसाठी वापरले जाते. याच नारळाशिवाय कोणतेही शुभकार्य आणि पूजा नेहमीच अपूर्ण असते. नारळ कामधेनू तर नारळाचे झाड कल्पवृक्ष आहे. नारळाला असलेले तीन डोळे हे त्रिगुणांचे प्रतीक मानलं जातं. दक्षिण भारतात नारळाला तर हरा सोना म्हटलं जातं. नारळाचे आरोग्यासोबतच धार्मिक महत्व देखील खूप आहे. होलिका दहनाचा अग्नि हा अतिशय पवित्र असतो. सर्व वाईट गोष्टी स्वतःमध्ये सामावून चांगली, सकारात्मक ऊर्जा, प्रकाश तो सगळ्यांना देतो. याच होलिका दहनाच्या अग्नीत जी वस्तू आपण वाहतो, अर्पण करतो त्याचा प्रभाव थेट आपल्याला जीवनावर आणि जीवनामध्ये मिळणाऱ्या शुभ आणि लाभदायक गोष्टींवर पडतो.(Marathi Top News)

Holi

त्यामुळेच जर आपण होलिका दहनाच्या वेळी या पवित्र अग्नीमध्ये नारळ अर्पण केल्यास त्याचे अनेक सकारत्मक फायदे आपल्याला मिळतात. जसे की, आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. कर्जाचा बोझा दूर होतो. नकारात्मक गोष्टी आणि नकारात्मक शक्ती घरातून निघून जातात. शिवाय नारळ आजारी व्यक्तींच्या अंगावरून ओवाळून टाकल्यास तिची परिस्थिती देखील सुधारू शकते. यासोबतच असे म्हणतात की, नारळाला अगणित जाळल्याने त्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात.(Trending Marathi News)

======

हे देखील वाचा : Holi : होळीमध्ये त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स

======

होलिका दहनाच्या दिवशी कापूर टाकून नारळ होळीमध्ये अर्पण केल्यास अनेक दिवसांपासून रखडलेली कामे देखील मार्गी लागतात, अशी मान्यता आहे. जसे होळीमध्ये होलिका आणि तिच्या दृष्ट शक्ती नाहीशा झाल्या, तशा आपल्या सर्व वाईट सवयी आणि वाईट गुण हे नारळ अर्पण केल्यास दूर होतात. मात्र होळी नारळ अर्पण करताना तो शेंडी असलेलाच घ्यावा. तो अर्पण करण्याच्या आधी घरावरून, विशिष्ट व्यक्तीवरून ओवाळून मगच होळीला अर्पण करावा. (Latest Marathi News)

Original content is posted on: https://gajawaja.in/know-reason-why-coconut-offer-in-holi-marathi-info/

Comments

Popular posts from this blog

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Prayagraj : महाकुंभमध्ये काय बघाल !

Vasant Panchami देवी सरस्वतीचा जन्मदिन – वसंतपंचमी