अशोक सराफ म्हणाले, “मला विसरले असते तर मी…
मराठी मनोरंजनविश्वासाठी २७ मे हा दिवस ऐतिहासिक आणि सोबतच अभिमानाचा देखील ठरला. याच दिवशी मराठी सिनेसृष्टीतील विनोदाचे बेताज बादशहा असलेल्या अशोक सराफ यांना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोच्च असा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात २५ जानेवारी २०२५ रोजी अशोक सराफ यांना पदमश्री मिळाल्याची घोषणा झाली होती त्यानंतर २७ मे रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Ashok Saraf) Top Marathi Headlines २७ मे रोजी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात भारतातील ६८ प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पुरस्काराने अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आल्यानंतर सर्वत्र फक्त अशोक सराफ यांचीच चर्चा आहे. अभिनय सम्राट अशोक सराफ यांच्या बहारदार अभिनय कारकिर्दीला पद्मश्री पुरस्कारामुळे एक नवी झळाळी आली आहे. कला क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या अशोक सराफ यांना हा मोठा पुरस्कार मिळाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब ठरली आहे. मराठीसोबतच हिंदीमध्ये देखील अशोक स...