Guru Pournima : व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या महर्षी व्यास यांच्याबद्दल रंजक गोष्टी
उद्या सर्वत्र गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मातील अतिशय श्रेष्ठ असे महर्षी व्यास यांचा जन्म आषाढ महिन्यातील पौर्णिमेला झाला होता. त्याच निमित्ताने यादिवशी गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यातील गुरुतुल्य असणाऱ्या व्यक्तीप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करते. आपल्या गुरुची पूजा करून त्यांनी दिलेल्या ज्ञानाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले जातात आणि गुरूंना नमस्कर केला जातो. गुरु आणि शिष्य यांचे नाते दर्शवणारा हा दिवस महत्वाचा समजला जातो. (Maharshi Vyas) Todays Marathi news आषाढ पौर्णिमेला महर्षी व्यास यांचा जन्मदिन असतो आणि म्हणूनच या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी करण्याची प्रथा रूढ झाली. मात्र महर्षी व्यास यांच्याबद्दल जास्त माहिती कदाचित खूप कमी जणांना असेल. महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला एवढेच अनेकांना माहित असेल. मात्र यापेक्षा अधिक कार्य त्यांनी केले आहे. त्यांना हिंदू धर्मातील महान ऋषी म्हणून देखील संबोधले जाते. आज आपण महर्षी व्यास आणि त्यांच्या कार्याबद्दल यांच्याबद्दल जाणून घेऊया. (Marathi News) आपल्या प...