Narasimha Jayanti : नृसिंह जयंतीच्या दिवशी आर्थिक लाभांसाठी ‘हे’ उपाय नक्की कराच
भगवान विष्णू यांच्या दशावताराबद्दल आपल्याला माहिती आहेच. याच दशावतारातील चौथा अतिशय महत्त्वाचा अवतार म्हणजे, नृसिंह अवतार. भगवान विष्णू यांनी त्यांच्या निस्सीम भक्त असलेल्या प्रल्हादाला त्याच्या क्रूर वडिलांच्या हिरण्यकश्यपू राक्षसाच्या जाचातून वाचवण्यासाठी हा अवतार घेतला होता. वैशाख शुद्ध चतुर्दशीला अर्थात उद्या नृसिंह जयंतीचा उत्सव साजरा होणार आहे. या अवतारात परमेश्वराचे रूप अर्धे सिंह आणि अर्धे मानव होते. हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय आणि भक्तांच्या संरक्षणाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक उपवास आणि पूजा करतात. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर उपवास सोडला जातो. नरसिंह जयंती ही खूप शुभ मानली जाते. शारीरिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराची पूजा केली पाहिजे. पद्म पुराणानुसार भगवान विष्णूच्या या उग्र रूपाची पूजा केल्याने पाप नष्ट होते आणि संकटेही दूर होतात. ज्याप्रमाणे विष्णुजींनी भक्त प्रल्हादाचे रक्षण केले, त्याचप्रमाणे कोणत्याही संकटाच्या वेळी भगवान नरसिंहाचे स्मरण केल्यास भक्तांना संकटातून त्वरित मुक्ती मिळते. जे भक्त नृसिंह जयंतीच्या दिवशी ...