Posts

Showing posts from October, 2026

Pitrupaksha : पितृपक्षात नवमी तिथीला केले जाते सव्वाष्णपणी निधन झालेल्या महिलांचे श्राद्ध; जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व

Image
  सध्या पितृपक्ष सुरु असून, प्रत्येक घरांमध्ये आपल्या पूर्वजांच्या निधनाच्या तिथीनुसार श्राद्ध आणि तर्पण केले जात आहेत. पितृपक्षाचा काळ हा १५ दिवसांचा असला तरीही या दिवसात ज्या ज्या तिथींना कुटुंबातील लोकांचे निधन झाले अशा पूर्वजांचे श्राद्ध केले जातात. मुख्य म्हणजे या दिवसांमध्ये अगदी लहान बाळांपासून ते तरुण, विवाहित, अविवाहित, विधवा, सधवा, स्त्री, पुरुष आदी सर्वांसाठीच श्राद्ध तिथी असतात. याच पितृपक्षातील अतिशय महत्वाची तिथी म्हणजे अविधवा नवमी. या दिवशी ज्या स्त्रिया पती जिवंत असताना निधन झाल्या आहेत अर्थात सवाष्ण मृत झाल्या आहेत अशा स्त्रियांचे श्राद्ध केले जाते. (Top Marathi News) पितृपक्षातील नवमी तिथी किंवा अविधवा नवमीला मोठे महत्व आहे. यंदा यावेळी अविधवा नवमी ४ ऑक्टोबर रोजी नवमी श्राद्ध अर्थात अविधवा नवमी श्राद्ध केले जाणार आहे. मातृ नवमी ही भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या नवव्या तिथीला येते. या दिवशी परिवारातील विवाहित महिला ज्या सवाष्ण म्हणून मरण पावलेल्या त्या महिलांसाठी पिंड दान केले जाते. या दिवशी दिवंगत आई तसेच कुटुंबातील सौभाग्यवती महिलांच्या स्मरणार्थ श्राद्ध कर...