Rahul Gandhi : भारतीय जनता पक्षाच्या विजयाचे ‘स्क्रिप्ट राईटर’ राहुल गांधी

 

Rahul Gandhi

या लेखाचे शीर्षक वाचून बुचकळ्यात पडलात ना!! कित्येक BJP चे समर्थक चिडतील सुद्धा कारण Narendra Modi हेच आत्तापर्यंत भाजपच्या दिग्विजयी घोडदौडीचे प्रमुख शिल्पकार मानले जातात. मग त्यांना डावलून Rahul Gandhi यांना त्याचे श्रेय का द्यायचे असा प्रश्न पडला तर नवल नाही. पण एक लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मोदी हे आपल्या कर्तृत्वाची रेखा (रेष) सतत मोठी करत असताना ती रेखा आहे त्यापेक्षा कितीतरी मोठी भासते त्याचे संपूर्ण श्रेय राहुल गांधींना जाते. बिरबलाने एक छोटी रेषा न पुसता तिला लहान करून दाखवली ती त्यापेक्षा मोठी रेघ काढून. त्याप्रमाणे राहुल गांधी यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाची रेषाच आखता येत नाही त्यामुळे मोदी यांची प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट भासते याचे संपूर्ण श्रेय राहुल गांधींचे आहे असे म्हटले तर त्यात काय वावगे!! (Rahul Gandhi)

असो. राहुल यांनी देशासमोर विरोधी पक्षनेता कसा नसावा याचा आदर्श निर्माण करण्याचा चंग बांधला आहे त्याला मोदी काय करणार? सर्वसाधारणपणे Desh Ka Neta Kaisa Ho अशी घोषणा ऐकण्याची आपल्याला सवय आहे. परंतु राहुल यांनी याबाबतीत Desh Ka Neta Kaisa Na Ho याचा मापदंड स्थापित करण्याची नवीन वाट चोखाळली आहे हे त्यांचे कर्तृत्व आपण मानले पाहिजे. काँग्रेस सत्तेवर असताना विरोधी पक्षात अनेक दिग्गज नेते होते. त्यातील एकच अधिकृत विरोधी पक्षनेता असायचा पण बाकीचे नेतेही तोडीसतोड असल्याने काँग्रेसची एकाच वेळी १०० विरोधी पक्ष नेत्यांचा सामना करताना फेफे उडायची. २०१४ मध्ये भाजप सत्तेवर आल्यापासून पहिली १० वर्षें लोकसभेत एकही अधिकृत विरोधी पक्षनेता नव्हता. २०२४ मध्ये काँग्रेसने ९९ जागा मिळवून अधिकृतपणे विरोधी पक्षनेतेपद पटकावले आणि राहुल यांना स्वर्ग दोन बोटे उरला. त्यांना वाटले की झाले आता एकच उडी मारली की ते देशाचे पंतप्रधान झाल्यातच जमा आहेत. त्यामुळे संसदेत व संसदेबाहेर त्यांच्या मर्कटलिलाना उधाण आले आहे. राहुल यांच्या अंतरीच्या नाना कलांचे वर्णन तरी किती करावे? राहुल सध्या T-shirt व Jeansची पॅन्ट अशा वेशात वावरत असतात. लोकसभेतही ते हेच कपडे घालून येतात. Ajuni Yauvanat Mi हे ५६ व्या वर्षी जनतेच्या मनावर बिंबवण्याचा हा एक अट्टाहास असावा. तसेच Ukraineचा अध्यक्ष Volodymyr Zelenskyy हा टी शर्ट व ट्राऊझर परिधान केल्यामुळे देशाचा सर्वोच्च नेता बनला तसे आपणही अशीच वेशभूषा केल्याने भारताचे प्रधानमंत्री होऊ असा गोड गैरसमज त्यांनी करून घेतला असावा. (Rahul Gandhi)

संसदेत विरोधी पक्षनेत्याने भाषण कसे करू नये याचा नवीन आदर्श राहुल यांनी निर्माण केला आहे. ते प्रत्येक विषयावर बोलण्यासाठी नाव देतात पण प्रत्यक्षात विषय सोडून असंबद्ध बोलण्यात त्यांचा हात कुणी धरू शकणार नाही. Budget वर चर्चेत सहभागी होत असताना ते बोलले General Naravane यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रावर. हा भलताच मुद्दा उपस्थित केल्याने भाजपच्या Nishikant Dubey यांना नेहरू गांधी खानदानाच्या अब्रूची लक्तरे संसदेच्या वेशीवर टांगण्याची आयती संधी मिळवून दिली. विषय कुठलाही असो, Adani, Ambani यांना शिव्या घालणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो. राहुल काहीही बोलले तरी त्याचे वर्णन मीडिया मधील त्यांचे चमचे राहुल यांचा घणाघात, हल्लाबोल असे करतात त्यामुळे त्यांना चेव चढतो. घरात आरामखुर्चीवर बसून डुलकी काढावी त्याप्रमाणे ते संसदेत पहिल्या बाकावर बसून डुलक्या घेताना कॅमेऱ्याने अनेकदा टिपले आहे. आता तर त्यांनी संसदेचे कामकाज चालू न देण्याचा विडाच उचलला आहे. रोज नवीन कुठल्या तरी मुद्यावर हंगामा करायचा आणि कामकाज तहकूब करायला लावायचे. यातून आपली Amitabh Bachchan प्रमाणे Angry Young Man ही प्रतिमा निर्माण होईल अशी त्यांना भ्रामक आशा आहे. (Rahul Gandhi)

सध्या त्यांनी अनेक Comedy Kingsना जवळ केले आहे. त्यामुळे त्यांची प्रेसवार्ता हा Stand-up Comedyचा शो वाटतो. एकीकडे म्हणतात की त्यांना भारताचे संविधान वाचवायचे आहे. त्याच पत्रकार परिषदेत ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणतात की विरोधी पक्षनेता म्हणून सरकारला प्रश्न विचारणे हे त्यांचे काम आहे, संविधानाची रक्षा करणे ही त्यांची जबाबदारी नाही. वोट चोरीचा पुरावा नाही पण तसे फीलिंग वाटते अशी कोलांटी उडी सहज मारतात. आता त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त Gyanesh Kumar यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी ते मोर्चा काढतात, बारिकेडवर चढतात आणि एखाद्या Robin Hood प्रमाणे फोटोसाठी निरनिराळ्या पोजेस देतात. गंमत म्हणजे राजीनामा मागतात ज्ञानेश कुमार यांचा पण मोर्चा काढतात Supreme Courtवर. क्या बात है!! (Rahul Gandhi)

=================================

ही देखील वाचा: Narendra Modi : भला उसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी?

=================================

भाजपसकट सर्व पक्ष पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पण राहुलबाबांनी काँग्रेसला SIR च्या दावणीला बांधले आहे. बिहारमध्ये या मुद्यावर तोंडावर आपटून सुद्धा त्यांना शहाणपण सुचलेले नाही. उगाच नाही, राहुल विरोधी पक्षनेता झाल्यापासून BJP / NDA गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्व निवडणुका जिंकत आहेत. म्हणूनच भाजपच्या २०२९ च्या भावी विजयाची पटकथा राहुल आत्तापासूनच लिहू लागले आहेत असे म्हटले तर चूक ते काय? वटपौर्णिमेच्या दिवशी सुवसिनी हाच नवरा साता जन्मी मिळो असा वर मागतात तसाच मोदी आणि Amit Shah असा विरोधी पक्षनेता जन्मजन्मान्तरी मिळो हाच वर परमेश्वराकडे मागत असतील. (Rahul Gandhi)

Comments

Popular posts from this blog

मेघा धाडे जान्हवीवर संतापली

North Korea : नो आईस्क्रीम…नो हॅम्बर्गर !

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?