Posts

Showing posts from August, 2026

Ekadashi: संतानप्राप्तीसाठी विशेष असणारी श्रावणातली पुत्रदा एकादशी कधी आहे?

Image
एका वर्षात २४ एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशी ही वेगळी आणि अनेक कारणासाठी महत्वाची असते. एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित असते. यादिवशी भगवान विष्णूची षोडोपचारे पूजा केली जाते आणि संपूर्ण दिवस उपवास केला जातो. या दिवशी पूजा केल्याने व्यक्तीला शुभ फळ मिळतात, आणि एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. येत्या रविवारी श्रावण महिन्यातील पहिलीच एकादशी तिथी येत आहे. श्रावणात येणाऱ्या एकादशीला अतिशय खास महत्व असते. या एकादशीला पुत्रदा एकादशी नावाने ओळखले जाते. पुत्रदा एकादशी श्रावणात आणि पौष महिन्यात अशी वर्षातून दोनदा येते. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी साजरी केली जाते. या एकादशीला पवित्रोपण आणि पवित्र एकादशी असेही म्हटले जाते. (Putrada Ekadshi) पंचांगानुसार, यंदा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी अर्थात पुत्रदा एकादशी 23 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 2.00 वाजता सुरू होईल आणि 24 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजून 18 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार एकादशीचे व्रत 23 ऑगस्ट रोजी पाळले जाईल. त्यामुळे भक्तांनी 23 ऑगस्ट रोजी श्रावण पुत्रदा एकाद...

Babasaheb Ambedkar: म्हणून बाबासाहेब पंतप्रधान होऊ शकले नाहीत!

Image
  मराठी माणूस आजपर्यंत पंतप्रधान झाला नाही… भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत अनेकदा हे म्हटलं गेलय. तशी मराठी माणसाकडे पंतप्रधान होण्याची संधी अनेकदा आली होती. Yashwantrao Chavan, Madhu Dandavate, Sharad Pawar या नेत्यांकडे ही संधी होती. काही लोकं असंही म्हणतात की जर आज Pramod Mahajan जिवंत असते, तर Narendra Modi पंतप्रधान नसते, तर महाजनच असते. (Babasaheb Ambedkar) पण हा झाला इतिहासाचा भाग… याच इतिहासात असंही एक नाव होतं जे पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलं असतं, ते म्हणजे महामानव Dr. Babasaheb Bhimrao Ambedkar! अफाट बुद्धिमत्ता, कायद्याचं विलक्षण ज्ञान, अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास, प्रचंड संघर्ष करण्याची तयारी पण तरीही स्वतंत्र भारताचे ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत याची खंत आजही अनेकांना वाटते. यामागच कारण त्यांच्याकडे क्षमता नव्हती असं नाही, तर त्या काळाच्या राजकीय लढाईत त्यांच्या विचारांना मोठा विरोध होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारं देशव्यापी राजकीय संख्याबळ त्यांच्या पक्षाकडे नव्हतं. बाबासाहेबांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाकडे पाहिलं, तर...

Health : पावसाळ्यात सतत सर्दी-खोकला होतोय? मग ‘हे’ उपाय करून पाहाच

Image
सर्वत्र पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. पाऊस हा सर्वांनाच आनंद देणारा ऋतू आहे. या पावसावरच आपले मनुष्याचे जीवन पूर्णपणे अवलंबून आहे. असे असले तरी या पावसाचे अनेक दुष्परिणाम सर्व सामान्य लोकांच्या आरोग्यवर मोठ्या प्रमाणात होतात. दमट वातावरण निर्माण होत असल्याने या काळात आजारपण बऱ्यापैकी वाढते. या दिवसांमध्ये विविध साथीच्या रोगांचे प्रमाण देखील मोठ्या स्वरूपात वाढलेले दिसते. सर्दी खोकला तर पावसाळ्यात होणे खूपच सामान्य समजले जाते. पावसाळ्यात प्रत्येक घरात एक तरी रुग्ण सर्दी खोकल्याचा आढळून येतो. आता सर्दी खोकल्यासाठी लगेच डॉक्टरकडे जाणे अनेक लोकं टाळतात आणि घरच्याघरी सोपे आणि सहज करता येणारे उपाय आहे का हे बघता. आज आम्ही तुम्हाला सर्दी खोकल्यासाठी घरच्या घरी करण्याजोगे सोपे उपाय सांगणार आहोत. (Health) वाफ घेणे सर्दी-खोकल्यापासून दूर जायचे असेल तर सर्वात जास्त चांगला उपाय म्हणजे वाफ घेणे. वाफ केल्याने नाक उघडते आणि श्वास घेणे शक्य होते. तुम्ही पाणी गरम करून त्यात टी ट्री ऑईल, लवंग तेल, युकेलिप्टस ऑईल, लेमनग्रास ऑईल, निलगिरी मिक्स करून वाफ घेतली तर सर्दी – खोकला लवकर कमी होण्यास फायदा मिळतो...

History Of Elephants: हत्ती जर वाचले नाहीत तर माणसाची हालत…

Image
जपासून ६ कोटी वर्षांपूर्वी… नाही म्हणजे खरंच ६ कोटी वर्षांपूर्वी तसे पुरावे आहेत, तर ६ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक प्राणी राहायचा, Moeritherium नावाचा! असा दिसायला थोडा पाणगेंड्यासारखा होता. तो सस्तन प्राणी होता. उंचीने माणसापेक्षा कमी… तोंड थोडं सोंडेसारखं पुढे आलेलं…दोन मोठे दात आणि हा फक्त आफ्रिकेत होता. म्हणजे एक सिद्ध होतंय की, आफ्रिकेतच हा जन्माला आला होता. आता इतक्या वर्षांनंतर त्याची उत्क्रांती होत गेली. वातावरण बदललं, कोटी वर्ष सरली, प्राण्यांची जीवनशैली बदलली. या Moeritherium ची हाईट वाढली, पाय आणि अंग तगडे झाले… पुढचे जे ओठ होते तीन हलकीशी सोंडेसारखी झाली, दात छोटे पण सुळे झाले आणि मग हा थोडा या रुपात आला… हा होता Palaeomastodon ! पुढे हा प्राणी आफ्रिकेतून बाहेर पडला. प्रवासाला लागला… तो आफ्रिकेतून आशिया खंडात आला, युरोपात गेला. आता पुन्हा काही कोटी वर्ष सरली…आणि दुसरं वातावरण लाभल्यामुळे त्याच्यामध्ये आणखी बदल झाले…आणि तो थोडा झाला असा… याला म्हटलं गेलं Gomphothere ! चार सुळे आणि एक सोंड असलेला प्राणी… (History Of Elephants) परत काही कोटी वर्ष उलटली आणि हा प्राणी भाई...

School Bus : पिवळ्या रंगाची स्कुल बस असण्यामागे आहे खास वैज्ञानिक कारण

  आजच्या काळात मुलांना शाळेत घालणे मोठे अवघड काम झाले आहे. मुलांना शाळेत घालतांना आई वडिलांनीच परीक्षा असते. त्यांना कोणत्या शाळेत घालायचे, कोणत्या मीडियममध्ये, कोणत्या बोर्डला असे नानाविध अनेक प्रश्न मुलांना शाळेत घालताना पालकांसमोर असतात. योग्य शाळा निवडल्यानंतर जर शाळा लांब असेल तर मुलांना शाळेत कसे सोडायचे हा प्रश्न देखील असतोच असतो. कारण आज आई आणि वडील दोघेही नोकरी करतात. त्यामुळे मुलांना शाळेत कोण सोडेल हा मोठा प्रश्न असतो. पण यावर एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय म्हणजे, स्कुल बस. स्कुल बस ही संकल्पना काही नवीन नाही. बऱ्याच वर्षांपासून स्कुल बस ही मुलांना शाळेत नेण्याचे आणि घरी सोडण्याची सेवा देत आहे.   मुलांसाठी एक सुरक्षित प्रवासाचं साधन म्हणून स्कूल बसकडे पाहिलं जातं. मुलाला शाळेत जाण्यासाठी स्कूल बस लावल्यास पालकांची देखील मोठी चिंता दूर होते, आणि मुलांना शाळेत सोडण्यासाठी किंवा आणण्यासाठी शाळेत जाण्याचं टेन्शन राहतं नाही. सकाळच्या किंवा शाळांच्या वेळेला जर आपण रोडवर पाहिले तर तर विविध शाळांच्या अनेक बस आपल्याला पाहायला मिळतात. दुरवरूनच आपल्याला समोरून येणारी स्कुल बस ल...