Babasaheb Ambedkar: म्हणून बाबासाहेब पंतप्रधान होऊ शकले नाहीत!
मराठी माणूस आजपर्यंत पंतप्रधान झाला नाही… भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत अनेकदा हे म्हटलं गेलय. तशी मराठी माणसाकडे पंतप्रधान होण्याची संधी अनेकदा आली होती. Yashwantrao Chavan, Madhu Dandavate, Sharad Pawar या नेत्यांकडे ही संधी होती. काही लोकं असंही म्हणतात की जर आज Pramod Mahajan जिवंत असते, तर Narendra Modi पंतप्रधान नसते, तर महाजनच असते. (Babasaheb Ambedkar)
पण हा झाला इतिहासाचा भाग… याच इतिहासात असंही एक नाव होतं जे पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलं असतं, ते म्हणजे महामानव Dr. Babasaheb Bhimrao Ambedkar! अफाट बुद्धिमत्ता, कायद्याचं विलक्षण ज्ञान, अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास, प्रचंड संघर्ष करण्याची तयारी पण तरीही स्वतंत्र भारताचे ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत याची खंत आजही अनेकांना वाटते. यामागच कारण त्यांच्याकडे क्षमता नव्हती असं नाही, तर त्या काळाच्या राजकीय लढाईत त्यांच्या विचारांना मोठा विरोध होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारं देशव्यापी राजकीय संख्याबळ त्यांच्या पक्षाकडे नव्हतं. बाबासाहेबांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाकडे पाहिलं, तर या गोष्टीचं उत्तर हळूहळू स्पष्ट होत जातं. (Babasaheb Ambedkar)
Babasaheb Ambedkar यांचा सर्वात मोठा राजकीय संघर्ष तत्कालीन काँग्रेस नेतृत्वाशी होता. Mahatma Gandhi आणि बाबासाहेब यांच्यातही अनेक मूलभूत मुद्द्यांवर मतभेद होते. यातील सर्वात चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे दलितांच्या स्वतंत्र राजकीय प्रतिनिधित्वाचा. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की शतकानुशतके अन्याय सहन केलेल्या समाजाला स्वतःचा प्रतिनिधी स्वतः निवडण्याचा अधिकार मिळायला हवा. 1932 मध्ये ब्रिटिश सरकारने जाहीर केलेल्या कम्युनल अवॉर्डमध्ये Depressed Classes साठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली. पण गांधीजींनी या व्यवस्थेला विरोध केला. त्यांच्या मते यामुळे हिंदू समाजात कायमची फूट पडू शकत होती. याच धर्तीवर गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केलं आणि देशभरातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण झालं. या उपोषणादरम्यान गांधीजींना काही झालं असतं तर ती मोठी चूक ठरली असती कारण देशभरातील दलीतांवर हल्ले झाले असते. पण अखेर 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार झाला. स्वतंत्र मतदारसंघांची कल्पना मागे पडली आणि त्याऐवजी संयुक्त मतदारसंघांमध्ये दलितांसाठी आरक्षित जागांची व्यवस्था स्वीकारण्यात आली. बाबासाहेबांसाठी हा केवळ एका निवडणूक पद्धतीचा प्रश्न नव्हता. त्यांना भीती ही होती की जर बहुसंख्य समाजाच्या मतांवर दलित प्रतिनिधीचं भवितव्य ठरणार असेल, तर तो प्रतिनिधी खरोखर वंचितांचा स्वतंत्र आवाज बनू शकेल का? ज्याने कधीच दलितांचं जगणं जवळून पाहिलं नाही तो माणूस त्यांचं प्रतिनिधित्व कस करेल? आणि इथूनच काँग्रेस आणि बाबासाहेबांच्या राजकीय विचारांमधली दरी अधिक वाढू लागली. (Babasaheb Ambedkar)
पण Babasaheb Ambedkar चं राजकारण केवळ दलित प्रश्नांपर्यंत मर्यादित नव्हतं. त्यांनी कामगार, महिला, गरीब आणि शोषित वर्गाच्या प्रश्नांवरही मोठ्या प्रमाणावर काम केलं. 1936 मध्ये त्यांनी Independent Labour Party स्थापन केली.1937 च्या बॉम्बे प्रांतिक निवडणुकीत या पक्षाला उल्लेखनीय यश मिळालं. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते बाबासाहेब स्वतःचा स्वतंत्र राजकीय पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र एका प्रदेशातील प्रभाव आणि संपूर्ण देशावर सत्ता मिळवण्यासाठी लागणारी ताकद यात मोठा फरक होता. त्या काळात काँग्रेसचं संघटन देशभर पसरलेलं होतं, तर बाबासाहेबांच्या पक्षाचा प्रभाव तुलनेने मर्यादित राहिला. पुढे 1946 मध्ये संविधानसभा तयार होत असतानाही बाबासाहेबांचा राजकीय प्रवास सोपा नव्हता. ते सुरुवातीला बंगालमधून संविधानसभेत निवडून आले. फाळणीनंतर त्यांचा मतदारप्रदेश पाकिस्तानमध्ये गेल्याने त्यांची ती जागा संपुष्टात आली. त्यानंतर त्यांना बॉम्बे प्रांतातून पुन्हा संविधानसभेत प्रवेश मिळाला आणि ते मसुदा समितीचे अध्यक्ष झाले. त्यांच्या कायदेविषयक ज्ञानाची दखल त्यांचे राजकीय विरोधकही दुर्लक्षित करू शकले नाहीत. (Babasaheb Ambedkar)
1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर Pandit Jawaharlal Nehru यांच्या मंत्रिमंडळात बाबासाहेबांना कायदेमंत्री करण्यात आलं. पण सरकारचा भाग असूनही काँग्रेस आणि Babasaheb Ambedkar मधील वैचारिक मतभेद संपले नाहीत. याच उदाहरण म्हणजे हिंदू कोड बिलाच्या वेळी झालेला मोठा वाद! लग्न, घटस्फोट, वारसा आणि महिलांच्या मालमत्तेच्या अधिकारांसारख्या विषयांमध्ये मोठी सुधारणा करण्याची बाबासाहेबांची इच्छा होती. पण या विधेयकाला काँग्रेसमधील आणि बाहेरील अनेक पुराणमतवादी नेत्यांचा विरोध झाला. विधेयक वारंवार पुढे ढकललं गेलं. त्यामुळे नाराज झालेल्या बाबासाहेबांनी 1951 मध्ये कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामागे हिंदू कोड बिलासोबतच सरकारच्या धोरणांबाबतचे इतर मतभेदही होते. (Babasaheb Ambedkar)
बरं ही सगळी झाली काँग्रेस विरुद्ध बाबासाहेब अशी आख्यायिका! पण आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे निवडणुकीचं संख्याबळ! 1952 मध्ये भारताची पहिली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक झाली. बाबासाहेब बॉम्बे मतदारसंघातून मैदानात उतरले. त्यांच्या विरोधात काँग्रेसने बाबसहेबांच्याच scheduled castes fedaration च्या Narayan Kajrolkar यांना उमेदवारी दिली. यावेळी काँग्रेसने पूर्ण ताकदिनिशी बाबासाहेबांना हरवण्याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी झाले कारण निकालात बाबासाहेबांना 1,23,576 मत मिळाली, तर काजरोळकर यांना 1,38,137 मत मिळाली. म्हणजे बाबासाहेबांचा 14,561 मतांनी पराभव झाला. त्यानंतर बाबासाहेब राज्यसभेत गेले. 1954 च्या भंडारा पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेत जाण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही त्यांना हार पत्करावी लागली. (Babasaheb Ambedkar)
आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे लोकसभा निवडणुकीत पराभव झाला म्हणून एखादी व्यक्ती कायदेशीररित्या पंतप्रधान होऊ शकत नाही, असं नाही. भारताचा पंतप्रधान राज्यसभेचा सदस्यही असू शकतो. पण मूळ मुद्दा असतो लोकसभेतील बहुमताच्या पाठिंब्याचा! आणि इथेच बाबासाहेबांच्या राजकारणाची सर्वात मोठी मर्यादा होती, कारण 1952 मध्ये त्यांच्या Scheduled Castes Federation ने देशभर 32 जागा लढवल्या, पण केवळ दोनच जागा जिंकल्या. तर दुसरीकडे काँग्रेसकडे प्रचंड बहुमत होतं. (Babasaheb Ambedkar)
म्हणजे एका बाजूला काँग्रेससारखा देशभर पसरलेला बलाढ्य पक्ष, दुसऱ्या बाजूला त्याच पक्षाशी अनेक विषयांवर थेट संघर्ष करणारे बाबासाहेब आणि त्यांना पंतप्रधानपदासाठी आवश्यक असलेलं संसदीय संख्याबळही नाही. त्यामुळे त्यांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवण्यासाठी एकच घटना किंवा एकच व्यक्ती जबाबदार होती, असं म्हणणं चूकीच ठरेल. म्हणूनच बाबासाहेबांच्या बाबतीत प्रश्न त्यांच्या बुद्धिमत्तेचा किंवा पात्रतेचा नव्हता. प्रश्न होता राजकीय पाठिंब्याचा. त्यांच्याकडे देश बदलण्याची दृष्टी होती, पण देशाची सत्ता मिळवण्यासाठी आवश्यक असलेलं बहुमत त्यांच्यकडे नव्हतं नाहीतर भारताच्या इतिहासावर अमिट छाप सोडणारा हा महान नेता केव्हाच भारताचा पंतप्रधान झाला असता! (Babasaheb Ambedkar)
This blog is originally posted on Gajawaja - https://gajawaja.in/babasaheb-ambedkar-that-is-why-babasaheb-could-not-become-prime-minister/

Comments
Post a Comment