Posts

Showing posts from May, 2026

Adhik Maas : अधिक महिन्यात का आहे तुळशी पूजनाला महत्त्व?

  सध्या अतिशय पवित्र असा अधिक महिना सुरु आहे. १७ मे पासून सुरु झालेला हा अधिक मास १५ जूनपर्यंत असणार आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास देखील म्हटले जाते. या महिन्यात भगवान विष्णूची पूजा करण्याला आणि विष्णू उपासना करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. अनेक लोकं या काळात विष्णुसहस्रनाम पठण आणि तुळशीची देखील पूजा करतात. अधिक महिन्यामध्ये तुळशी पूजन देखील लाभदायक मानले गेले आहे. अधिक महिन्यामध्ये अनेक महिला तुळशीशी संबंधित काही उपाय, पूजा देखील करतात. या महिन्यात धार्मिक मान्यतेनुसार तुळशीला पाणी वाहणे, तुळशीसमोर दिवा लावणे आदी उपाय करता. यामुळे घरात सुख-समृद्धी येते. तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानले जाते. अशावेळी अधिक मासच्या पाचव्या दिवशी तुळशीला उसाचा रस अर्पण करावा. यामुळे संपत्ती आणि समृद्धी येते. त्याच वेळी शत्रूंचा नाश होतो. तुळशीची पूजा करताना ‘महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी, आदि व्याधी हरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते’ या मंत्राचा जप करावा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि साधकाला सुख-समृद्धी मिळते. तुळशीची पाने लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कोणत्य...

Health : उभं राहून पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने आहे धोकादायक

  पाणी पिणे आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. अन्न मिळाले नाही तरी माणूस काही दिवस जगू शकतो, मात्र पाण्याशिवाय माणसं काही तास देखील राहू शकत नाही. कदाचित म्हणूनच पाण्याला जीवन असे म्हटले जाते. भरपूर पाणी पिणे हे उत्तम आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, चयापचय सुधारते, आणि डिहायड्रेशन होत नाही. निरोगी राहण्यासाठी दररोज किमान २ ते ३ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते. आपल्या शरीरात 70-75% पाणी आहे आणि ते आपल्या जीवनासाठी अतिशय आवश्यक आहे.   मात्र केवळ पाणी पिणे म्हणजेच उत्तम आरोग्य प्राप्त करणे असे नाही. तर पाणी योग्य पद्धतीने पिण्याला देखील महत्त्व आहे. कारण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पाणी पीत असाल तर नक्कीच त्या पाणी पिण्याचा तुमच्या शरीरावर कोणताच सकारात्मक फायदा होणार नाही, याउलट तुम्हाला त्याचा त्रासच सहन करावा लागेल. आता तुम्ही म्हणाल पाणी पिण्याची कोणती पद्धत आहे. पाण्याचा ग्लास तोंडाला लावूनच तर पाणी प्यायले जाते. मात्र अनेकांना पाणी उभ्याने पिण्याची सवय असते. उ...

Chanakya : घरात पैसा येतो पण टिकत नाही? मग चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी कायम पाला

आजच्या काळात सर्वच लोकं पैसा कमवण्यासाठी अजोड मेहनत घेताना दिसतात. स्त्री पुरुष कोणीही सगळ्यांनाच जगण्यासाठी पैशाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळेच आपले काम अधिक चांगले आणि चोख करून यश मिळवून अधिक पैसा कसा कमवता येईल याचाच सर्व विचार करत असतात. मात्र अनेकदा खूप मेहनत घेऊनही आपल्याकडे आलेला पैसा टिकत नाही. अशावेळेस आपल्याला समजतच नाही की, आपले नक्की चुकते कुठे. घरात पैसा तर येतो मात्र तो टिकत का नाही असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. याच प्रश्नाचे उत्तर आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्यनीती या ग्रंथामध्ये लिहून ठेवले आहे. आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्यात त्यांचा हातखंडा होता.   आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, व्यक्तीच्या आयुष्यात जी काही गरीब श्रीमंत परिस्थिती आहे ती त्या व्यक्तीच्या कर्मामुळे आहे. ज्या लोकांना मेहनत करण्यास कंटाळा येतो ते लोकं कधीच प्रगती करू शकणार नाहीत आणि असे लोकं कायम पैशाअभावी आपले जीवन व्यतीत करतात. असे लोकं त्यांच्या आयुष्यात कधीच प्रगती करू शकत नाहीत. यास्तहीच आपण आपल्या आयुष्यात का...

Recipe : अधिक मासात जावयाची बनवा खुसखुशीत अनारसे, जाणून घ्या सोपी रेसिपी

  सध्या अधिक महिना सुरु असून, प्रत्येक घरामध्ये जावयाचा मानपान करण्याची तयारी सुरु असेल. अधिक महिन्यामध्ये जावयाचे त्याच्या सासुरवाडीला कोडकौतुक केले जाते. कारण मुलीच्या आईवडिलांसाठी जावई हा विष्णूचे स्वरूप असतो. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये जावयाला वाण देण्याची परंपरा आहे. या महिन्यात केलेले दान, जप, व्रत, उपवास आणि सेवा यांना अनेक पटींनी पुण्य मिळते असे धर्मशास्त्र सांगते. विशेषतः या महिन्यात जावयाला 33 अनारसे दान देण्याची परंपरा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रचलित आहे. जावयाला अधिक महिन्याचे वाण हे अनारशाचे दिले जाते. अनारसे तांदूळ, गूळ, तूप यांपासून बनवले जातात. हे तीन पदार्थ सात्त्विक, पवित्र आणि शुभ मानले जातात. म्हणूनच अधिक महिन्यात वाण देण्यासाठी अनारसे उत्तम मानले जातात. शिवाय महाराष्ट्रातील काही ठिकाणी पुरणाचे धोंडे देखील वाण म्हणून देण्याची प्रथा आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अनारसे आणि पुरणाचे धोंडे करण्याची रेसिपी सांगणार आहोत.   साहित्य तांदूळ – १ वाटी, किसलेला गूळ – १ वाटी, तूप – १ चमचा, खसखस, तेल कृती तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवावे. प्रत्येक दिवशी पाणी बदलले तरी च...

Adhik Mahina : अधिकमास केव्हा सुरु होणार? काय आहे या महिन्याचे महत्त्व?

  आज वैशाख अमावस्या असून, उद्यापासून अधिक महिना सुरु होत आहे. हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला अत्यंत महत्त्व आहे. याच महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना देखील म्हणतात. या महिन्याला अतिशय शुभ मानले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार दर अडीच ते तीन वर्षांनी चंद्र आणि सौर वर्षातील काळाचा ताळमेळ बसवण्यासाठी येणाऱ्या अतिरिक्त अशा तेराव्या महिन्याला अधिक मास असे म्हणतात. साधारणपणे दर तीन वर्षांनी अधिक महिना येतो. वर्षात १२ महिने असतात मात्र खगोलीय कारणांमुळे सौर वर्ष जे ३६५ दिवसांचे असते आणि चंद्र वर्ष जे ३५४ दिवसांचे असते यातील ११ दिवसांचा फरक दरवर्षी येतो. सलग तीन वर्षे हा फरक ३३ दिवसांचा म्हणजेच संपूर्ण एक महिन्याचा असतो. त्यामुळे दर तीन वर्षांनी अधिकमास येतो. अधिकमास आल्यामुळे पंचांगावर परिणाम होऊन वर्षातील सर्व सण काही दिवसांसाठी पुढे जातात. हा महिना जवळपास ३० ते ३३ दिवसांचा असल्याने वर्षातील महिने १३ होतात. यामुळे ज्येष्ठ महिना दोनदा गणला जातो.   यंदा अधिक महिन्याची सुरुवात यंदा 17 मे 2026 रोजी होईल आणि 15 जून 2026 रोजी त्याचा समारोप होईल. याचा अर्थ असा आहे की, 2026 मध्ये दोन ज...

Shani Dev : जाणून घ्या शनिदेवाला तेल अर्पण करण्यामागचे कारण

  शनिवार हा शनिदेवाचा दिवस मानला जातो. मात्र उद्याचा शनिवार हा अधिकच खास आणि महत्त्वाचा असणार आहे. याचे कारणही खूपच विशेष आहे. कारण उद्या शनिवार 16 मे रोजी वैशाख अमावस्येच्या दिवशी शनी जयंती साजरी केली जाणार आहे. उद्याच्या दिवशी वैशाख अमावस्या आणि भगवान शनिदेवांची शनि जयंती एकाच दिवशी येत असल्याने एक दुर्मिळ ‘महायोग’ जुळून आला आहे. विशेष म्हणजे ही अमावस्या शनिवारी आल्याने तिला ‘शनि अमावस्या’ किंवा ‘शनैश्चरी अमावस्या’ असेही म्हटले जाते. आता अनेक लोकं दर शनिवारी शनीच्या मंदिरात जातात आणि शनी महाराजांना तेल अर्पण करतात. शनिवारी शनी किंवा मारुतीरायांना तेल वाहण्याची खूपच जुनी आणि प्रसिद्ध परंपरा आहे. पण असे करण्याचे मागचे कारण तुम्हाला माहिती आहे का?, शनी देवाला तेल वाहण्यामागचे कारण आज आपण जाणून घेऊया.   एका आख्यायिकेनुसार, शनिदेव आपल्या शक्ती आणि सामर्थ्यामुळे खूप अहंकार झाला होता. त्या काळात रामभक्त बजरंगबलीच्या पराक्रमाची आणि शक्तीची सर्वत्र चर्चा होती. शनिदेव यांना जेव्हा हे कळले तेव्हा ते हनुमानाशी लढायला निघाले. तेथे त्यांनी पाहिले की हनुमानजी एकांतात श्रीरामाच्या भक्तीमध्य...