Recipe : अधिक मासात जावयाची बनवा खुसखुशीत अनारसे, जाणून घ्या सोपी रेसिपी

 सध्या अधिक महिना सुरु असून, प्रत्येक घरामध्ये जावयाचा मानपान करण्याची तयारी सुरु असेल. अधिक महिन्यामध्ये जावयाचे त्याच्या सासुरवाडीला कोडकौतुक केले जाते. कारण मुलीच्या आईवडिलांसाठी जावई हा विष्णूचे स्वरूप असतो. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये जावयाला वाण देण्याची परंपरा आहे. या महिन्यात केलेले दान, जप, व्रत, उपवास आणि सेवा यांना अनेक पटींनी पुण्य मिळते असे धर्मशास्त्र सांगते. विशेषतः या महिन्यात जावयाला 33 अनारसे दान देण्याची परंपरा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रचलित आहे. जावयाला अधिक महिन्याचे वाण हे अनारशाचे दिले जाते. अनारसे तांदूळ, गूळ, तूप यांपासून बनवले जातात. हे तीन पदार्थ सात्त्विक, पवित्र आणि शुभ मानले जातात. म्हणूनच अधिक महिन्यात वाण देण्यासाठी अनारसे उत्तम मानले जातात. शिवाय महाराष्ट्रातील काही ठिकाणी पुरणाचे धोंडे देखील वाण म्हणून देण्याची प्रथा आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अनारसे आणि पुरणाचे धोंडे करण्याची रेसिपी सांगणार आहोत. 

साहित्य
तांदूळ – १ वाटी, किसलेला गूळ – १ वाटी, तूप – १ चमचा, खसखस, तेल

कृती
तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवावे. प्रत्येक दिवशी पाणी बदलले तरी चालेल. त्यानंतर चाळणीत ठेवून नितळून घ्यावे. तांदूळ आता कोरडे करून घ्यावेत. मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यावे. किसलेला गूळ आणि तूप बारीक केलेल्या तांदळात टाकावा. सर्व मिश्रण एकत्र मळून घ्यावे. मिश्रण घट्ट मळावे. घट्ट मळलेला गोळा चार ते पाच दिवस डब्यात ठेवावा. (प्लास्टिकचा डबा वापरावा किंवा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून ती पिशवी डब्यात ठेवावी.) तळण्यासाठी आता पीठ बाहेर काढून घ्यावे. एका कढईत तेल गरम करावे. मळलेल्या गोळ्याचे आता छोटे छोटे गोळे करावे. पुरीसारखे लाटून घ्यावे. लाटताना त्यावर खसखस वापरावी. तळताना पुरीची बाजू बदलू नये, नाहीतर खसखस करपेल. लाटलेली पुरी तेलात तळताना जास्त हलवू नये. मध्यम आचेवर ठेवून पुरी छान लालसर तळून घ्यावी. तेल चांगले अनारस्यातून नितळून घ्यावे.

पुरणाचे धोंडे
साहित्य

१ कप हरभरा डाळ, १ कप गूळ, १ चमचा वेलची पूड, चिमूटभर जायफळ पूड, २ कप गव्हाचे पीठ, चिमूटभर मीठ, १ चमचा तूप, आवश्यकतेनुसार पाणी, तूप, केळीची पाने किंवा स्वच्छ कापड

साहित्य
सर्वप्रथम हरभरा डाळ स्वच्छ धुऊन २ ते ३ तास भिजत ठेवा. त्यानंतर कुकरमध्ये डाळ मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. शिजलेली डाळ गाळून त्यातील अतिरिक्त पाणी वेगळे करा.आता एका कढईत डाळ आणि गूळ एकत्र करून मंद आचेवर परता. मिश्रण घट्ट होत आले की त्यात वेलची आणि जायफळ पूड घाला. हे पुरण पूर्ण थंड होऊ द्या. एका परातीत गव्हाचे पीठ, मीठ आणि थोडे तूप घालून मऊसर कणीक भिजवा. ही कणीक १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा. कणकेचे छोटे गोळे करून त्याची पुरी लाटा. त्यात पुरण भरून मोदकासारखा किंवा अंडाकृती आकार द्या. हेच “धोंडे” होय.पारंपरिक पद्धतीत हे धोंडे केळीच्या पानावर ठेवून वाफवले जातात. त्यामुळे त्यांना एक वेगळाच सुगंध येतो. मोठ्या पातेल्यात पाणी गरम करून त्यावर चाळणी किंवा इडली पात्र ठेवा. त्यात केळीचे पान ठेवून धोंडे मांडावेत. साधारण १५ ते २० मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घ्या.धोंडे शिजल्यावर त्यावर साजूक तूप घालून गरमागरम सर्व्ह करा किंवा तुम्हा तळू शकता.

this blog was originally published on https://gajawaja.in/adhik-mahina-2026-how-to-make-anarsa/


Comments

Popular posts from this blog

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?

वयाच्या 20 व्या वर्षात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे का महत्वाचे?

Health : कॅन्सर होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी