Health : उभं राहून पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने आहे धोकादायक

 पाणी पिणे आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. अन्न मिळाले नाही तरी माणूस काही दिवस जगू शकतो, मात्र पाण्याशिवाय माणसं काही तास देखील राहू शकत नाही. कदाचित म्हणूनच पाण्याला जीवन असे म्हटले जाते. भरपूर पाणी पिणे हे उत्तम आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, चयापचय सुधारते, आणि डिहायड्रेशन होत नाही. निरोगी राहण्यासाठी दररोज किमान २ ते ३ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते. आपल्या शरीरात 70-75% पाणी आहे आणि ते आपल्या जीवनासाठी अतिशय आवश्यक आहे. 

मात्र केवळ पाणी पिणे म्हणजेच उत्तम आरोग्य प्राप्त करणे असे नाही. तर पाणी योग्य पद्धतीने पिण्याला देखील महत्त्व आहे. कारण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पाणी पीत असाल तर नक्कीच त्या पाणी पिण्याचा तुमच्या शरीरावर कोणताच सकारात्मक फायदा होणार नाही, याउलट तुम्हाला त्याचा त्रासच सहन करावा लागेल. आता तुम्ही म्हणाल पाणी पिण्याची कोणती पद्धत आहे. पाण्याचा ग्लास तोंडाला लावूनच तर पाणी प्यायले जाते. मात्र अनेकांना पाणी उभ्याने पिण्याची सवय असते. उभ्या उभ्या पाण्याचा ग्लास तोंडाला लावला जातो आणि पाणी प्यायले जाते. मात्र उभे राहून पाणी पिण्याचे आपल्या शरीराला अनेक तोटे होऊ शकतात. उभे राहून पाणी पिण्याचे नक्की कोणते तोटे आहे चला जाणून घेऊया.

जेव्हा तुम्ही उभं राहता तेव्हा तुमच्या शरीरावर आणि पेशीवर तणाव येतो. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही पाणी पिता, तेव्हा तुमच्या शरीरात पाणी वेगानं वाहू लागतं. त्यामुळे द्रवपदार्थांचं संतुलन बिघडते. उभे राहून पाणी प्यायल्याने ते पाणी दाबाने पोटात जाते, त्यानंतर सर्व अशुद्धी मूत्राशयात जमा होतात, ज्यामुळे शरीराच्या किडनीला गंभीर नुकसान होते. त्यामुळे शक्यतो पाणी बसूनच प्यावे. उभं राहून पाणी पिण्याने फुफ्फुसांनाही नुकसान होऊ शकते. कारण, यामुळे पाणी ते झपाट्याने आत जाते, अशा स्थितीत आपल्या शरीरातील फूड पाईप आणि विंड पाईपमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा थांबतो. जर, एखाद्या व्यक्तीने ही सवय सुधारली नाही, तर नंतर त्याला फुफ्फुसाचा आजार होऊ शकतो. 

उभे राहून पाणी पिल्याने अन्ननलिकेतून पाणी वेगाने पोटात जाते, ज्यामुळे पचन प्रक्रियेत अडथळा येतो, ज्यामुळे अपचन किंवा गॅसची समस्या उद्भवू शकते. जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा ते नसांवर ताण आणते, ज्यामुळे द्रव संतुलन बिघडते. यामुळे कालांतराने सांध्यामध्ये द्रव जमा होऊ शकतो, ज्यामुळे भविष्यात सांधेदुखी होऊ शकते. उभे राहून पाणी पितो तेव्हा आवश्यक पोषक तत्वे आणि जीवनसत्त्वे यकृत आणि पचनसंस्थेपर्यंत पोहोचू शकत नाहीत. उभे राहून पाणी पिणे टाळावे कारण त्यामुळे तहान भागत नाही आणि पुन्हा पुन्हा पाणी प्यावेसे वाटते. जर तुम्हाला वारंवार तहान लागण्याची समस्या येत असेल तर तुम्ही उभे राहून पाणी पिणे टाळावे. 

याशिवाय उभे राहून पाणी प्यायल्याने ताणाव वाढू शकतो. कारण उभे राहून पाणी प्यायल्याने त्याचा थेट परिणाम मज्जासंस्थेवर होतो. त्यामुळे पोषक तत्व पूर्णपणे निरुपयोगी होतात आणि शरीरावर ताण येतो. डॉक्टर सांगतात की, जेव्हा आपण बसतो तेव्हा आपली किडनी चांगली काम करते. अशा स्थितीत जेव्हा आपण उभं राहून पाणी पितो तेव्हा जास्त दाबानं द्रव न गाळता थेट पोटाच्या खालच्या भागात जातो. त्यामुळं पाण्यात असलेली अशुद्धता मूत्राशयात जमा होते. त्याचा किडनीच्या कार्यावर परिणाम होतो. अशा स्थितीत किडनीशी संबंधित अनेक आजार होण्याची भीती असते.

धावपळीच्या युगात अनेकांना बसून पाणी पिण्यालादेखील वेळ नाही कुठे बाहेर असल्यास आपण उभं राहूनच सरळ ढसाढसा पाणी पित असतो. परंतु हीच सवय आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात अपायकारक ठरु शकते. उभ राहून पाणी पिल्यास पाणी सरळ आपल्या पोटातील अवयवांवर आदळते. यासह उभे राहून पाणी पिल्यास गुडघेदुखीचा त्रास जाणवत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे नेहमी बसून पाणी पिेणे फायद्याचे ठरते. 

तज्ज्ञांच्या मते पाणी पिण्याची योग्य पद्धत म्हणजे बसून पाणी पिणे. यासाठी खुर्चीवर बसा, पाठ सरळ ठेवा आणि नंतर पाणी प्या. यामुळे मेंदूपर्यंत पोषक घटक पोहोचतात आणि मेंदूची क्रिया सुधारते. एवढेच नाही तर पचनक्रिया सुधारते आणि पोट फुगणे अशी समस्या देखील होत नाही.


this blog was originally published on https://gajawaja.in/drinking-water-while-standing-disadvantages/

Comments

Popular posts from this blog

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?

वयाच्या 20 व्या वर्षात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे का महत्वाचे?

Health : कॅन्सर होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी