Chanakya : घरात पैसा येतो पण टिकत नाही? मग चाणक्य यांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी कायम पाला

आजच्या काळात सर्वच लोकं पैसा कमवण्यासाठी अजोड मेहनत घेताना दिसतात. स्त्री पुरुष कोणीही सगळ्यांनाच जगण्यासाठी पैशाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळेच आपले काम अधिक चांगले आणि चोख करून यश मिळवून अधिक पैसा कसा कमवता येईल याचाच सर्व विचार करत असतात. मात्र अनेकदा खूप मेहनत घेऊनही आपल्याकडे आलेला पैसा टिकत नाही. अशावेळेस आपल्याला समजतच नाही की, आपले नक्की चुकते कुठे. घरात पैसा तर येतो मात्र तो टिकत का नाही असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. याच प्रश्नाचे उत्तर आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्यनीती या ग्रंथामध्ये लिहून ठेवले आहे. आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्यात त्यांचा हातखंडा होता. 

    आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, व्यक्तीच्या आयुष्यात जी काही गरीब श्रीमंत परिस्थिती आहे ती त्या व्यक्तीच्या कर्मामुळे आहे. ज्या लोकांना मेहनत करण्यास कंटाळा येतो ते लोकं कधीच प्रगती करू शकणार नाहीत आणि असे लोकं कायम पैशाअभावी आपले जीवन व्यतीत करतात. असे लोकं त्यांच्या आयुष्यात कधीच प्रगती करू शकत नाहीत. यास्तहीच आपण आपल्या आयुष्यात कायम असे कर्म केले पाहिजे जे आपल्याला नेहमीच प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाईल आणि यश मिळवून देईल. आचार्य चाणक्य यांच्या मते, माणूस त्याच्या कर्मामुळे विचारांनीही श्रीमंत होत असतो.

    • आचार्य चाणक्य यांच्या मते, जर घरात आलेला पैसा टिकवायचा असेल, तर घरातील तांदळाचा डबा कधीही रिकामा होऊ देऊ नका. यामुळे घरात आर्थिक चणचण भासू शकते. तसेच, घरात येणारी लक्ष्मीही नाराज होते. यासाठी घरात कोणत्याच वस्तूची कमी पडू देऊ नका.
    • आचार्य चाणक्यांनी दुसरा मार्ग सांगितला आहे. तो म्हणजे घरातील पिठाच्या डब्यामध्ये एक चांदीचे नाणे ठेवा. त्या नाण्यावर लक्ष्मीचा किंवा गणपतीचा फोटो असावा. यामुळे घरात लक्ष्मीचा वावर टिकून राहील. घरातील वातावरण सकारात्मक राहील. तसेच, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. चांदी देखील घरातील सुख-शांतीसाठी, तसेच धन-धान्य संपत्तीसाठी फार महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे तुम्ही हा मार्ग देखील अवलंबू शकता. 
    • आचार्य चाणक्यांच्या मते, ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये दान किंवा परोपकाराची भावना असते, त्यांच्यावर नेहमी लक्ष्मीची कृपा असते. जर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करत असाल, तर तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळतात. त्यांच्या आशीर्वादाने माणूस खूप प्रगती करतो. त्यामुळे, चाणक्य नीती सांगते की प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार दानधर्म नक्की करावे. (Top Marathi News)
    • जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. मग ती घराची स्वच्छता असो किंवा स्वतःची. असे म्हटले जाते की, जर तुम्ही स्वतःला स्वच्छ ठेवले आणि घरात स्वच्छता राखली, तर लक्ष्मी नेहमी तुमच्या घरावर कृपा करते. आचार्य चाणक्यांच्या मते, अशा घरात कधीही पैशाची कमतरता नसते आणि त्यांना कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही.
    • आचार्य चाणक्यांच्या मते, ज्या घरात अन्नाचा अपमान होतो. तिथे लक्ष्मी कधीच वास करत नाही, कारण अन्न हे देवासारखे मानले जाते. अशा स्थितीत, जर कोणी आपल्या घरात अन्नाची नासाडी करत असेल, तर त्याला पापाचा भागीदार व्हावे लागते आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.
    • जे लोक नेहमी शिस्तबद्ध आणि संयमित जीवन जगतात, त्यांच्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह असतो आणि समृद्धी देखील या घरात टिकून राहते. त्यामुळे, तुम्ही स्वतःला जितके अधिक शिस्तबद्ध ठेवाल, तितकाच जास्त फायदा तुम्हाला मिळेल आणि लक्ष्मीचा आशीर्वादही तुमच्यावर राहील.
    • चाणक्य नीतीनुसार कायम आपण आपल्या संस्कृतीमध्ये सांगितल्या प्रमाणे पाहुण्यांचे आदरतिथ्य केले पाहिजे. नेहमी आदराने त्यांचे स्वागत केले पाहिजे. ‘अतिथी देवो भव:’ ही आपली भारतीय संस्कृती कायम जपली पाहिजे. जिथे पाहुण्यांचा आदर केला जातो त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
    this blog was originally published on https://gajawaja.in/according-to-chanakya-niti-follow-these-tips-for-financial-growth/

    Comments

    Popular posts from this blog

    Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?

    वयाच्या 20 व्या वर्षात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे का महत्वाचे?

    Health : कॅन्सर होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी