Beauty Tips : दिवाळीत चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी पार्लरमध्ये जाण्याची गरजच नाही, वापरा ‘हे’ सोपे घरगुती फेसपॅक

 

Beauty Tips

दिवाळी आता केवळ एका आठवड्यावर आली आहे. या एका आठवड्यामध्ये घराची स्वच्छता करण्यासोबतच दिवाळीचा फराळ आणि ऑफिसचे काम देखील महिलांना अड्जस्ट करायचे आहे. कमी वेळात भरपूर कामं असल्याने प्रत्येक स्त्रीला तारेवरची कसरत करावी लागणार हे तर नक्की. मात्र हे करताना स्वतःकडे दुर्लक्ष करून देखील चालणार नाहीये. कारण वर्षातला एवढा मोठा सण म्हटल्यावर आपणही सुंदर दिसणे आवश्यक असते. पण या कामाच्या गडबडीत बऱ्यचाह स्त्रियांना पार्लरमध्ये जाणे शक्य होणार नाहीये. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला काही घरगुती असे काही पॅक सांगणार आहोत जे करून तुम्ही घरच्याघरी पार्लरसारखा ग्लो मिळवू शकता. (Beauty Tips)

जर तुम्हाला देखील तुमची त्वचा सेलिब्रिटींसारखी चमकदार आणि फ्रेश हवी असेल तर सर्वात आधी दररोज शरीराला आवश्यक तेवढे पाणी पिणे गरजेचे आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये गोड, तळलेले पदार्थ खाल्ले जातात, सोबतच उशिरा आणि कमी झोप होते यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे दिवसभर पुरेसं पाणी प्या. त्यासोबत हर्बल टी, नारळ पाणी किंवा फळांचे रस घ्या. त्वचेला बाहेरून ओलावा देण्यासाठी दिवसातून दोनदा हलके मॉइश्चरायझर किंवा हायलुरोनिक ॲसिड असलेली क्रीम लावा. चेहऱ्यावर जमा झालेल्या मृत त्वचेच्या पेशींमुळे चेहरा निस्तेज दिसतो. आठवड्यातून दोनदा हलक्या हाताने एक्सफोलिएट करा. यासाठी घरगुती ओट आणि मधाचा स्क्रब उत्तम पर्याय आहे. लक्षात ठेवा, जास्त स्क्रबिंग केल्याने त्वचेला इजा होऊ शकते, म्हणून हळुवारपणे करा. हे सर्व करण्यासोबतच योग्य आणि संतुलित आहार घेणे, फळे आणि भाज्यांचे सेवन केल्याने देखील तुमची त्वचा आतून उजळेल. यामध्ये गाजर, संत्री आणि हिरव्या भाज्यांचा समावेश कर. (Marathi)

तांदळाचे पीठ
एक चमचा तांदळाच्या पिठात एक चमचा मध मिसळा. तसेच त्यात गुलाब पाण्याचे काही थेंब टाका आणि ते चांगले मिसळा. जर तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर तांदूळ भिजवून बारीक करून घ्या आणि या पेस्टमध्ये सर्व गोष्टी मिसळून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या. थोडासा कोरडा व्हायला लागल्यावर हा पॅक चेहऱ्यावर मसाज करून काढून टाका. याने त्वचेची मृत त्वचा निघून जाईल तसेच त्वचा मुलायम होऊन तेजस्वी दिसू लागेल. (Diwali)

पांढरे तीळ
पांढरे तीळ रात्रभर भिजत ठेवा. सकाळी बारीक करून घ्या. या पेस्टमध्ये हळद मिसळा आणि चेहऱ्याला लावा. तिळाची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील कोरडेपणा दूर होतो. हिवाळ्यात हा फेसपॅक लावल्याने कोरड्या त्वचेपासून आराम मिळतो. (Face Pack)

दूध आणि हळदीचा फेस पॅक
दूध आणि हळदीचा फेस पॅक तुमची त्वचा स्वच्छ तर करतोच पण ती उजळण्यासही मदत करतो. हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करतात. एका भांड्यात 2 चमचे दूध आणि चिमूटभर हळद मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटांनी धुवा.

लिंबू आणि मध स्क्रब
लिंबूमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात आणि मध त्वचेला मॉइश्चरायझ करते. हे स्क्रब तुमचा चेहरा स्वच्छ तर करेलच पण सोबतच चमकेल. एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळा. चेहऱ्यावर हलके चोळा आणि 10-15 मिनिटे राहू द्या. नंतर धुवा. (Todays Marathi Headline)

Beauty Tips

चंदनाचा फेस पॅक
त्वचेचा रंग सुधारण्यासाठी चंदन पावडर खूप फायदेशीर आहे. यामुळे त्वचा थंड होते आणि डागही कमी होतात. गुलाब पाण्यामध्ये चंदन पावडर मिसळून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर धुवा. (Social Updates)

केळी
जर उन्हाच्या तडाख्यामुळे चेहऱ्यावर टॅनिंगचा परिणाम होते. त्यानंतर केळीचा फेस पॅक लावा. हे करण्यासाठी, पिकलेले केळे मॅश करा. एक चमचा मैदा किंवा बेसन एकत्र मिसळा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटे तसाच राहू द्या. सुकायला लागल्यावर घासून घ्या. या फेस पॅकमुळे चेहऱ्याचे टॅनिंग कमी होऊन त्वचा चमकदार होईल. (Top Trending News)

आवळा आणि कोरफड जेल
आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे त्वचेच्या पेशी पुन्हा निर्माण होतात. कोरफड त्वचेला हायड्रेट ठेवते. एक चमचा आवळा पावडर आणि एक चमचा एलोवेरा जेल मिक्स करा. चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी धुवा. (Top Marathi News)

दही आणि ओट्स स्क्रब
दह्यामध्ये लैक्टिक ऍसिड असते, ज्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकते. ओट्स त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. एक चमचा दही आणि एक चमचा ओट्स मिक्स करा. चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने स्क्रब करा. (Latest Marathi Headline)

​मसूर डाळ फेस पॅक
हा फेसपॅक करण्यासाठी मसूर डाळीत कच्च्या दुधात भिजवून रात्रभर सोडा. दुसऱ्या दिवशी सकाळी बारीक करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून कोरडी होऊ द्या. जेव्हा ते कोरडे होऊ लागते तेव्हा त्यातून सुटका करण्यासाठी मालिश करा. मसूर चेहऱ्यावर झटपट चमक आणते. (Top Stories)

टोमॅटोचा रस
टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते, जे त्वचेला अतिनील किरणांपासून वाचवते आणि उजळ करते. टोमॅटो अर्धा कापून त्याचा रस चेहऱ्यावर लावा. 10-15 मिनिटांनी धुवा. तुमच्या त्वचेच्या ग्लोचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे हायड्रेशन. तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितकी तुमची त्वचा अधिक हायड्रेटेड आणि चमकदार होईल. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

THIS BLOG IS ORIGINALY PUBLISHED AT GAJAWAJA - https://gajawaja.in/diwali-2026-these-face-pack-can-glow-your-skin-at-home/

Comments

Popular posts from this blog

मेघा धाडे जान्हवीवर संतापली

North Korea : नो आईस्क्रीम…नो हॅम्बर्गर !

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?