Health : आरोग्यासाठी वरदान ठरणाऱ्या निळ्या हळदीचे फायदे
आजही अनेक घरांमध्ये लहान सहान आजारांसाठी लगेच डॉक्टरकडे कधीच नेले जात नाही. घरच्या घरीच आजीच्या बटव्यातील उपाय केले जातात आणि इलाज केला जातो. मुख्य म्हणजे याचा खूपच चांगला फायदा देखील होतो. आपल्या घरातील स्वयंपाक घर हे विविध उपचारांच्या वस्तूने भरलेले आहे. यातलीच एक दररोजच्या वापरातील गोष्ट म्हणजे ‘हळद’. कोणतेही जेवण हे हळदीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. जेवणाला रंग आणि चव आणण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळद ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ती जंतुनाशक असून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची अतिशय उत्तम आहे. हळद ही बहुगुणी आहे. सुंदरतेपासून ते आरोग्याच्या लहान मोठ्या समस्या बऱ्या करेपर्यंत हळद खूपच उपयुक्त आहे. हळद म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर लगेच पिवळी धमक पावडर किंवा ओल्या हळदीचा कंद येतो. (Blue turmeric)
मात्र अनेकांना माहितीच नसेल की पिवळ्यासोबतच निळ्या रंगाची देखील हळद उपलब्ध आहे. आता बऱ्याच लोकांना निळी हळद एकूण आश्चर्य वाटले असेल, पण हे सत्य आहे. ही निळ्या रंगाची हळद पिवळ्या हळदीपेक्षा अधिक गुणकारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासोबत त्याची शेतीही अधिक फायदेशीर असल्याचेही स्पष्ट झाले आहे. आयुर्वेदात या हळदीला विशेष महत्त्व आहे. तिचा रंग आतून निळसर-काळा असतो आणि ती दुर्मिळ असल्यामुळे औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. निळ्या हळदीचे अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. निळी हळद केवळ केरळमधील वायनाडच्या मातीत वाढते आणि तिचे अनेक आरोग्य फायदे असल्याचे मानले जाते. निळी हळद हा भारतातील दुर्मिळ पदार्थ आहे. याला वैज्ञानिकदृष्ट्या Curcuma Caesia या नावाने ओळखले जाते. याशिवाय बोलीभाषेत काळी हळद असे सुद्धा म्हंटले जाते. हळदीचा आतील रंग पिवळा नसून गडद निळ्या रंगाचा असतो. (Health)
भारतात आणि आग्नेय आशियातील काही निवडक भागांमध्ये निळी हळद सापडते. पिवळ्या रंगाच्या हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचा गुणकारी घटक आढळून येतो. निळ्या रंगाच्या हळदीमध्ये कर्क्यूमिनचे प्रमाण अतिशय कमी असते. यामध्ये कापूर आणि विविध आवश्यक तेल आढळून येतात. निळ्या हळदीची चव कडू असते. निळ्या रंगाच्या हळदीला कापूरसारखा तीव्र वास येतो. त्यामुळे निळी हळद स्वयंपाक घरात अजिबात वापरली जात नाही. ही हळद आयुर्वेद आणि घरगुती उपचारांसाठी वापरली जाते. सांधेदुखी, स्नायू कडक होणे किंवा दुखापतीमुळे होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी निळ्या हळदीचा वापर करावा. पारंपारिक औषधांमध्ये, खोकला, दमा आणि छातीत जळजळ यासारख्या समस्यांसाठी सुद्धा वापर केला जातो. दुर्मिळतेमुळे ती सामान्य हळदीपेक्षा महाग आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, निळ्या हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट, दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहेत. (Latest Marathi Headline)
निळ्या हळदीचे सेवन योग्य प्रमाणात केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. अपचन, गॅस, पोटफुगी किंवा आम्लपित्त यांसारख्या तक्रारींवर ही हळद उपयोगी ठरू शकते. तिच्यातील नैसर्गिक घटक पचनसंस्थेतील जंतुसंसर्ग कमी करण्यास मदत करतात. तसेच भूक न लागणे किंवा पोट जड वाटणे यासारख्या समस्यांमध्ये आयुर्वेदिक औषधांच्या स्वरूपात निळ्या हळदीचा वापर केला जातो. शिवाय या निळ्या हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. बदलत्या हवामानात सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी तिचा उपयोग केला जातो. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास ही हळद मदत करते, त्यामुळे एकूण आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. (Top Stories)
निळी हळद ही अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती असल्यामुळे तिचा वापर मर्यादित प्रमाणातच करावा. गर्भवती महिला, लहान मुले किंवा दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी निळ्या हळदीचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. चुकीच्या किंवा अति वापरामुळे दुष्परिणाम होऊ शकतात, त्यामुळे आयुर्वेदिक मार्गदर्शनाखालीच तिचा उपयोग करावा. त्वचेवरील जखमा, पुरळ, फोड किंवा कीटकदंश यावर निळ्या हळदीचा वापर फायदेशीर मानला जातो. तिच्यातील जंतुनाशक गुणधर्म जखम लवकर भरून येण्यास मदत करतात. निळ्या हळदीची पेस्ट लावल्यास त्वचेतील संसर्ग कमी होतो आणि जखम कोरडी पडण्यास मदत होते. मात्र संवेदनशील त्वचेवर वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. (Social News)
Comments
Post a Comment