Parshuram Jayanti : विष्णूंचा सहावा अवतार असलेल्या भगवान परशुरामांची आज जयंती
हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा आणि मोठा दिवस म्हणजे अक्षय्य तृतीया. आज संपूर्ण देशात अक्षय्य तृतीया मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जातो. हा दिवस अतिशय शुभ समजला जातो. या दिवशी अक्षय्य तृतीया साजरी तर होतेच सोबतच भगवान विष्णू यांचा सहावा अवतारा असलेल्या भगवान परशुराम यांची जयंती देखील साजरी होते. भगवान परशुराम यांना चिरंजीव मानले जाते. त्यांचा उल्लेख महाभारत आणि विविध पुराणांमध्ये आढळतो. त्यांच्या हाती असलेल्या “परशु (कुऱ्हाड)” या शस्त्रामुळे त्यांना परशुराम म्हटले जाते, हे शस्त्र त्यांना भगवान शिवप्रभूंनी दिले होते अशी मान्यता आहे.
भगवान परशुरामाचे जन्माचे नाव राम होते. त्यांनी आपल्या कठोर तपश्चर्येने भगवान शिवाला प्रसन्न केले. त्यानंतर भगवान शिवाने त्यांना अनेक अस्त्रे आणि शस्त्रे दिली. ज्यात परशु हा देखील मुख्य आहे. त्यांनी परशु धारण केले, त्यानंतर त्यांना परशुराम म्हटले जाऊ लागले. परशुरामाशिवाय ते रामभद्र, भार्गव, भृगुवंशी इत्यादी नावांनी देखील ओळखले जातात. परशुराम हे शंकराचे परम उपासक असल्यामुळे परशुरामजींना रुद्र शक्ती असेही म्हणतात. ते आपल्या आई-वडिलांचे उपासक आणि आज्ञाधारक होते. राजा सहस्त्रार्जुनाच्या पुत्रांनी पिता ऋषी जमदग्नीचा वध केल्याने संतापलेल्या भगवान परशुरामांनी ही पृथ्वी 21 वेळा क्षत्रियांपासून मुक्त केली. त्याचप्रमाणे जेव्हा महादेवाचे धनुष्य श्री रामाने मोडले तेव्हा ते इतके क्रोधित झाले की त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीने ते ताबडतोब जनकपूरला पोहोचले, जिथे श्री रामाने धनुष्य तोडले होते. सात चिरंजीवी महापुरुषांमध्ये परशुरामांची गणना होते. एका आख्ययिकेनुसार पौराणिक कथेनुसार, परशुराम हा श्री विष्णूंच्या दशावतारांपैकी सहावा अवतार आहे. जमदग्नी ऋषींनी चंद्रवंशी राजाची कन्या रेणुका हिच्याशी विवाह केला. जमदग्नी आणि रेणुका ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी मोठा यज्ञ केला. या यज्ञावर प्रसन्न होऊन भगवान इंद्राने त्यांना तेजस्वी पुत्राचे वरदान दिले आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी परशुरामाचा जन्म झाला. ऋषींनी आपल्या मुलाचे नाव राम ठेवले. रामाला भगवान शिवाकडून शस्त्रास्त्रांचे ज्ञान प्राप्त झाले आणि शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी आपली कुऱ्हाड म्हणजेच परशु त्याला दिली. त्यामुळे त्यांना परशुराम म्हणतात. चिरंजीवी होण्यात धन्यता मानली. रामायण आणि महाभारत या दोन्हीमध्ये त्यांचे वर्णन आहे. त्यांनीच श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र उपलब्ध करून दिले आणि महाभारत काळात भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण यांना शस्त्रांचे ज्ञान दिले.
परशुराम यांचे जीवन अनेक पौराणिक कथांनी भरलेले आहे. त्यांना चिरंजीवी मानले जाते, आणि असे मानले जाते की ते आजही पृथ्वीवर कुठेतरी उपस्थित आहेत. हिंदू शास्त्रांनुसार परशुराम हे आठ चिरंजीवींपैकी एक आहेत, जे कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णूंच्या दहाव्या अवताराला म्हणजेच कल्कि अवताराला मार्गदर्शन करतील. परशुराम यांनी आपल्या जीवनात अनेक दुष्ट आणि अधर्मी शक्तींचा नाश केला, विशेषतः त्या क्षत्रिय राजांचा, ज्यांनी आपल्या सत्तेचा गैरवापर करून सामान्य लोकांवर अत्याचार केले.
पौराणिक कथांनुसार, भगवान विष्णूंनी परशुराम अवतार घेण्यामागे एक विशेष कारण होते. त्या काळात पृथ्वीवर क्षत्रिय राजांनी आपल्या सत्तेचा दुरुपयोग सुरू केला होता. त्यांनी सामान्य लोकांवर अत्याचार केले, ऋषी-मुनींच्या आश्रमांना नष्ट केले आणि धर्माचे पालन करणे सोडून दिले होते. विशेषतः राजा कार्तवीर्य अर्जुन ज्याला सहस्रबाहू अर्जुन असेही म्हणतात, त्याने अनेक अत्याचार केले. त्याने ऋषि जमदग्नी यांच्या आश्रमातून कामधेनु गाय चोरली आणि त्यांच्या आश्रमाला आग लावली. या अत्याचारांमुळे पृथ्वी माता व्याकूळ झाली आणि तिने भगवान विष्णूंकडे मदतीसाठी प्रार्थना केली.
पृथ्वीवरील अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूंनी परशुरामाच्या रूपात अवतार घेतला. परशुराम यांनी क्षत्रिय राजांचा 21 वेळा नाश केला, ज्यामुळे पृथ्वीवरील अधर्मी शक्तींचा अंत झाला. परशुराम यांनी केवळ दुष्टांचा नाश केला नाही तर त्यांनी धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेशही दिला. त्यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिले की, सत्य आणि न्यायासाठी लढणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, मग तो ब्राह्मण असो वा क्षत्रिय.
दुसऱ्या एका प्रसिद्ध कथेनुसार, परशुराम यांनी आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार आपल्या आई रेणुकेचा वध केला होता. ऋषि जमदग्नी यांनी रेणुकेला एकदा तिच्या विचारांमुळे दोषी ठरवले आणि तिला मारण्याची आज्ञा दिली. परशुराम यांनी आपल्या वडिलांच्या आज्ञेचे पालन केले, परंतु नंतर त्यांनी आपल्या वडिलांकडून वरदान मागितले की, त्यांच्या आईला आणि भावांना पुन्हा जिवंत करावे. ही कथा परशुराम यांच्या पितृभक्तीचे आणि त्यांच्या आज्ञापालनाचे उदाहरण देते. महाभारतातही परशुराम यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. त्यांनी भीष्म, द्रोण आणि कर्ण यांना शस्त्रविद्या शिकवली होती. परंतु जेव्हा त्यांना समजले की कर्णाने खोटे बोलून त्यांच्याकडून शिक्षण घेतले आहे, तेव्हा त्यांनी कर्णाला शाप दिला की, तो युद्धात त्याने शिकलेली विद्या विसरेल. हा शाप कर्णाच्या मृत्यूचे एक कारण बनला.
this blog was originally published on https://gajawaja.in/parshuram-jayanti-2026-know-who-is-lord-parshuram/
Comments
Post a Comment