Horoscope : मेष ते मीन कोणत्या राशीसाठी आहे आजचा दिवस खास…?
२०२६ साल सुरु झाले असून, आज नवीन वर्षातील दुसरा दिवस आहे. आज ०२-०१-२०२६ शुक्रवारचा दिवस. आजची तिथी शुक्ल चतुर्दशी असून आजचे नक्षत्र मृगशीर्ष आहे. आजच्या दिवसातील अमृतकाळ सकाळी ०८:३२ ते ०९:५५ इतका असेल तर राहूकाळ ११:१७ ते १२:४० पर्यंत असेल. आज सुर्योदय ०६:४५:०० सकाळी झाला असून, सुर्यास्त संध्याकाळी ०५:०६ मिनिटांनी होईल. आज दिवस कोणत्या राशीसाठी कसा असेल चला जाणून घेऊया. Latest marathi news
मेष
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. आज तुमच्यातील आत्मविश्वास चांगल्या कामासाठी वापरा. आज तुम्हाला आर्थिक क्षेत्रातील सकारात्मक प्रयत्नांचे अनुकूल परिणाम मिळतील. या वर्षी, तुम्ही वाहन किंवा घर खरेदी करू शकाल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. तसेच, आजच्या दिवसात तुमच्या हातून शुभकार्य घडण्याची शक्यता आहे.
वृषभ
आजचा दिवस हा सकारात्मक दृष्टिकोनाने काम करण्याचा हा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी इतरांच्या गरजांना जास्त महत्त्व देऊ नका. तुमच्या ध्येयांना प्राधान्य द्या. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून कामाच्या ठिकाणी सन्मानित केले जाऊ शकते.
मिथुन
आजच्या दिवसाची सुरुवात गोड बातमीने होईल. बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील लोकांना काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते.संध्याकाळी तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. तुम्हाला सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल.
कर्क
आज तुमचे नशीब बदलू शकते. तुम्ही लांब पल्ल्याच्या सहलीला जाण्याची शक्यता आहे. व्यवसायात आजचा दिवस प्रगतीचा आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्ही जे काम करताय ते प्रामाणिकपणे करत राहा.
सिंह
आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणचे अडकलेले पैसे मिळू शकतात. तुमच्या कामाची आज स्तुती होईल. हे वर्ष तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या अनुकूल राहील.
कन्या
आज नशीब तुमच्या बाजूने असेल. आज तुमच्या भूतकाळातील काही गोष्टी तुमच्या आयुष्यात डोकावू शकतात. नशिबावर अवलंबून राहू नका मेहनतीवर लक्ष केंद्रित करा. जुन्या कर्जातून सुटका मिळेल. कुटुंबात आर्थिक जबाबदाऱ्या वाढतील.
तूळ
आज तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्ही आज प्रवास कराल. प्रेम संबंधांसाठी वेळ शुभ आहे. तुम्ही आर्थिक तंगीमध्ये येऊ शकतात. योजना आखून काम केल्यास यश मिळेल. (Trending News)
वृश्चिक
नशीब तुमच्यासोबत असेल. तुम्ही तुमची बहुतेक कामे यशस्वीरित्या पूर्ण कराल. अचानक धनलाभ होण्याची संधी मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर सावधगिरी बाळगा. नियमांचे पालन करण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
धनु
नववर्षाची आश्वासक सुरूवात होईल. हे वर्ष सकारात्मक परिणाम घेऊन येईल. तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील.आज कामाच्या ठिकाणी तुमच्यावर कामाचा ताण वाढलेला दिसेल. अशा वेळी जास्त ताण घेऊ नका. (Top Stories)
मकर
तुमच्या कष्टाचे फळ मिळण्यास थोडा वेळ लागू शकतो. पैशांचा वापर विचारपूर्वक करा. कोर्ट-कचेरीतील प्रकरणे सुटतील. व्यावसायिक प्रवास होऊ शकतो.
कुंभ
व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. आज नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला त्यांच्या प्रगतीत किंवा आर्थिक निर्णयांमध्ये सहभागी व्हावे लागू शकते. प्रवासाच्या शक्यता निर्माण होत आहेत. आज काही जवळच्या नातेवाईकांशी तुमच्या भेटी होऊ शकतात.
मीन
नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमच्या बॉस आणि सहकाऱ्यांना दाखवून द्या की तुम्ही किती मेहनती आहात.कुटुंब किंवा भावनिक नातेसंबंधांना वेळ देणे तुम्हाला कठीण जाईल. नोकरी करणाऱ्यांना उत्तम यश मिळू शकते. या राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. (Social News) Marathi news
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending TopicsOriginal content is posted on https://gajawaja.in/today-2-january-2026-rashi-zodiac-signs/
Comments
Post a Comment