China : भारताचा कट्टर वैरी असलेल्या चीनमध्ये ‘या’ मराठी माणसाची केली जाते पूजा
चीन म्हणायला भारताचा शेजारचा देश आहे. मात्र शेजार धर्म तो कधीच पाळताना दिसत नाही. आपण नेहमी असे म्हणतो की, “पहिला नातेवाईक शेजारी” पण चीन भारताचा नातेवाईक सोडा शेजारी देखील होऊ शकला नाही. कायम भारताच्या पाठीत खंजीर खुपसणारा चीन आपला शेजारी असल्याचे दुःख सर्वच भारतीयांना आहे. शेजारी राहून सतत भारतावर कुरघोडी करण्यातच धन्यता मानणाऱ्या चीनचे आणि आपले नाते तर जगजाहीर आहे. पाकिस्ताननंतरचा भारताचा दुसरा मोठा शत्रू म्हणून चीनची ओळख आहे. चीनने नेहमीच पाकिस्तानला भारताविरोधात जाऊन पाठिंबा दिला आहे. कधी पाकिस्तानला त्यांनी उघड पाठिंबा दिला तर कधी छुपा पाठिंबा दिला. (China) International News
शिवाय चीनकडून पाकिस्तानला शस्त्रांचा देखील पुरवठा करण्यात येतो, ज्याचा वापर पाकिस्तानकडून भारतविरोधी कारवायांसाठी केला जातो. “शत्रूचा शत्रू आपला मित्र” या वाक्यानुसार भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानचा चीन मित्र बन्सल आणि कायमच भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. चीन आणि भारताचे नाते कधी चांगले होईल आणि होईल की नाही हे माहित नाही. मात्र असे असले तरी चीनबद्दल एक हटके गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.(Marathi Top News)
चीनच्या मनात भारताबद्दल आणि भारताच्या मनात चीनबद्दल कितीही द्वेष असला तरी, चीनमध्ये मात्र चक्क एका मराठी डॉक्टरची पूजा केली जाते. ऐकून आश्चर्य नक्कीच वाटले असेल, पण हे खरे आहे. आजही चीनमध्ये या मराठी माणसाची देवासारखी पूजा केली जाते. एवढेच नव्हे तर चीनमध्ये या व्यक्तीचे काही ठिकाणी पुतळे देखील आहेत. शिवाय चीनमधील उच्चपदस्थ व्यक्ती जेव्हा कधी भारतात येतात तेव्हा न चुकता या माणसाच्या कुटुंबाची भेट घेतात. मग नक्की कोण आहे हा माणूस? आणि का देवासारखी चीनमध्ये याची पूजा होते? चला जाणून घेऊया. (Top Stories)
या मराठी व्यक्तीचे नाव आहे, डॉ. द्वारकानाथ कोटणीस. याच डॉक्टरांबद्दल चीनमध्ये आणि येथील लोकांमध्ये कमालीचा आदर आणि प्रेम पाहायला मिळते. पण या डॉक्टर कोटणिसांनी असे काय केले की त्यांना चक्क देवदूत म्हटले जाऊ लागले? झाले असे की, १९३७ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले आणि त्यांच्यात भीषण युद्ध सुरु झाले. या युद्धात चीनचे मोठे नुकसान झाले. शिवाय चीनचे सैन्य मोठ्या प्रमाणावर जखमी झाले तर अनेक सैनिकांचा मृत्यू देखील झाला. या युद्धामुळे चीनमध्ये खूपच गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. (Marathi Latest News)
चीनमधील सर्वच सुविधा अपुऱ्या पडायला लागल्या. वैद्यकीय सेवांची देखील कमतरता पडू लागली. तेव्हा चीनच्या लष्करप्रमुखांनी इतर देशांना वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी आवाहन केले. या मदतीसाठी चीनने भारताला देखील एक पत्र पाठवले होते. या पत्रानंतर चीनच्या मदतीसाठी भारतातून डॉक्टरांची एक टीम चीनला पाठवण्यात आली होती आणि त्यामध्ये डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचाही समावेश होता. (Social NEws)
डॉक्टर कोटनीस यांचा जन्म १० ऑक्टोबर १९१० रोजी सोलापूर, महाराष्ट्र इथे झाला. डॉ कोटनीस हे पाच भारतीय डॉक्टरांपैकी एक होते, ज्यांना १९३८ मध्ये दुसऱ्या चीन-जपानी युद्धादरम्यान मदतीसाठी पाठवण्यात आले होते. आजही डॉ. कोटनीस हे भारत आणि चीन यांच्या मैत्रीचे प्रतीक मानले जातात. शहीदांच्या स्मरणार्थ चीनमध्ये दरवर्षी किंगमिंग फेस्टिव्हल आयोजित केला जातो. या फेस्टिव्हलमध्ये डॉ. कोटनीस यांच्यासह कॅनडाचे डॉ. नॉर्मन बेथून यांनाही आदरांजली वाहिली जाते.(Marathi Trending News)
चीनला पोहचल्यानंतर या भारतीय डॉक्टरांच्या पथकाने तब्बल साडेतीन वर्षे चीनी सैनिकांवर उपचार केले. असे सांगितले जाते की, डॉ. कोटणीस यांनी सलग ७२ तास कोणताही ब्रेक न घेता चीनी सैनिकांची ऑपरेशन्स केली. त्यांनी या युद्धात जखमी झालेल्या तब्बल ८०० चीनी सैनिकांचे प्राण वाचवले. त्यामुळे त्यांना आजही चीनमध्ये देव मानले जाते आणि त्यांची पूजा केली जाते. चीनमधील काही शाळा आणि संग्रहालयांना कोटणीस यांचे नाव देण्यात आले आहे, तसेच तिथे काही ठिकाणी त्यांचे पुतळे देखील पाहायला मिळतात. (Top Trending Marathi News)
=======
हे देखील वाचा : Bhushan Gavai : महाराष्ट्राचे भूषण गवई बनले देशाचे ५२वे सरन्यायाधीश
=======
डॉ. कोटनीस यांच्या सेवा आणि योगदानासाठी चीनमधील अनेक शहरांमध्ये त्यांची शिल्पे बसवण्यात आली आहेत. त्यांनी चिनी नागरिक गुओ किंगलानशी लग्न केले आणि २०१२ मध्ये तिचा मृत्यू झाला. एका कार्यक्रमादरम्यान गुओ आणि डॉ. कोटनीस यांची भेट झाली. डॉ. कोटनीस अस्खलित चिनी बोलायचे ते पाहून गुओ प्रभावित झाल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धात गुओ या नर्स सेवा देत होत्या. या युद्धादरम्यान दोघांमधील प्रेम वाढले आणि १९४१ मध्ये त्यांनी लग्न केले. दोघांना एक मुलगा होता ज्याचे नाव त्यांनी यिनहुआ ठेवले. ‘यिन’ म्हणजे भारत आणि ‘हुआ’ म्हणजे चीन. Latest International News
Original Content is posted on https://gajawaja.in/this-marathi-man-is-worshipped-in-china-marathi-info/
Comments
Post a Comment