Tenzin Gyatso : दलाईलामांचा उत्तराधिकार आणि चीनची चिंता !
हिमाचल प्रदेश येथील धर्मशाळा येथील मॅकलिओड गंज येथील बौद्ध धार्मिक नेत्यांच्या बैठकीकडे तमाम जगाचे लक्ष लागले आहे. 14 व्या दलाई लामा यांच्या वाढदिवसापूर्वी होत असलेल्या या बैठकीत जगभरातील 100 हून अधिक बौद्ध धार्मिक नेते सहभागी झाले आहेत. यात दलाई लामा यांच्या उत्तराधिकारीच्या निवडीवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. (Tenzin Gyatso) Marathi News
2019 नंतरची ही पहिलीच बैठक असून या बैठकीमुळे बौद्ध धर्मियांमध्ये उत्सुकता असली तरी चीनमधील सत्ताधा-यांमध्ये मात्र या बैठकीमुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. तिबेटवर पूर्णपणे ताबा मिळवण्यासाठी चीनची तयारी सुरु आहे. अशातच दलाई लामा निवडीमध्येही चीनला हस्तक्षेप करायचा आहे. मात्र या सर्वाला तिबेटमध्ये विरोध होत आहे. अशावेळी धर्मशाळे येथे दलाई लामा यांच्या उत्तराधिका-यांची थेट घोषणाच होणार असल्यामुळे चीनी सत्ताधा-यांचा संताप झाला आहे. या बैठकीमध्ये भावी दलाई लामांबद्दल काय निर्णय घेतला जातो, हे जाणून घेण्यासाठी चीन आता सर्व प्रयत्न करीत आहे. (International News)
नवीन दलाई लामा यांच्या नियुक्तीवरून हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. 14 वे दलाई लामा तेन्झिन ग्यात्सो त्यांच्या वाढदिवसापूर्वी धर्मशाळा येथे ही 3 दिवसांची बैठक होईल. जगभरातील 100 बौद्ध धार्मिक नेत्यांच्या उपस्थितीत होणा-या या बैठकीत दलाई लामा यंच्या उत्तराधिकारीबाबत निर्णय होईल. हा निर्णय तिबेटी आध्यात्मिक नेते 6 जुलै रोजी जाहीर करणार आहेत. धर्मशाळेतील मॅकलिओड गंज येथे यासाठी मोठ्या धार्मिक कार्यक्रमाची तयारीही सुरु करण्यात आली आहे. (Tenzin Gyatso)
दलाई लामा यांचा उत्तराधिकारी निवडतांना अनेक पारंपारिक संकेत पाळले जातात. ही सर्व प्रक्रिया अत्यंत गुप्त असते. तसेच या सर्वात स्वप्नात आलेले संकेत मुख्य असतात. गुप्त आणि रहस्यमय पद्धती म्हणून या सर्व प्रक्रियेकडे बघितले जाते. दलाई लामांच्या नियुक्तीच्या काही खास नियमांनुसार तिबेटमध्ये जन्मलेल्या मुलाचा शोध घेतला जातो. मात्र गेल्या काही वर्षामध्ये या सर्व प्रक्रियेमध्ये चीन सरकारनं हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. तसेच स्वप्नातील संकेतांकडे दुर्लक्ष करीत चीन सरकारनं सांगितलेल्या मुलाला दलाई लामा घोषित करण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. यामुळे संपूर्ण तिबेटमध्ये संतापाची भावना आहे. याशिवाय या सर्व निवडप्रक्रियेमध्ये भारताचेही नाव आले आहे. यावेळी तिबेटऐवजी भारतातून किंवा इतर भागातून मुले सापडतील असे संकेत दिले गेले आहेत. जर असे झाले तर गेल्या 385 वर्षांची परंपरा खंडित होण्याची शक्यता आहे. या सर्वात चीन सरकारलाही त्यांच्या दडपशाहीचे उत्तर मिळणार आहे. त्यामुळेच आत्तापासूनच चीननं धर्मशाळा येथील बैठकीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भावी दलाई लामांची ही नियुक्ती योग्य नसल्याचे चीन सरकारनं घोषित केले आहे. (International News)
यानंतर चीन सरकारनं आपण स्वतःच दलाई लामांची निवड करणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवाय चीन ज्या दलाई लामांची निवड करणार तेच खरे दलाई लामा असतील, असेही सांगितले आहे. पण चीनचा हा दावा कायम तिबेटी नागरिकांनी फेटाळला आहे. तिबेटी लोकांचे सर्वोच्च आध्यात्मिक नेते दलाई लामा यांचा उत्तराधिकारी कोण, या निर्णयाचा भारत-चीनपासून जगभरातील अन्य देशांवरही परिणाम होणार आहे. 6 जुलै रोजी दलाई लामा 90 वर्षांचे होत आहेत. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धर्मशाळेतील निर्वासित तिबेटी संसद आणि सरकार त्यांचा वारसा कोण चालवणार याची घोषणा करणार आहेत. 6 जुलै रोजी धर्मशाळा येथे दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर 100 मान्यवर बौद्ध धर्मगुरुंच्या मान्यतेनुसार आणि संकेतानुसार दलाई लामांच्या उत्ताराधिका-याची घोषणा होणार आहे. (Tenzin Gyatso) Latest Marathi News
==============
हे देखील वाचा : China : चीनच्या आणखी एका जैविक शस्त्राची जगभर दहशत !
===============
वास्तविक तिबेटी परंपरेनुसार दलाई लामा यांच्या मृत्यूनंतर पुढील धार्मिक नेत्याची निवड हेते. मात्र 14 वे दलाई लामा यांनी मार्च 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या व्हॉइस फॉर द व्हॉइसलेस या पुस्तकात भावी दलाई लामांबद्दल काही संकेत दिले आहेत. त्यानुसार त्यांचा उत्तराधिकारी आणि पुढचे दलाई लामा चीनच्या बाहेर जन्माला येतील. शिवाय त्यांच्या 90 व्या वाढदिवशी ते त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार असल्याचेही पुस्तकात नमूद आहे. त्यानुसार 6 जुलै 2025 या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
Original content is posted on https://gajawaja.in/dalai-lama-succession-and-chinas-concerns/
Comments
Post a Comment