Marina Abramovic : “6 तास माझ्यासोबत काहीही करा” मग लोकांनी जे केलं…
आज आपण सांगणार आहोत एका अशा एक्सपेरिमेंटबद्दल, ज्याने सगळ्या जगाला हादरवलं. ही गोष्ट आहे मरीना अब्रामोविक नावाच्या एका कलाकाराची, जिनं 1974 साली इटलीत एक असा एक्सपेरिमेंट केला, ज्याने माणसाच्या चेहऱ्या मागे लपलेला क्रूर चेहरा सगळ्यांसमोर आणला. तिने लोकांना सांगितलं, “मी तुम्हाला 6 तास देतेय, माझ्यासोबत काहीही करा, मी काहीच करणार नाही!” पण लोकांनी तिच्यासोबत जे केलं, ते ऐकून तुम्हाला प्रश्न पडेल की, माणूस किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो? पण तिने हा असा एक्सपेरिमेंट का केला आणि या एक्सपेरिमेंटमध्ये लोकांनी तिच्यासोबत काय केलं? हे जाणून घेऊ. (Marina Abramovic) International News
ही गोष्ट आहे 1974 सालची, इटलीतील एक कलाकार मरीना अब्रामोविक हीची, जिने फाइन आर्ट्सचं शिक्षण घेतलं होतं, ती तिच्या अनोख्या एक्सपेरीमेन्टल परफॉर्मन्ससाठी ओळखली जायची. पण यावेळी तिनं ठरवलं होतं की, ती असा काहीतरी एक्सपेरिमेंट करणार, ज्याने लोकांना माणसाचं खरं स्वरूप दिसेल. तिनं आपल्या या एक्सपेरिमेंटचं नाव ठेवलं – Rhythm 0.
या एक्सपेरिमेंटसाठी मरीनाने इटलीतल्या एका आर्ट गॅलरीत एक टेबल ठेवलं. त्या टेबलवर 72 वस्तू होत्या – काही साध्या, तर काही भयंकर. त्यात गुलाबाचं फुलं, पाण्याचा ग्लास, मध, मोरपिसं यासारख्या गोष्टी होत्या. पण त्याचबरोबर चाकू, ब्लेड, साखळी आणि… एक लोडेड पिस्तूलही होतं! मरीनाने एक बोर्ड लिहिला, ज्यावर स्पष्ट शब्दात लिहिलं होतं, “मी एक वस्तू आहे. तुम्ही माझ्यासोबत या 6 तासांत काहीही करू शकता. मी काहीच करणार नाही. आणि मला काही झालं, तर त्याची जबाबदारी माझी स्वतःची असेल.” (Top Stories)
रात्री 8 वाजता एक्सपेरिमेंट सुरू झाला. मरीना तिथे एखाद्या पुतळ्यासारखी उभी होती. चेहऱ्यावर कसलेही भाव नाहीत, फक्त तिच्या डोळ्यात एक दुख होतं, जे कोणालाही अस्वस्थ करेल. सुरुवातीला लोक थोडे गोंधळले. सगळे एकमेकांकडे बघत होते, “तिच्यासोबत काय करायचं? विचार करत होते..” काही जणांनी हळूच तिच्याजवळ येऊन तिला स्पर्श केला, काहींनी तिच्या हातावर फूल ठेवलं, कोणी तिच्या गालावर मध लावलं. कोणी तिच्या तोंडात ब्रेडचा तुकडा कोंबला… इथ पर्यंत सगळं व्यवस्थित नॉर्मल सुरू होतं पण हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या. ती काहीच Response देत नाही हे पाहून लोकांची हिंमत वाढली. (Marina Abramovic)
एका माणसाने जाऊन तिचं चुंबन घेतलं, एकाने तिला जोरात कानाखली मारली.. काही मुलींनी तिला जोरात ढकललं. मग एक व्यक्ती पुढे आली आणि तिनं मरीनाला खुर्चीला बांधलं. आता लोकांचा मूड बदलत चालला होता. एका माणसाने टेबलवरून ब्लेड उचललं आणि मरीनाच्या गळ्यावरून हलकेच फिरवलं. मरीनाचा चेहरा तसाच होता, पण तिच्या डोळ्यांत भीती दिसत होती. तरीही ती शांत होती. मग एकाने ब्लेडने तिचे कपडे फाडायला सुरुवात केली. कोणी तिच्या शरीरावर आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या, कोणी तिच्यावर थंड पाणी टाकलं, तर कोणी तिच्या तोंडावर थुंकलं. तिला सुई सुद्धा टोचली गेली. तिच्या डोळ्यातून अश्रु येत होते. कोणी येऊन ते पुसतही होतं. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार करण्यात आले. काही लोकांनी तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्नही केला. ती नग्न बसून राहिली. पण सगळ्यात भयंकर गोष्ट तेव्हा घडली, जेव्हा एका व्यक्तीने ते लोडेड पिस्तूल तिच्या हातात ठेवलं आणि म्हणाला, “स्वतःला गोळी मार!” ही सगळी क्रूरता पाहून गॅलरीतले काही लोक अस्वस्थ झाले, त्याच्या नंतर अचानक कुणीतरी त्या माणसाला पकडलं आणि लोकांमध्ये भांडण सुरू झाले.
काही लोकांना वाटत होतं की मरीनाला वाचवायला हवं, पण बऱ्याच जणांना हा एक्सपेरिमेंट पुढे चालू राहावा असं वाटतं होतं. पण मग कसे तरी 6 तास संपले. शेवटी गॅलरीचा मालक आला आणि म्हणाला, “बस, आता वेळ संपली.” प्रेक्षकांनाही सांगितलं गेलं एक्सपेरिमेंट इथेच संपतो.
6 तासांनंतर, जेव्हा हा एक्सपेरिमेंट थांबला, तेव्हा मरीनाने हळूहळू चालायला सुरुवात केली. ती प्रत्येक व्यक्तीच्या जवळ जाऊन त्यांच्या डोळ्यांत बघत होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जे लोक तिला त्रास देत होते, ते आता तिच्याशी नजर मिळवू शकत नव्हते. सगळे मान खाली घालून पळायला लागले. मरीनाच्या या एक्सपेरिमेंटने एक गोष्ट स्पष्ट केली – जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपला बचाव करता येत नाही, तेव्हा माणूस किती क्रूर होऊ शकतात. (Marina Abramovic)
==============
हे देखील वाचा : Fake Paris : पॅरिससारखंच डुप्लिकेट पॅरिस ! नक्की भानगड काय?
==============
नंतर एका मुलाखतीत मरीनाने सांगितलं, “त्या 6 तासांत मला असं वाटत होतं, जसं माझ्यावर बलात्कार झाला. ते माझ्या आयुष्यातले सगळ्यात भयंकर 6 तास होते. मी पुन्हा कधीच असं करणार नाही.” मरीनाला त्या परफॉर्मन्समधून एक संदेश द्यायचा होता, माणसाच्या मनात लपलेला क्रूरपणा आणि त्याचा गैरवापर करण्याची वृत्ती. तिनं दाखवून दिलं की, जर एखाद्याला संधी मिळाली, तर तो किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो. (Marina Abramovic)
पण या एक्सपरिमेंटल परफॉर्मन्सचा परिणाम असा झाला की, मरीनाचं नाव जगभरात गाजलं. तिचा हा परफॉर्मन्स आर्टच्या दुनियेत एक Milestone ठरला. Latest International News
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
Original content is posted on https://gajawaja.in/marina-abramovics-shocking-1974-experiment-the-dark-side-of-human-nature/
Comments
Post a Comment