America : 12 ऑगस्टला अमेरिकेत काय होणार ?

 

अमेरिकेच्या सोशल मिडियामध्ये सध्या दोनच गोष्टी चर्चेत आहेत, त्यापैकी एक म्हणजे, 12 ऑगस्ट रोजी काय होणार, आणि दुसरी गोष्ट म्हणजे, अ‍ॅनिमेटेड शो द सिम्पसन्स. याच द सिम्पसन्स शो च्या एका भागात काही वर्षापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूची भविष्यवाणी केली आहे. द सिम्पसंस एक अमेरिकी एनिमेटेड सिटकॉम आहे. अमेरिकी जीवनाचे एक व्यंगात्मक चित्रण यात केले आहे. सिम्पसन कुटुंबातील होमर , मार्ज , बार्ट , लिसा आणि मॅगी या अनेक पात्रांनी कायम अमेरिकेतील समाजजीवनाला जगासमोर आणले आहे. याच द सिम्पसंस शो च्या एका भागात डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील अशी भविष्यवाणीही करण्यात आली होती. तर आता या शो च्या एका भागात डोनाल्ड ट्रम्प यंचा मृत्यू झाल्याचा व्हिडिओ दाखवण्यात आला. (America) International News

हा व्हिडिओ खूप आधीचा असून या शोतून आता हा भाग काठून टाकण्यात आला आहे. मात्र जेव्हा हा भाग दाखवण्यात आला होता तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मिळतेजुळते पात्र व्हाईट हाऊसमध्ये चक्कर येऊन पडतांना दाखवले होते. ही तारीख 12 ऑगस्ट 2025 दाखवण्यात आली असून व्हिडिओमध्ये ट्रम्प यांना रुग्णालयात नेले जात असल्याचे दाखवले आहे आणि नंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आले. द सिम्पसंस च्या या भविष्यवाणीनं सध्या अमेरिकेमध्ये धुमाकूळ घातला आहे. द सिम्पसन्स शोने 12 ऑगस्ट 2025 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूची भविष्यवाणी केली आहे. हा व्हिडिओ द सिम्पसंस मधून गायब करण्यात आला होता. मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून हा व्हिडिओ अमेरिकेच्या सोशल मिडियामध्ये दाखल झाला आणि तो प्रचंड व्हायरलही झाला. (International News)

या व्हिडिओमध्ये ट्रम्पसारखे पात्र चक्कर येऊन जमिनीवर कोसळताना दाखवले आहे. या सर्वात नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांना रक्तवहिन्यासंबंधी आजार असल्याचे निदान करण्यात आले आहे. या दोन घटना जोडण्यात येत असून ट्रम्प यांच्या या मृत्यूच्या भविष्यवाणीनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. द सिम्पसंस एक अमेरिकी एनिमेटेड शोमधून यापूर्वी अनेकवेळा जगामध्ये काही घटना घडण्यापूर्वी भविष्यवाणी करण्यात आली होती. त्याप्रमाणेच घटना झाल्यामुळे द सिम्पसन्स शोचे जगभरात करोडो चाहते आहेत. या सर्वात तंत्रज्ञानातील प्रगतीपासून ते राजकीय घडामोडींचाही समावेश आहे. याच अ‍ॅनिमेटेड शोमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूची भविष्यवाणी करण्यात आली आहे. या क्लिपमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी एक आश्चर्यकारक साम्य असलेले पात्र आहे. (America)

व्हायरल क्लिपमध्ये, राष्ट्राध्यक्ष व्हाईट हाऊसमध्ये एकटेच फिरताना दाखवण्यात आले आहे. त्यांच्या शरीराचा रंग नारंगी आहे, केस सोनेरी आहेत आणि त्यांचा स्वभाव खूप चिडचिडा असल्याचे सांगितले आहे. थोड्याच वेळात, ही व्यक्ती थेट टेलिव्हिजन प्रक्षेपण दरम्यान त्याच्या छातीवर हात ठेवते आणि जमिनीवर पडते. व्हाईट हाऊसच्या भिंती हादरतात आणि एक वैद्यकीय कर्मचारी ओरडतो की ‘हा फक्त ताण नव्हता, तो एक संकेत होता.’ त्यानंतर या व्यक्तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येते, तिथे त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात येते. हा भाग सुमारे 15 वर्षांपूर्वी प्रसारित झाला होता. मात्र तो आता स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आल्याचे निर्मात्यांनी सांगितले. पण हे त्यांचे विधान आल्यावरही अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण पंधरा वर्षापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे पात्र त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये कसे दाखवले असा प्रश्नच आता विचारण्यात येत आहे. (International News)

==============

हे देखील वाचा : Donald Trump : RIC ची ताकद ट्रम्पना रोखणार !

===============

या सर्वात व्हाईट हाऊसने 17 जुलै 2025 रोजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना क्रॉनिक व्हेनस इन्स्युच्युएंसी हा रक्ताभिसरण विकार असल्याचे सांगितले आहे. हा आजार बहुधा वृद्धांमध्ये दिसून येतो. यामध्ये पायांपासून हृदयापर्यंत रक्तप्रवाह कमी होतो आणि शरीराला सूज येते. शिवाय जखम होणे, व्हेरिकोज व्हेन्स आणि पाय दुखणे यासारखी लक्षणे दिसू लागतात. 79 वर्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत हा अहवाल आल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. त्यातच द सिम्पसंस या शोचा 15 वर्षापूर्वीचा व्हिडिओ अमेरिकेत व्हायरल होऊ लागला. या व्हिडिओला 2.5 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे अमेरिकेत सर्वत्र 12 ऑगस्टला काय होणार हिच चर्चा आहे. (America) Latest International News

सई बने

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics

Original Content is posted on https://gajawaja.in/what-will-happen-in-america-on-august-12/







Comments

Popular posts from this blog

Rajasthan : राजस्थानी बोरं सफरचंदापेक्षा महाग !

Holi : जाणून घ्या होळीमध्ये नारळ का अर्पण करण्यामागचे कारण

Prayagraj : महाकुंभमध्ये काय बघाल !