History Of Elephants: हत्ती जर वाचले नाहीत तर माणसाची हालत…

जपासून ६ कोटी वर्षांपूर्वी… नाही म्हणजे खरंच ६ कोटी वर्षांपूर्वी तसे पुरावे आहेत, तर ६ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक प्राणी राहायचा, Moeritherium नावाचा! असा दिसायला थोडा पाणगेंड्यासारखा होता. तो सस्तन प्राणी होता. उंचीने माणसापेक्षा कमी… तोंड थोडं सोंडेसारखं पुढे आलेलं…दोन मोठे दात आणि हा फक्त आफ्रिकेत होता. म्हणजे एक सिद्ध होतंय की, आफ्रिकेतच हा जन्माला आला होता. आता इतक्या वर्षांनंतर त्याची उत्क्रांती होत गेली. वातावरण बदललं, कोटी वर्ष सरली, प्राण्यांची जीवनशैली बदलली. या Moeritherium ची हाईट वाढली, पाय आणि अंग तगडे झाले… पुढचे जे ओठ होते तीन हलकीशी सोंडेसारखी झाली, दात छोटे पण सुळे झाले आणि मग हा थोडा या रुपात आला… हा होता Palaeomastodon! पुढे हा प्राणी आफ्रिकेतून बाहेर पडला. प्रवासाला लागला… तो आफ्रिकेतून आशिया खंडात आला, युरोपात गेला. आता पुन्हा काही कोटी वर्ष सरली…आणि दुसरं वातावरण लाभल्यामुळे त्याच्यामध्ये आणखी बदल झाले…आणि तो थोडा झाला असा… याला म्हटलं गेलं Gomphothere! चार सुळे आणि एक सोंड असलेला प्राणी… (History Of Elephants)

परत काही कोटी वर्ष उलटली आणि हा प्राणी भाई एकदम तगडा झाला, एकदम धिप्पाड अंगाचा, बघितल्या क्षणीच फाटली पाहिजे, त्यात त्याचे सुळे तर भाई सोंडे इतके झाले… आणि याचं नाव ठेवलं गेलं Mammoth! याच्या अंगावर दाट केस होते. कित्येक वर्ष त्याने पृथ्वीवर राज्य केलं. ज्या वेळी Mammoth पृथ्वीवर जिवंत होते, त्याचदरम्यान आणखी एक प्राणी याच्यातुनच उत्क्रांत झाला होता त्याचं नाव Stegodon तो त्याचाच भाऊ होता असं समजा, साडे तीन-चार मीटर उंची… राखाडी रंगाचा, मोठे कान, एक सुंदर सोंड, दोन सुळे… तो असा दिसायचा ! हो हो हाच आपला हत्तीभाऊ ! विचार करा हत्तीलासुद्धा आपल्या आजच्या रुपात यायला इतकी कोटी वर्ष लागली. वरती मी जे हत्तीचे रूप सांगितले ते सर्व Elephantidae प्रकारात मोडणारे… आणि सध्या जगात तीन प्रकारचेच हत्ती आहेत, म्हणजे Asian Elephant, African bush elephant, African forest elephant… बरं हत्तीचा इतिहास इथेच संपत नाही… अजून बराच आणि इंटरेस्टिंग आहे, चला तर जागतिक हत्ती दिनानिमित्त गजराजबद्दल जाणून घेऊया. (History Of Elephants)

तर हत्तीला भारतात विशेष महत्त्व आहे, का ते वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण आपला गणपती बाप्पाच हत्तीच्या मुखाचा आहे आणि ती पुराणकथा पण तुम्हाला माहिती असेलच.. पण त्याच्याही व्यतिरिक्त हिंदू धर्मात आणि जगातल्या इतर धर्म आणि संस्कृतीमध्येही महत्त्व आहे. खरं तर हिंदू धर्मात हत्तीला फक्त प्राणी नाही, तर सामर्थ्याचं प्रतिक मानलं गेलं आहे. नुकताच रामायण चित्रपटाचा ट्रेलर आला आहे, त्यामध्ये एक पंख असलेला उडणारा हत्ती दाखवला आहे, तो हत्ती आहे ऐरावत… म्हणजेच इंद्र देवाचा पांढऱ्या रंगाचा दिव्य हत्ती ! अनेक साहित्यात त्याच्याबद्दल वेगवेगळ लिहिलं गेलं आहे, म्हणजे त्याला अनेक मुख असतात, अनेक सोंड असतात वगैरे… आता ऐरावतच्या ऐवजी गजलक्ष्मीच्या बाजूलाही दोन हत्ती असतात, लक्ष्मीचा जलाभिषेक करताना…पुराणात दिग्गज हत्तींचाही उल्लेख आढळतो, म्हणजे आठ दिशांचे रक्षण करणारे आठ दिग्गज हत्ती! महाभारतातही हत्तीचा उल्लेख मिळतो. आपल्या शिल्पकलेतही हत्ती मोठ्या प्रमाणात दिसून येतात. चारही वेदांमध्ये हत्तीचा उल्लेख मिळतो, कधी हस्तिन तर कधी गज म्हणून… एकंदरीत हिंदू धर्माचं हत्तीवर विशेष प्रेम आहे एवढं नक्की! (History Of Elephants)

सिंधू संस्कृतीमध्येही हत्ती हा सर्वांचा खास प्राणी! हत्तीच्या अनेक टेराकोटाच्या मूर्ती सिंधू साईट्सवर सापडल्या आहेत. याशिवाय अनेक Seals वर हत्ती आपल्याला दिसून येतो. तसेच हस्तीदंताच्याही अनेक वस्तू सापडल्या आहेत. आपल्या भारतात सर्वाधिक हत्ती कर्नाटकमध्ये दिसतात, जवळपास ६ हजारपेक्षा जास्त हत्ती एकट्या कर्नाटकमध्ये आहेत… नंतर आसाम, केरळ, तामिळनाडू, उडीसा आणि उत्तराखंडमध्ये पहायला मिळतात. महाराष्ट्रात मात्र हत्तींची संख्या खूपच कमी… म्हणजे ४०-५० हत्ती आपल्या महाराष्ट्रात आहेत. पण त्याचं कारण नैसर्गिक अधिवास आहे. आपल्या इथे डोंगर दऱ्या खूप प्रमाणात आहेत. त्यामुळे हत्ती महाराष्ट्रातल्या जंगलांमध्ये टिकू शकत नाहीत. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर याच राज्यांमध्ये थोडेफार हत्ती पहायला मिळतात. पण प्राचीन काळी सह्याद्रीच्या उत्तर भागात हत्ती जास्त असू शकतात, असा अंदाज आपण बांधू शकतो, कारण कोकणातील कातळशिल्पांमध्ये अनेक हत्ती कोरलेले आहेत. (History Of Elephants)

आता इतकी वर्ष भारतात हत्ती आहे, हत्तीचं इतकं महत्त्वं आहे, तरी आपण त्याचा मान ठेवला नाही, हे दुर्दैवाने म्हणावं लागतं. आपण भारताच्या प्राचीन काळात गेलो, तर त्यावेळी हस्तीदंताच्या वस्तू बनवल्या जात होत्या. पण हत्तींची मोठ्या प्रमाणात कत्तल होत नव्हती. जंगलातून हत्ती पकडले जात होते. पण ते हत्ती युद्ध, मिरवणुकीसाठी वापरले जात होते. गेल्या २००-३०० वर्षात हत्तींच्या शिकारीचे प्रकार जास्तच वाढले. ब्रिटीश काळात छोट्या छोट्या गोष्टी बनवण्यासाठी हस्तीदंताचा वापर केला जात होता आणि यासाठी हत्तींची मोठ्या प्रमाणात कत्तल व्हायला लागली. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही पोचिंग सुरूच राहिली. हस्तीदंताचा बेकायदेशीर व्यापार जगभरात सुरु झाला आणि सर्वात जास्त झळ आशियाई नर हत्तींना बसली. कारण त्यांचे सुळे मोठे असायचे आणि यामुळे नर-मादी प्रमाण पुरतं हलून गेलं. (History Of Elephants)

=================

हे देखील वाचा: World Tiger Day : ताडोबाचा Godfather, ४० वाघांचा बाप ‘वाघडोह’ !

=================

१९७२ साली Wildlife Protection Act लागू करण्यात आला. यानुसार भारतातील आशियाई हत्तींची शिकारीची केस समोर झाली तर समोरच्याचे बांबू लागलेच म्हणून समजा. यामुळे हत्तीची शिकार आणि हस्तीदंत व्यापार यावर बंदी आली. नंतर १९९२ साली project elephant सुरु करण्यात आला. त्यामुळे आता कुठे आपले हत्ती जंगलांमध्ये मुक्तपणे फिरू शकत आहेत. पण तरीही हत्तींसाठीचा धोका अजून टळला नाहीये. जंगलतोड वाढली आहे, रेल्वे अपघातात हत्ती मारले जातात. शेताच्या कुंपणाच्या जागी असलेले शॉक… हत्तींच्या मार्गांवर असलेले अडथळे या सर्वांमुळे हत्तींसाठी काही गोष्टी कठीण होऊन बसल्या आहेत. सध्या भारतात जवळपास २५ हजार हत्ती आहेत आणि त्यांचं संवर्धन आपली जबाबदारी आहे. खरं सांगायचं झालं तर जंगलाचा खरा राजा हा हत्तीच आहे. कारण ते जंगलातले सर्वात परफेक्ट इकोसिस्टीम इंजिनिअर आहेत. जंगलात नैसर्गिक रस्ते तयार करायचे झाले तर हत्ती पुढे येतात, जंगलात बिजप्रसार करायचा झाला तर हत्ती पुढे येतात, जंगलात पाणवठे तयार करायचे आहेत, तर हत्ती पुढे येतात. हवामान बदलाशी लढा द्यायचाय, तर हत्तीच पुढे येतात. इतर प्राण्याचं रक्षण करायचं आहे, तरीही भाई हत्तीच पुढे असतात. त्यामुळे हत्ती वाचले तर जंगलं वाचतील आणि जंगलं वाचली तरच माणूस वाचेल.

To read the full blog, click here - https://gajawaja.in/history-of-elephants-if-elephants-dont-survive-the-condition-of-humans-will-be/

Comments

Popular posts from this blog

Health : कॅन्सर होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?

मेघा धाडे जान्हवीवर संतापली