Jagannath Puri : जग्गनाथ मंदिरात अविवाहित जोडप्यांना का आहे प्रवेश निषिद्ध?

 काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध अशा जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात झाली आहे. चारधामपैकी एक महत्त्वाचे धाम असलेल्या पुरी येथील जगन्नाथ मंदिरात दरवर्षी महाप्रभु जगन्नाथ त्यांचे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांना रथामध्ये बसून शहराची सफर घडवली जाते. हा रथोत्सवाचा सोहळा बघणे नशिबाचाच एक भाग समजला जातो. संपूर्ण वर्षभर भाविक या रथयात्रेची वाट बघत असतात. रथयात्रेच्या अनेक दिवस आधीच या भव्य यात्रेची तयारी सुरु होती. दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवसापासून ही रथयात्रा आयोजित केली जाते. या काळात भगवान जगन्नाथ त्यांचे मोठे भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत रथावर विराजमान असतात. भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातूनआणि परदेशातूनही भाविक येतात. मान्यता आहे की, या जगन्नाथ रथयात्रेत भाग घेतल्याने १०० यज्ञ केल्यासारखे फळ मिळते. मात्र या जग्गनाथ मंदिराबाबत अनेक मान्यता आणि रीती प्रचलित आहेत. या मंदिरातील अनेक जुन्या परंपरा आजही तेवढ्याच नेटाने पाळल्या जातात. यातलीच एक प्रथा म्हणजे भगवान जग्गनाथ यांच्या मंदिरामध्ये अविवाहित जोडप्यांना जाण्यात बंदी आहे. 

जगन्नाथ मंदिरामध्ये असणारी ही पद्धत पूर्वापार आहे. यानुसार प्रेमीयुगुल असो किंवा ज्यांचे लग्न निश्चित झाले आहे, पण झाले नाही असे जोडपे असो त्यांना प्रवेश प्रतिबंधित केला आहे. अविवाहित जोडप्यांना मंदिरात येण्यास करण्यात आलेल्या बंदी एका खास करणामुळे आहे. त्यामागे एक पौराणिक कथा आहे जी राधाराणीच्या शापाशी संबंधित आहे. भगवान जग्गनाथांचे हे मंदिर श्रीकृष्णाच्या जगन्नाथ स्वरूपातल्या मूर्तीमुळे जग प्रसिद्ध आहे. भगवान जग्गनाथ येथे त्यांच्या भावंडांबरोबर अर्थात बलभद्र (बलराम) आणि सुभद्रासोबत विराजमान आहेत. मात्र सामान्यपणे आपण पाहिले आहे की, श्रीकृष्णांसोबत कायम राधा देखील मंदिरामध्ये विराजमान असते. मात्र या मंदिराची ही एक गोष्ट खास आहे, की इथे राधा राणी कुठेही पाहायला मिळत नाहीत आणि हेच एक महत्त्वाचे कारण आहे ज्यातून या प्रथेची सुरुवात झाली असावी असे सांगितले जाते. 

या संदर्भात एक पौराणिक आख्यायिका देखील सांगितली जाते की, एकदा राधा राणी या जगन्नाथ मंदिरात श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांना मंदिराच्या येताना पाहून तिथे उपस्थित असलेल्या पुजाऱ्याने राधाराणी यांना थांबवले. तेव्हा राधाराणी यांनी या मागचे कारण विचारले. त्यावर त्या पुजाऱ्याने उत्तर देत सांगितले की, त्या (राधाराणी) श्रीकृष्णाच्या पत्नी नसून केवळ त्यांची प्रियसी आहेत, त्यामुळे त्यांना या मंदिरात प्रवेश देता येणार नाही. हे ऐकल्यावर राधा राणी खूप चिडल्या. त्यांना भगवान श्रीकृष्ण यांचे दर्शन मिळत नसल्याचे आणि त्या मंदिरात न सोडण्याचे कारण ऐकून अतीव दुःख झाले. पुढे राधाराणी यांनी या जग्गनाथ मंदिराला शाप दिला, की यापुढे कोणतेही अविवाहित जोडपे, प्रेमी जोडपे या मंदिरात एकत्र येऊन दर्शन घेऊ शकणार नाही. इतकेच नाही जर अशा जोडप्यांची या मंदिरात एकत्र येऊन दर्शनाचा प्रयत्न केला तर त्यांना त्यांच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची प्राप्ती होणार नाही. 

राधाराणी यांच्या याच शापामुळे आजही या जगन्नाथ मंदिरात प्रेमात असलेले, लग्न ठरलेले मात्र विवाह न झालेले जोडपे एकत्र जाणं टाळतात. ही परंपरा आजच्या आधुनिक काळातही मोठ्या श्रद्धेने पाळली जाते. अनेकांना जरी यात तथ्य वाटत नसले, पटत नसले तरी पण कोणीही ही पद्धत अस्वीकार करत नाही. या मंदिराची ही परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आलेली आहे. 

This blog was originally published on https://gajawaja.in/jagannath-temple-know-why-puri-unmarried-couple-banned-2/

Comments

Popular posts from this blog

Health : कॅन्सर होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी

Mobile : मोबाईल फोन पाण्यात पडल्यास काय करावे?

मेघा धाडे जान्हवीवर संतापली