School Bus : पिवळ्या रंगाची स्कुल बस असण्यामागे आहे खास वैज्ञानिक कारण
आजच्या काळात मुलांना शाळेत घालणे मोठे अवघड काम झाले आहे. मुलांना शाळेत घालतांना आई वडिलांनीच परीक्षा असते. त्यांना कोणत्या शाळेत घालायचे, कोणत्या मीडियममध्ये, कोणत्या बोर्डला असे नानाविध अनेक प्रश्न मुलांना शाळेत घालताना पालकांसमोर असतात. योग्य शाळा निवडल्यानंतर जर शाळा लांब असेल तर मुलांना शाळेत कसे सोडायचे हा प्रश्न देखील असतोच असतो. कारण आज आई आणि वडील दोघेही नोकरी करतात. त्यामुळे मुलांना शाळेत कोण सोडेल हा मोठा प्रश्न असतो. पण यावर एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय म्हणजे, स्कुल बस. स्कुल बस ही संकल्पना काही नवीन नाही. बऱ्याच वर्षांपासून स्कुल बस ही मुलांना शाळेत नेण्याचे आणि घरी सोडण्याची सेवा देत आहे.
मुलांसाठी एक सुरक्षित प्रवासाचं साधन म्हणून स्कूल बसकडे पाहिलं जातं. मुलाला शाळेत जाण्यासाठी स्कूल बस लावल्यास पालकांची देखील मोठी चिंता दूर होते, आणि मुलांना शाळेत सोडण्यासाठी किंवा आणण्यासाठी शाळेत जाण्याचं टेन्शन राहतं नाही. सकाळच्या किंवा शाळांच्या वेळेला जर आपण रोडवर पाहिले तर तर विविध शाळांच्या अनेक बस आपल्याला पाहायला मिळतात. दुरवरूनच आपल्याला समोरून येणारी स्कुल बस लक्षात येते. आपल्या आजूबाजूला कितीही विविध प्रकारच्या रंगाच्या बस असल्या तरी त्यातून स्कुल बस कोणती, हे आपल्याला लगेच समजते. याचे कारण म्हणजे, स्कुल बसचा पिवळा रंग. शाळा कोणत्याही असल्या तरी त्या शाळांच्या स्कुल बसचा रंग हा पिवळाच असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, स्कुल बसचा रंग पिवळाच का असतो?
स्कूल बसचा रंग पिवळा असण्यामागे देखील एक खास कारण, विज्ञान आहे. कारण पिवळ्या रंगांची वेव्हलेंथ ही खूप जास्त असते, ती लाल रंगापेक्षा जास्त असते. त्यामुळे पिवळा रंग हा खूप दूरवरून देखील स्पष्ट दिसतो, त्यामुळे अनेक ठिकाणी धोका दाखवण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर करतात. दरम्यान स्कूल बसमध्ये लहान मुलं असतात. ते शाळेत सुरक्षितरित्या पोहोचवण्याची जबाबदारी चालकावर असते. त्यामुळे रस्त्यात कुठे अपघात होऊ नये, समोरच्या व्यक्तीला स्कूल बस स्पष्ट दिसावी यासाठी देखील स्कूल बसचा रंग हा पिवळा असतो. यासोबतच मानवी डोळ्यांना इतर कोणत्याही रंगापेक्षा पिवळा रंग सर्वात आधी आणि स्पष्टपणे दिसतो. शास्त्रज्ञांच्या मते, पिवळा रंग लाल रंगापेक्षाही पट अधिक वेगाने डोळ्यांना आकर्षित करतो. जर तुमचे लक्ष समोर असेल, तरीही तुमच्या बाजूने येणारी पिवळी वस्तू तुम्हाला सहज जाणवते. यामुळे बाजूने जाणाऱ्या इतर वाहनचालकांना स्कूल बस दुरूनच दिसते. धुके, पाऊस किंवा अंधारामध्ये पिवळा रंग उठून दिसतो. यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप कमी होते.
एका माहितीनुसार अमेरिकामध्ये या पिवळ्या बसची प्रथम सुरूवात झाली होती. कोलंबिया विश्व विद्यालयाच्या शिक्षकांनी याबद्दल असाच एक निर्णय घेतला होता. ही घटना 1930 मधली आहे ज्यावेळी कोलंबिया विद्यापीठाच्या शिक्षकांनी स्कूल बसचा रंग कोणता असावा यावर निर्णय घेतला होता. त्या काळी वाहने आणि ट्रॅफिकवरून कुठलेच कायदे नव्हते. त्यामुळे एका बसमधून जर मुलं जात असतील तर ती बस त्या लहान मुलांचीच आहे ना याची खात्री करण्यासाठी आणि त्यासाठी म्हणून काही तरी प्रयत्न करणे गरजेचे होते. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पावलं उचललणं महत्त्वाचे होते. यासाठी कोलंबिया विश्व महाविद्यालयातील प्रोफेसर फ्रॅंक सायर यांनी संशोधन करण्यास सुरूवात केली.
तेव्हा त्यांच्या लक्षात आले की पिवळा रंग जर गाडीला दिला तर ही लहान मुलांच्या शाळेची स्कूलबस आहे हे ओळखण्यास मदत होईल. यासाठी यांनी एक मिटिंग भरवली ज्यात त्यांनी सगळे इंजिनिएयर्स आणि ट्रान्सपोर्ट ऑफिसर्ससोबत आणि कायदेव्यवस्थापकांसोबत या मुद्यावर मिटिंग केली आणि त्यानंतर काही रंगांचे सॅपल्सही आणले होते. त्यांच्या समोर असे अनेक सॅपल्स ठेवले होते ज्यात सगळे रंग ठेवले होते. त्यातील काही लोकांनी नारंगी रंगाला प्राधान्य दिलं. तर अनेक लोकांनी पिवळ्या रंगाला पसंती दिली.
this blog was originally published on https://gajawaja.in/why-school-bus-colour-is-yellow/
Comments
Post a Comment